शहरं
Join us  
Trending Stories
1
Delhi Assembly: दिल्ली विधानसभा परिसरात मोठी खळबळ, VIP गेट तोडून अज्ञात कार घुसली आत, तपास सुरू!
2
इराणचा 'डिजिटल' बॉम्ब! जगाचा इंटरनेट संपर्क तोडण्याची धमकी; समुद्राखालील केबल्स कापल्यास महाभयंकर संकट?
3
शेतकरी ते उद्योजक! मुद्रा कर्जाच्या मदतीने उभा करा स्वतःचा व्यवसाय; जाणून घ्या अर्ज करण्याची प्रक्रिया
4
पाकिस्तानात ४ दिवस वर्किंग, बांगलादेशात सं. ७ नंतर मॉल बंद; तेल संकटात शेजारील देशांनी काय केले?
5
"दादांचं स्वप्न, बारामतीचा ध्यास... दुःख तळघरात कोंडलं अन्...!"; उमेदवारी अर्ज भरण्यापूर्वी सुनेत्रा पवार भावुक, दिलं मोठं वचन
6
अखेर ट्रायम्फने ३५० सीसीची मोटरसायकल लाँच केली! जीएसटीचा फायदा अन् किंमत पाहून म्हणाल...
7
"काळजी करू नका, एकाही कार्यकर्त्याला वाऱ्यावर सोडणार नाही, दादांचा जनता दरबार..."; सुनेत्रा पवार यांचा शब्द
8
इराणच्या होर्मुझमधून निघालं भारताचं ८वं जहाज, २० हजार टन LPG घेऊन 'ग्रीन आशा' मायदेशात येणार!
9
तरुणीचा 'शोले' स्टाईल ड्रामा! असं काय घडलं की मोबाईल टॉवरवर चढून तरुणीने घरच्यांना दिली धमकी?
10
राहुरीत शरद पवार गटाचा उमेदवार ठरला, गोविंद मोकाटे निवडणूक लढवणार, प्राजक्त तनपुरेंची माघार?
11
७ दिवसांत दुप्पट झाला 'हा' शेअर; १००% पेक्षा अधिक वाढली किंमत, IPL टीमची मालक आहे कंपनी
12
इराण-इस्रायल संघर्षाचा भारतीय PMI वर परिणाम! सर्व्हिस सेक्टरची गती मंदावली; महागाईने कंबरडे मोडणार?
13
सलग तीन पराभवनानंतर CSK साठी गुड न्यूज, धोनी आणि ब्रेव्हिस ‘या’ सामन्यातून करणार पुनरागमन 
14
Petrol Price In US: ट्रम्प यांच्या निर्णयाचा अमेरिकेच्या लोकांनाच फटका; पेट्रोलच्या दरात जून २०२२ नंतरची सर्वात मोठी वाढ
15
लग्नाच्या पहिल्याच रात्री नववधूला...! नवरदेवाने थेट गाठले पोलीस स्टेशन; आग्र्यातील धक्कादायक घटना
16
बंगळुरू-चेन्नई लढतीत पाण्याच्या बाटलीवरून वाद, RCBचा कर्णधार पंचावर भडकला, नेमकं घडलं काय?
17
अमेरिका-इराणमध्ये आजच युद्धविराम?, ४८ तास महत्त्वाचे; पाकिस्तानचा पुढाकार, रातोरात सूत्रे हलली
18
Ashok Kharat : भोंदू अशोक खरातच्या 'तृप्तबाला'वर लक्ष ठेवण्यासाठी समर्थकांची खतरनाक 'मोडस ऑपरेंडी'
19
सोन्या-चांदीच्या दरात मोठी तेजी; Gold २ हजारांपेक्षा, तर Silver ६ हजारांपेक्षा अधिकनं महागलं; टेक करा नव्या किमती
20
टोयोटा 'इनोव्हा क्रिस्टा' कायमची बंद होणार? डिझेल MPV प्रेमींना मोठा धक्का; खरेदीसाठी शेवटची संधी!
Daily Top 2Weekly Top 5

नागपूर-यवतमाळ शिवशाहीला लागला ‘ब्रेक’

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: February 10, 2019 00:56 IST

प्रवाशांना थेट यवतमाळपर्यंतचा सुखद प्रवास व्हावा यासाठी राज्य परिवहन महामंडळाने गोंदिया आगारातून गोदिया-यवतमाळसाठी शिवशाही बससेवा सुरू केली होती. मात्र शिवशाहीच्या या फेरीला प्रवाशांचा अल्प प्रतिसाद मिळत होता. शिवाय तिकीटही अधिक असल्याने गोंदिया-यवतमाळ शिवशाहीला ‘ब्रेक’ लागला आहे.

