शहरं
Join us  
Trending Stories
1
राज ठाकरे मातोश्रीवर, उद्धव ठाकरेंना वाढदिवसाचे काय गिफ्ट देणार; युती की शुभेच्छाच...
2
Eknath Khadse : "दोषी असेल तर..."; रेव्ह पार्टीत जावयाला अटक होताच एकनाथ खडसेंनी स्पष्टच सांगितलं
3
'गिरीश महाजन नावाचा सांड मोकाट सुटलाय; फडणवीसांना...', संजय राऊतांचे टीकास्त्र
4
Pune Rave Party: पुण्यात मोठी रेव्ह पार्टी...! एकनाथ खडसेंचा जावई ताब्यात, प्रसिद्ध बुकीसोबत दोन तरुणीही...
5
Pranjal Khewalkar Pune Rave Party: तीन फ्लॅट बुक, तीन महिला गायब...! नुसती रेव्ह पार्टी होती की आणखी काही...; मोठी अपडेट समोर
6
"पु.ल. देशपांडेंनी मला बघून विचारलं...", आठ वर्षांच्या सचिन पिळगावकरांचा आणखी एक किस्सा
7
एकनाथ खडसेंचा जावई रेव्ह पार्टीत रंगेहाथ सापडला, तरी सुषमा अंधारे म्हणतात...
8
पुण्यातील रेव्ह पार्टीत सापडलेले खडसेंचे जावई प्रांजल खेवलकर नेमका काय व्यवसाय करतात?
9
Girish Mahajan : रेव्ह पार्टीत रोहिणी खडसेंच्या पतीला अटक; गिरीश महाजन म्हणतात, "नाथाभाऊंनी जावईबापुंना..."
10
एअर इंडिया अपघात एक रहस्यच राहणार? शेवटच्या १० मिनिटांत ब्लॅक बॉक्समध्ये रेकॉर्डिंगच झाले नाही 
11
ट्रम्प यांचा युद्धविरामाचा दावा ठरला फोल; थायलंड आणि कंबोडियामधील तणाव चौथ्या दिवशीही कायम
12
धक्कादायक! हरिद्वारमधील मनसा देवी मंदिरात चेंगराचेंगरी, ६ भाविकांचा मृत्यू, अनेक जण जखमी
13
हे काय चाललेय! एअर इंडियात पदावर एक, निर्णय घेतो भलताच; सरकारने एअर इंडियाला सुनावले...
14
"निलेश साबळे आणि भाऊ कदम हवे होते...", नवीन 'चला हवा येऊ द्या'च्या पहिल्या एपिसोडनंतर प्रेक्षकांच्या प्रतिक्रिया
15
"भयंकर परिणाम होतील...", ऊर्जामंत्री एके शर्मा संतापले; वीज अधिकाऱ्याचा ऑडिओ केला शेअर
16
सोने ₹३२,००० वरून थेट १ लाखांवर! गेल्या ६ वर्षात २००% वाढ, पुढील ५ वर्षात 'इतकं' महाग होणार!
17
रात्री १२ वाजता सलमान खानची पोस्ट, म्हणाला, "बाबांचं आधीच ऐकलं असतं तर..."
18
Video - अमेरिकेत मोठी दुर्घटना टळली! टेकऑफ दरम्यान लँडिंग गियरला आग, विमानात होते १७९ जण
19
‘धनुष्यबाण-घड्याळ’ वाटपात कौशल्य; महायुतीच्या कामी आल्याचे राहुल नार्वेकरांना बक्षीस मिळणार!
20
७ तासांपेक्षा कमी किंवा ९ तासांपेक्षा जास्त झोपता? लवकर मृत्यूचा धोका, रिसर्चमध्ये मोठा खुलासा

एक घागर पाण्याने दिवस काढावा लागतो

By admin | Updated: May 31, 2015 00:44 IST

जवळपास वळद गावातील लोकसंख्या १६७० एवढी आहे. गावातील शासकीय व खासगी विहीर आटल्या आहेत.

