शहरं
Join us  
Trending Stories
1
Delhi Assembly: दिल्ली विधानसभा परिसरात मोठी खळबळ, VIP गेट तोडून घुसली अज्ञात कार, तपास सुरू!
2
आयआयटी बाबाने गुपचूप लग्न उरकले! जोड्याने सरप्राईज द्यायला गावी गेले, संन्यास सोडून संसारातील 'अध्यात्म' सांगणार?
3
चीनकडून काहीतरी वेगळेच सुरु आहे...! अमेरिका-इराण युद्धाच्या सावटात सोन्या-चांदीची प्रचंड खरेदी; डॉलरला शह देण्यासाठी नवी चाल?
4
पाकिस्तानचा शांतता प्रस्ताव इराणने फेटाळला; राष्ट्रीय हितांवर तडजोड नाही, इराणची स्पष्टोक्ती...
5
Delhi Assembly: दिल्ली विधानसभेत कार घुसल्यानंतर पुढील ५ मिनिटं काय घडलं? प्रत्यक्षदर्शीनं सांगितला संपूर्ण थरार!
6
सकाळी रडवले, दुपारी हसवले! शेअर बाजाराची 'रॉकेट' भरारी; 'या' ४ कारणांमुळे गुंतवणूकदारांची चांदी
7
जगातील भल्याभल्या देशांना 'या' बाबतीत तगडी टक्कर देतो इराण; अमेरिका तर त्यांच्या आसपासही नाही!
8
इराणचा 'डिजिटल' बॉम्ब! जगाचा इंटरनेट संपर्क तोडण्याची धमकी; समुद्राखालील केबल्स कापल्यास महाभयंकर संकट?
9
Video: शिंदेसेनेच्या ज्योती वाघमारेंना खासदारकीची शपथ घेताना मध्येच थांबवले; संसदेत काय घडलं?
10
Astro: सावधान! नशिबाला दोष देण्यापूर्वी एकदा 'हे' वाचा; तुमच्या कोणत्या साध्या चुकीमुळे कोणता ग्रह कोपतोय?
11
सोने-चांदीवरील आयात शुल्कात मोठी कपात! दागिन्यांचे दर उतरणार? तोळ्यामागे ११,७०० रुपयांचा दिलासा
12
शेतकरी ते उद्योजक! मुद्रा कर्जाच्या मदतीने उभा करा स्वतःचा व्यवसाय; जाणून घ्या अर्ज करण्याची प्रक्रिया
13
पाकिस्तानात ४ दिवस वर्किंग, बांगलादेशात सं. ७ नंतर मॉल बंद; तेल संकटात शेजारील देशांनी काय केले?
14
Divya Singh : अभूतपूर्व! कडाक्याची थंडी, खांद्यावर सायकल; माउंट एव्हरेस्ट बेस कॅम्प गाठून दिव्या सिंहने रचला इतिहास
15
लोकप्रिय मराठी अभिनेत्रीने दुसऱ्यांदा बांधली लग्नगाठ, इंडस्ट्रीतलाच आहे नवरा; ओळखलंत का?
16
"दादांचं स्वप्न, बारामतीचा ध्यास... दुःख तळघरात कोंडलं अन्...!"; उमेदवारी अर्ज भरण्यापूर्वी सुनेत्रा पवार भावुक, दिलं मोठं वचन
17
अखेर ट्रायम्फने ३५० सीसीची मोटरसायकल लाँच केली! जीएसटीचा फायदा अन् किंमत पाहून म्हणाल...
18
"काळजी करू नका, एकाही कार्यकर्त्याला वाऱ्यावर सोडणार नाही, दादांचा जनता दरबार..."; सुनेत्रा पवार यांचा शब्द
19
इराणच्या होर्मुझमधून निघालं भारताचं ८वं जहाज, २० हजार टन LPG घेऊन 'ग्रीन आशा' मायदेशात येणार!
20
तरुणीचा 'शोले' स्टाईल ड्रामा! असं काय घडलं की मोबाईल टॉवरवर चढून तरुणीने घरच्यांना दिली धमकी?
Daily Top 2Weekly Top 5

नागराधाम कात टाकणार

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: January 28, 2018 21:17 IST

सुमारे ८०० वर्षांपेक्षा जास्त प्राचीन इतिहास असलेल्या जवळील ग्राम नागराला प्राचीन शिव मंदिरामुळे नागराधाम नावाने ख्याती प्राप्त आहे. मात्र फक्त शिव मंदिरामुळे ओळख असलेले हे नागराधाम आता कात टाकणार आहे. नागराधाम येथील शिवमंदिर तिर्थक्षेत्राला ‘ब’ वर्ग तिर्थक्षेत्राचा दर्जा मिळाला आहे.