ठळक मुद्देप्रवाशांचा अल्प प्रतिसाद : शिवशाही आता फक्त नागपूरसाठीच

कपिल केकत।लोकमत न्यूज नेटवर्कगोंदिया : प्रवाशांना थेट यवतमाळपर्यंतचा सुखद प्रवास व्हावा यासाठी राज्य परिवहन महामंडळाने गोंदिया आगारातून गोदिया-यवतमाळसाठी शिवशाही बससेवा सुरू केली होती. मात्र शिवशाहीच्या या फेरीला प्रवाशांचा अल्प प्रतिसाद मिळत होता. शिवाय तिकीटही अधिक असल्याने गोंदिया-यवतमाळ शिवशाहीला ‘ब्रेक’ लागला आहे.त्यामुळे आता ही शिवशाही नागपूरपर्यंत धावत आहे.प्रवाशांना आपल्या गंतव्य स्थानापर्यंत सुखरू सोडून देण्यासाठी ‘लालपरी’ आपली सेवा देत आहे. त्यातल्या त्यात प्रवाशांचा प्रवास अधिक सुखद करता यावा यासाठी महामंडळाने ‘शिवशाही’ आणली. अत्यंत आरामदायक असलेल्या या बसेस लांबवरच्या प्रवासासाठी अत्यंत सुविधाजनक आहेत.गोंदिया आगाराला अशा ४ शिवशाही देण्यात आल्या असून त्यातील ३ गाड्या गोंदिया-नागपूर तर एक गाडी गोंदिया-यवतमाळ फेरी मारत होती. यवतमाळसाठी थेट प्रवासाची सोय नसल्याने या गाडीला चांगला प्रतिसाद मिळणार अशी अपेक्षा या फेरी मागे असावी. सकाळी ६.१५ वाजता ही गाडी येथून सुटत होती. मात्र सुमारे ६ महिने धावलेल्या गोंदिया-यवतमाळ गाडीला प्रवाशांकडून अत्यल्प प्रतिसाद मिळाला.विशेष म्हणजे, यवतमाळपर्यंत प्रवासासाठी गाडीत २-४ प्रवासी राहत होते अशी स्थिती होती. म्हणजेच, या फेरीतून आगाराला डिजेलचेही पैसे काढता येत नव्हते. प्रवाशांच्या सुविधेसाठी सुरू करण्यात आलेल्या या फेरीला प्रवाशांनीच नाकारल्याने अखेर गोंदिया आगाराने शिवशाहीची गोंदिया-यवतमाळ फेरी बंद पाडली. त्यामुळे आता ही शिवशाही गोंदिया-नागपूर धावत आहे. तर यवतमाळ प्रवासासाठी लालपरी प्रवाशांच्या सेवेत आली आहे.तिकीट सर्वसामान्यांच्या आवाक्याबाहेरयवतमाळपर्यंत आरामदायक प्रवासाची सोय करून देणारी शिवशाही सर्वसामान्यांना परवडणारी नव्हती.याचाही फटका शिवशाहीच्या यवतमाळ फेरीला भोवला. शिवशाहीसाठी आगाराकडून ११ रूपये पर स्टेज आकारले जात होते. लालपरीसाठी ८ रूपये पर स्टेज आकारले जात असून एशियाडसाठी १० रूपये पर स्टेड आकारले जाते. येथे ६ किलो मीटरचे अंतर म्हणजे १ स्टेज होत असून यावरून यवतमाळपर्यंतचे तिकीट दर काढता येईल. एकंदर लालपरीच्या तुलनेत शिवशाहीचा प्रवास सर्वसामान्यांच्या आवाक्याबाहेर असल्याने प्रवासी शिवशाहीचा प्रवास टाळत होते.

टॅग्स :Shivshahiशिवशाही