शहरं
Join us  
Trending Stories
1
इथे युद्ध थांबलं, तिथे शेअर बाजार सुस्साट... Sensex २६०० अंकांनी वधारला, Nifty मध्ये ७०० अंकांची तेजी
2
“शस्त्रसंधी वगैरे काही नाही”; इस्रायलने केले स्पष्ट, अमेरिका-इराण युद्ध खरेच थांबणार का?
3
भय इथले संपत नाही! अमेरिका-इराण शस्त्रसंधी झाली तरी आखाती देश हाय अलर्टवर; तणाव कायम
4
अमेरिकेने रोखली क्षेपणास्त्रे, इराणही भूमिकेवर ठाम, अखेर ‘या’ देशाची एंट्री, अन् झाला युद्धविराम
5
HDFC Bank New Rates: एचडीएफसी बँकेच्या व्याजदरात बदल; लोनच्या EMI वर होणार परिणाम, पटापट चेक करा नवे दर
6
आजचे राशीभविष्य, ०८ एप्रिल २०२६: नोकरदारांना ऑफिसमध्ये अनुकूल वातावरण, आर्थिक लाभाची शक्यता
7
भंडाऱ्यात चोरांचे तांडव! ५ तासांत २१ दुकाने फोडली; लाखोंचा मुद्देमाल गायब, टोळी असल्याचा संशय
8
Iran युद्धात शस्त्रसंधीच्या घोषणेनं दिलासा; कच्च्या तेलाच्या किमतीत मोठी घसरण आणि अमेरिकन बाजारात बंपर तेजी
9
रवींद्र एरंडेच्या ऑफिसमध्ये धनादेशांचा खच; वाचवण्यासाठी अहिल्यानगरच्या 'त्या' नेत्यांचा पोलिसांवर दबाव
10
धक्कादायक वास्तव! हा बघा मुंबई विद्यापीठाच्या क्रीडा संकुलातील ‘जलतरण तलाव’
11
अखेर शस्त्रसंधी झाली तरी कशी? अमेरिकेला पाठवला १० कलमी प्रस्ताव; इराणने केली भूमिका स्पष्ट
12
ट्रम्प-इराण युद्धविरामात पाकिस्तानचा गेम? 'कॉपी-पेस्ट' मेसेजने पोलखोल, शाहबाज यांची स्क्रिप्ट कुणी लिहिली?
13
आठ वर्षांच्या चिमुरडीचा डम्परखाली चिरडून मृत्यू; संतप्त नागरिकांचा रास्ता रोको, चालकाला अटक
14
अमेरिका-इराणमध्ये २ आठवड्यांसाठी युद्धबंदी; डोनाल्ड ट्रम्प यांच्याकडून हल्ले थांबवण्याची घोषणा
15
पहिल्या पॉड टॅक्सीचे भूमिपूजन; मात्र कुर्ला ते वांद्रे रेल्वे स्थानक प्रवासासाठी २०३१ची प्रतीक्षा
16
‘टनेल बोरिंग’ मशिनवर 'ठाणेकर' उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे ठेवणार नजर- मुख्यमंत्री फडणवीस
17
बंगालमध्ये मतदारयादीत 'महा-सफाई'! आगामी विधानसभा निवडणुकीआधी वगळली ९१ लाख नावे
18
इशारा : युद्धामुळे महागाई, व्याजदर वाढणार; ‘जेपी मॉर्गन चेस’चे सीईओ जेमी डिमन यांचे भाकीत
19
भोंदूबाबा अशोक खरात संबंधीच्या ४,६५० अश्लील लिंक डिलीट; ६० दिवसांत दोषारोपपत्र
20
पुनर्वसनानंतर १२ हजार कोटींचा बोजा; नवी मुंबईच्या गळ्याला बसणार लोकसंख्येचा फास
Daily Top 2Weekly Top 5

रहस्यमयी मृत्यूंमुळे दहशत

By admin | Updated: July 6, 2015 01:30 IST

शहराच्या पश्चिम भागाकडील पैकनटोली येथील दोन घरांमध्ये रहस्यमयरीत्या मृत्यू झालेल्या अवस्थेत त्यांच्या घरच्या ...