ठळक मुद्देतीर्थक्षेत्र ‘ब’ वर्ग दर्जा : विशेष बायपास रस्त्यासाठी प्रयत्न

लोकमत न्यूज नेटवर्कगोंदिया : सुमारे ८०० वर्षांपेक्षा जास्त प्राचीन इतिहास असलेल्या जवळील ग्राम नागराला प्राचीन शिव मंदिरामुळे नागराधाम नावाने ख्याती प्राप्त आहे. मात्र फक्त शिव मंदिरामुळे ओळख असलेले हे नागराधाम आता कात टाकणार आहे. नागराधाम येथील शिवमंदिर तिर्थक्षेत्राला ‘ब’ वर्ग तिर्थक्षेत्राचा दर्जा मिळाला आहे. त्यामुळे येथे आता मोठ्या प्रमाणात विकास कामे करण्यासाठी तसेच नागरा पोहचण्यासाठी विशेष बायपास रस्ता तयार करण्याचे प्रयत्न आमदार गोपालदास अग्रवाल करीत आहेत.प्राचीन शिवमंदिर यासह परिसरातील भैरव मंदिराजवळ भारतीय पुरातत्व विभागाला खोदकामात मानव निर्मित अतिप्राचीन अवशेष मिळाले आहेत. यामुळे सुमारे ८०० वर्षांपेक्षा जास्तीचा इतिहास नागराचा आहे. तालुक्याला लाभलेल्या अशा या वरदानाचे जतन करता यावे यासाठी आमदार अग्रवाल यांचे प्रयत्न सुरू होते.यातूनच नागरा शिवमंदिर तिर्थक्षेत्राला ‘ब’ वर्ग तिर्थक्षेत्राचा दर्जा मिळाला आहे. अशात भाविकांच्या सुविधार्थ विकासकामांसाठी आता राज्य सरकारकडून निधी उपलब्ध करवून दिला जाईल. परिणामी नागराधाम तिर्थक्षेत्र राज्यातील अन्य धार्मिक तिर्थक्षेत्रांच्या नकाशात प्रामुख्याने नजरेत येणार आहे.शिवाय येथे भाविकांच्या सुविधेसाठी धर्मशाळा, उपहारगृह व नाट्यगृहाचे बांधकामही अपेक्षीत आहे. तसेच सध्या नागरा शिवमंदिरात जाण्यासाठी वस्तीतून जावे लागत असून यामुळे नागरिकांना त्रास होत असतानाच अरूंद रस्त्यांमुळे अपघातांचीही शक्यता नाकारता येत नाही.यासाठीच शिवमंदिरात जाण्यासाठी गोंदिया-बालाघाट मार्गाने थेट शिवमंदिर पर्यंत विशेष बायपास रस्ता तयार करण्यासाठी आमदार अग्रवाल प्रयत्न करीत आहेत. असे झाल्यास नक्कीच नागराधाम कात टाकणार आहे.तलावात लागणार म्युझिकल फाऊंटेनशिवमंदिर समोर असलेल्या तलावाचे आमदार अग्रवाल यांच्या प्रयत्नातून महाराष्ट्र राज्य पर्यटन विकास महामंडळाने सौंदर्यीकरण व विद्युतीकरण केले असून पाळीवर पेवींग ब्लॉक पाथ तयार केला आहे. मात्र या तलावासाठी एवढेच पुरेसे नसून आता या तलावात म्युजीकल फाऊं टेन व बोटींग सुरू करण्यासाठी आमदार अग्रवाल यांचे प्रयत्न सुरू आहेत. असे झाल्यास या म्युजीकल फाऊंटेन व बोटींगचा आनंद लुटण्यासाठी मोठ्या संख्येत येथे नागरिकांची गर्दी राहणार यात शंका नाही.