शहरं
Join us  
Trending Stories
1
युद्धाच्या फुसक्या धमक्यांचे 'बार' सोडणाऱ्या बिलावल भुट्टोंचं 'भिरभिरं' जमिनीवर; म्हणाले, 'भारतासोबत...'
2
कॅप्टन्सीत शतकी 'रोमान्स'! शुबमन गिलनं मारली विराटसह या दिग्गजांच्या क्लबमध्ये एन्ट्री
3
कर्नाटकात मुख्यमंत्री पदावरून अंतर्गत कलह सुरू असतानाच सरकारचा मोठा निर्णय; २ शहरांची नावं बदलली
4
"...तर काँग्रेस पक्षाला थेट आरोपी बनवता येईल"; नॅशनल हेराल्ड प्रकरणात EDचा न्यायालयात दावा
5
IND vs ENG: बुमराहवर प्रचंड संतापले रवी शास्त्री; गंभीर-गिल जोडीला म्हणाले- "त्याच्या हातातून..."
6
"एकदा तरी मला माझ्या बहिणीला भेटू द्या"; सोनम रघुवंशीच्या भावाची मागणी, म्हणाला... 
7
यशस्वी जैस्वालची सेंच्युरी हुकली! पण एका डावात अनेक विक्रम; हिटमॅन रोहित शर्मालाही टाकले मागे
8
खतरनाक इनस्विंग! स्टायलिश अंदाजात बॉल सोडला अन् 'क्लीन बोल्ड' होऊन तंबूत परतला (VIDEO)
9
बांगलादेशच्या माजी पंतप्रधान शेख हसीना यांना मोठा धक्का, सहा महिन्यांच्या तुरुंगवासाची शिक्षा!
10
८ वर्षांनी संधी; आता प्रमोशनही मिळालं! पण तो पुन्हा 'बिनकामाचा' ठरला
11
"माझ्यासमोरच त्याने तिघांना मारलंय"; वाल्मिक कराडच्या जुन्या सहकाऱ्याचा धक्कादायक दावा; म्हणाले, "त्याला बीडचा..."
12
कठड्यावर धडकून बाईकखाली पाय अडकला अन...; दुचाकी पेटल्याने तरुणाचा दुर्दैवी मृत्यू
13
टॉयलेटमध्ये जाणाऱ्या महिलांचे बनवत होता व्हिडीओ; प्रसिद्ध आयटी कंपनीमधील इंजिनियरला अटक
14
आधार कार्ड दिलं नाही म्हणून काढली पँट; कावड यात्रेआधी ओळख पटवणाऱ्या लोकांवर भडकले ओवैसी
15
इन्स्टाग्रामवर सूत जुळलं, कोर्ट मॅरेजनंतर मुलाला दिला जन्म; २२ वर्षीय तरुणीने संपवलं आयुष्य
16
सर्वाधिक कसोटी सामने जिंकणारे भारतीय कर्णधार, धोनी दुसऱ्या क्रमांकावर, पहिला कोण?
17
"लग्न करुन येऊ? घर देणार का मग?", अ‍ॅक्टर असल्यामुळे मिळत नाहीये घर, पूजा कार्तुडे संतापली!
18
...तर अशी भागणार पाकिस्तानची तहान; सिंधू जल करार रद्द केल्यानंतर शहबाज शरीफ मोठं पाऊल उचलणार!
19
२०२७ पर्यंत ३ राशींना साडेसाती कायम, २ राशींवर शनि दृष्टी; अशुभ प्रभाव वाढेल? ‘हे’ उपाय कराच
20
“उद्धव ठाकरे ‘मातोश्री’चा एक हिस्सा काढून राज ठाकरेंना देणार का?”; नारायण राणेंचा सवाल

नगर पंचायत सदस्य सहलीवर

By admin | Updated: November 21, 2015 02:12 IST

स्थानिक नगर पंचायतमध्ये निवडून आलेले नवनिर्वाचित सात सदस्य इतरत्र सहलीवर गेले आहेत, तर दोन सदस्य जाणार असल्याची शक्यता वर्तविली जात आहे.

अर्जुनी-मोरगाव : स्थानिक नगर पंचायतमध्ये निवडून आलेले नवनिर्वाचित सात सदस्य इतरत्र सहलीवर गेले आहेत, तर दोन सदस्य जाणार असल्याची शक्यता वर्तविली जात आहे.प्राप्त माहितीनुसार, स्थानिक नगरपंचायतची निवडणूक १ नोव्हेंबर रोजी पार पडली. २७ नोव्हेंबर रोजी नगराध्यक्षाची निवड होणार आहे. येथे कोणत्याही राजकीय पक्षाला बहुमत नाही. काँग्रेस ६, भाजपा ६, राष्ट्रवादी २, अपक्ष २ व शिवसेना १ याप्रमाणे बलाबल आहे. काँग्रेस व भाजपला बहुमतासाठी ३ सदस्यांची गरज आहे. नगराध्यक्षाचे पद अनुसूचित जाती महिला प्रवर्गासाठी राखीव आहे. या पदाचे चारही दावेदार काँग्रेस पक्षाचे आहेत. भाजपाजवळ दावेदार उमेदवारच नाही. सत्ता स्थापनेसाठी उमेदवारांना आपल्याकडे वळविण्यास सुरूवात झाली आहे. परंतु तत्पुर्वीच चारही दावेदार सदस्यांसह इतर तीन सदस्यांना तोडफोडीच्या राजकारणापासून अलिप्त ठेवण्याच्या दृष्टीने काँग्रेसने ही खेळी केल्याचे बोलल्या जात आहे.काँग्रेससोबत सध्या सात सदस्य असले तरी बहुमतासाठी नऊ सदस्यांची गरज आहे. आवश्यक तेवढे संख्याबळ सोबत नसल्याने उपाध्यक्षपदासाठीचा संभ्रम अद्यापही कायम आहे. विरोधी पक्ष सुद्धा त्या दृष्टीने व्यूहरचनेच्या तयारीला लागल्याने बोलल्या जात आहे. काँग्रेस व भाजपामधून निवडून आलेल्या सदस्यांपेक्षा राष्ट्रवादी, अपक्ष व शिवसेना सदस्यांना अधिक महत्व प्राप्त झाल्याचे दिसून येते. अध्यक्ष आपल्या पक्षाचा असावा या दृष्टीने भाजप काही सदस्यांच्या संपर्कात आहे. गोंदिया जिल्हा परिषद व स्थानिक पंचायत समितीमध्ये भाजप-काँग्रेस अशी युती आहे. याव्यतिरिक्त इतर पक्ष व अपक्ष सदस्यांनी पाठींबा नाकारल्यास ऐनवेळी काँग्रेस-भाजपा युतीची शक्यता नाकारता येत नाही. जर-तरच्या या राजकारणात कुणाच्या डोक्यावर राजमुकूट चढतो हे लवकरच स्पष्ट होईल. (तालुका प्रतिनिधी)