शेळ्या व कोंबड्यांवर हल्ला : वन्यप्राणीच हल्लेखोर असल्याचा नागरिकांचा अंदाजगोंदिया : शहराच्या पश्चिम भागाकडील पैकनटोली येथील दोन घरांमध्ये रहस्यमयरीत्या मृत्यू झालेल्या अवस्थेत त्यांच्या घरच्या शेळ्या व कोंबड्या आढळल्या. या प्राण्यांच्या गूढ मृत्यूमुळे नागरिकांमध्ये दहशतीचे सावट निर्माण झाले आहे.रविवारी पहाटे २.३० वाजता प्रकाश रहांगडाले यांना त्यांच्या घरात एका शेळीच्या ओरडण्याचा आवाज आला. त्यांनी आपल्या भावाला उठविले व ते घरासमोरील खोलीत गेले. त्यावेळी त्यांनी कुत्र्यापेक्षा उंच असलेल्या एका जंगली प्राण्याला पळताना पाहिले. पाठलाग केल्यावर तो प्राणी आवारभिंत ओलांडून पळून गेला. घरासमोर अंधार असल्यामुळे दोन्ही भाऊ त्या प्राण्याला बरोबर पाहू शकले नाही.सकाळी जेव्हा त्या ठिकाणी लोकमतने पाहणी केली असता रहांगडाले यांच्या घरासमोरील आवारभिंतीला ओलांडून जाताना प्राण्याच्या नखांचे चिन्ह आढळले. पैकनटोली येथे रहांगडाले यांच्याकडे तीन शेळ्या व दोन कोंबड्या मृतावस्थेत आढळल्या. मृत शेळ्या व कोंबड्यांच्या मानेजवळ चावा घेतल्याचे चिन्ह होते. तिथून रक्त वाहत होते. याचप्रकारे कुंवरलाल नेवारे यांच्या घरीसुद्धा रविवारी पहाटे एक शेळी व पाच कोंबड्या मृतावस्थेत आढळल्या.या घटनेमुळे सर्व आश्चर्यचकीत आहेत. सर्व शेळ्या आजूबाजूला बांधलेल्या मृतावस्थेत पडून होत्या. वन्यप्राणी जर एखाद्या शेळीवर हल्ला करतो तर इतर शेळ्या ओरडतात. दोन कोंबड्या जवळच होत्या. एकावर हल्ला झाला तर दुसरी ओरडते. मात्र असे काहीही न झाल्यामुळे रहांगडाले व त्यांच्या भावाला चिंताग्रस्त करून सोडले आहे. या बाबींची चर्चा नागरिकांमध्ये पसरलेली होती. अशीच घटना सात दिवसांपूर्वी पैकनटोली जवळील गौतमनगरातसुद्धा घडली होती. गौतमनगर येथील रहिवासी प्यारूभाई कुल्फी विक्री करतात. त्यांच्या घरीसुद्धा सात दिवसांपूर्वी आठ कोंबड्या व सात शेळ्या अज्ञात जनावराचा शिकार झाल्या आहेत. मात्र मेलेल्या पशूंचे मांस किंवा त्यांच्या शरिराला मारणाऱ्या प्राण्याने काही केले नाही. पैकनटोली व गौतमनगर शहराच्या शेवटच्या टोकावर वसलेले आहेत. त्यानंतर शेतशिवार सुरू होते. त्यामुळे एखाद्या वन्यप्राण्यामुळेच या घटना घडल्या असाव्यात, असा अंदाज बांधला जात आहे. तर काही अंधश्रद्धाळू लोक या घटनांना भूत-प्रेताशी जोडू पाहत आहेत. रविवारी वनविभागाचे चिकित्सक उपलब्ध नसल्यामुळे मेलेल्या शेळ्या व कोंबड्यांची उत्तरीय तपासणी सोमवारी (दि.६) होणार आहे. त्यानंतरच या रहस्यमयी मृत्यूंची पोल-खोल होणार असल्याचे दिसते. (प्रतिनिधी)पोलिसांत तक्रारसदर घटनेची तक्रार पोलीस ठाण्यात करण्यात आली आहे. रात्री २.३० वाजता जेव्हा रहांगडाले बंधू गोंदिया शहर पोलीस ठाण्यात गेले, तेव्हा पोलिसांनी सुरूवातील तक्रार नोंदविली नाही. नंतर सकाळी ८ वाजता पोलीस घटनास्थळी पोहोचले व वनविभागाला या घटनेची तक्रार नोंदविण्यास सांगितले.या आगळ्यावेगळ्या घटनेच्या चौकशीसाठी वनविभागाचे श्वानपथक घटनास्थळी पाठविण्यात आले होते. परंतु त्यांना काहीही मिळाले नाही. आता वनविभाग घटनास्थळी कॅमेरे लावत आहे. त्यामुळे रात्रीच्या घटना उजेडात येवू शकतील.-अश्विनकुमार ठक्करसहायक उपवनसंरक्षक गोंदिया.