पाण्याची चणचण : वळदगावच्या विहिरी आटल्याआमगाव : जवळपास वळद गावातील लोकसंख्या १६७० एवढी आहे. गावातील शासकीय व खासगी विहीर आटल्या आहेत. बोअरवेल मधून पाणी निघत नाही. फक्त जुन्या नळ योजनेचा एक घागर पाणी घेऊन वळद गावकरी दिवस काढत आहेत. एवढी गंभीर समस्या पाण्याची या गावात आहे. २० वर्षापूर्वी ३० हजार लिटर पाणी क्षमतेची टाकी तयार करण्यात आली. त्यावेळी गावाची लोकसंख्या ७५० होती. आज लोकसंख्या दुप्पट झाली आहे. गावात जुन्या नळ योजनेचे पाईप प्रत्येक वार्डात आहेत. मात्र पूर्ण गावाला ३० हजार लिटरची नळ योजना कुचकामी ठरली आहे. फक्त एक घागर पाणी प्रत्येक घराला मिळत आहेत. बोअरवेलमधून जलस्तर खाली गेल्याने पाणी निघत नाही. गावातील मालगुजारी तलावात ओवारा मध्यम प्रकल्पाचे पाणी सोडले तर वळद येथील पाणी समस्या मिटू शकतो. ओवारा प्रकल्पाच्या अधिकाऱ्यांनी पाणी सोडने कालव्याला अत्यंत गरजेचे आहे. अन्यथा काही दिवसांनी वळद येथील पाणी समस्या उग्ररुप धारण केल्याशिवाय राहणार नाही. नागरिकांच्या समस्येचा विचार करता तत्काळ कालव्याला ओवारा प्रकल्पाचे पाणी सोडण्याची मागणी सरपंच उषा परिहार, उपसरपंच खेमचंद पटले, किशोर रहांगडाले, कल्पना तुरकर, कांता कोडापे, शिवसागर परिहार, संतोष पारधी, धनलाल कटरे व अन्य ग्रामस्थांनी केली आहे. (तालुका प्रतिनिधी)प्रशासकीय तयारी कागदावरचदरवर्षी पाणी टंचाईवर मात करण्यासाठी नियोजन केले जाते. त्यासाठी शासनाकडून बराच निधीही मिळतो. मात्र प्रशासकीय तयारी कागदावरच राहते. प्रत्यक्षात कामे होतच नाहीत. गावकऱ्यांची समस्या जाणून घेण्यासाठी आणि ती दूर करण्यासाठी कोणीही पुढाकार घेण्यास तयार नाही. लोकप्रतिनिधींनी यासाठी पुढाकार घेऊन समस्या सोडविणे गरजेचे आहे.गावकऱ्यांना दिलासा देण्याची गरजओवारा प्रकल्पाचे पाणी वळद, कटंगटोला, सोनेखारी, येरमडा या गावाना पिण्याच्या पाण्याची खूप टंचाई आहे. कालव्याला पाणी सोडण्याची कार्यकारी अभियंता गोंदिया यांना उपविभागीय अधिकारी देवरी यांच्यामार्फत १० डिसेंबर २०१४ ला देण्यात आले. मात्र प्रकल्पाच्या अधिकाऱ्यांनी लक्ष दिले नसल्यामुळे अनेक गावात टंचाई कायम आहे.पाण्यासाठी नागरिकांची करावी लागते कसरत ग्रामपंचायत पाऊलदौना अंतर्गत येत असलेल्या बाघडोंगरी गावात पिण्याच्या व घरगुती वापरात येणाऱ्या पाण्याची मोठी टंचाई निर्माण झाली आहे. गावातील बोअरवेल, विहिर कोरड्या पडल्या आहेत. तलावातील पाणी बैलबंडीने ड्रमद्वारे आणले जात आहे. अनेक वर्षांपासून बाघडोंगरीत पिण्याच्या व घरगुती वापराकरिता पाणी ही मोठी गंभीर समस्या आहे. या गावात गोंड समाज जास्त आहे. ग्रामपंचायत पाऊलदौना अंतर्गत बाघडोंगरी, पिपरटोला, बाघाटोला, जांभुळटोला यांना मोठी नळयोजना अत्यंत गरजेची आहे.