शहरं
Join us  
Trending Stories
1
दहशतवाद्यांचे कंबरडे मोडण्याची तयारी, अनंतनागमधून १७५ जण ताब्यात, लष्कराची मोठी कारवाई
2
'लष्करी कारवायांचे थेट वार्तांकन करू नका; पहलगाम हल्ल्यानंतर केंद्राचा मोठा निर्णय, माध्यमांना सूचना
3
पहलगाम हल्ला: पाकव्याप्त काश्मीर ताब्यात घेणे हाच पर्याय!; ठाकरे गटाची स्वाक्षरी मोहीम
4
“शरद पवारांना आणखी काय पुरावा हवा? कटू सत्य...”; ‘त्या’ विधानावरून मनसे नेत्यांचा पलटवार
5
आता तेही नको! भारत-पाक क्रिकेट संदर्भात गांगुलीचं मोठं वक्तव्य; म्हणाला...
6
पहलगामचा हल्ला, भारताचा पाकवरील 'स्ट्राईक' आणि तिसरं महायुद्ध; नॉस्ट्रॅडॅमसचे भाकित काय?
7
पाकिस्तानला ड्रोन हल्ल्याची भीती! सैनिकांना फोन बंद करण्याचे दिले निर्देश
8
इराणच्या राजाई बंदरात भीषण स्फोट; ४०६ जखमी, अनेकांचा मृत्यू झाल्याची भीती
9
पाकिस्तानींना देश सोडण्याचे आदेश, अदनान सामी सोशल मीडियावर झाला ट्रोल, अखेर संतापून म्हणाला...  
10
"सीमा हैदर भारताची सून, तिला पाकिस्तानात पाठवू नका", राखी सावंतची विनंती, म्हणाली...
11
“२०३४ नंतरही फडणवीस CM असावेत, भाजपाची सत्ता अविरत राहावी”; भाजपा नेत्यांची ‘मन की बात’
12
भारताजवळ आहेत दोन शक्तिशाली ब्रह्मास्त्रं, पाकिस्तानमधील लाहोर, कराचीसारखी शहरं क्षणार्धात करू शकतात नष्ट
13
मुंबई: अंधेरीत आठ मजली इमारतीत अग्नितांडव, १ महिलेचा मृत्यू; ६ जण जखमी
14
पाकचे पंतप्रधान आता तटस्थ चौकशीस तयार, CM ओमर अब्दुल्लांची पहिली प्रतिक्रिया, म्हणाले...
15
पहलगाम हल्ल्याची आधी जबाबदारी घेतली, आता भारताने कारवाई सुरू केल्यावर टीआरएफचा 'यू-टर्न'
16
मनसेकडून प्रतिसभागृह, आदित्य ठाकरेंना निमंत्रण; भाजपा नाराज, सहभागी होण्यास नकार
17
काळजी घ्या! कारमध्ये ठेवलेल्या बाटलीमुळे आग लागू शकते; कारणे जाणून घ्या
18
वडील विनोद खन्ना यांच्यासोबत काम का करायचं नव्हतं? 'छावा' फेम अक्षय खन्नाने सांगितलेलं हैराण करणारं कारण
19
Airtel नं लाँच केला जबरदस्त प्लान; हाय स्पीड डेटासह मिळणार 'इतके' फायदे, जाणून घ्या
20
बदलापूर रेल्वे स्थानकातून येऊ शकते चेंगराचेंगरीची बातमी; 'हा' व्हिडीओ बघून काळजात होईल धस्स!

मूशानझोरवा विकासापासून कोसो दूर

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: March 9, 2020 06:00 IST

मूशानझोरवा हे गाव खडकी-टोला गावापासून २ किमी. अंतरवर आहे. या गाव परिसरात अस्वल, बिबट, रानगवा, तडस आदी प्राण्यांचा नेहमीच वावर असतो. जंगल व्याप्त रस्ता असल्यामुळे ये-जा करणे कठीण झाले आहे. गावात ५ वर्षां खालील १० बालके असून त्यांना शासनाचे बाल विकास प्रकल्प कार्यालयाकडून आहार पुरविला जात नसल्याची माहिती पुढे आली आहे. तालुक्यातील कुपोषणाचे प्रमाण कमी करण्यासाठी अंगणवाडी केंद्र उघडण्याची नितांत गरज आहे.

ठळक मुद्देविद्यार्थी शिक्षणापासून वंचित : अधिकारी व लोकप्रतिनिधींचे दुर्लक्ष

राजेश मुनिश्वर।लोकमत न्यूज नेटवर्कसडक अर्जुनी : तालुक्यातील काही गावे आजही विकासापासून कोसो दूर असल्याचे चित्र पाहावयास मिळत आहे. राष्ट्रीय महामार्ग क्र मांक ६ वरील पूर्वेस ६ किलामीटर अंतरावर असलेल्या मुशानझोरवा गावाचा आजही विकास झाल्याचे दिसून येत नाही.तालुक्यातील खडकी ग्रामपंचायत अंतर्गत डोंगरगाव-डेपो, खडकी, खडकी-टोला व मुशानझोरवा या गावांची गट ग्रामपंचायत खडकी आहे. मुशनझोरवा हे आदिवासी बहूल गाव आजही विकासापासून कोसो दूर आहे. या गावाची लोकसंख्या ४६ असून भलावी, मडावी, वरखडे, परतेकी हे गोंड समाजाचे लोक एकोप्याने राहतात. गावाला लागूनच नवेगाव- नागझिरा अभयारण्य आहे.गोंड समाजाचे लोक शेती करून आपली उपजीविका चालवितात. मात्र रोजगारासाठी त्यांना इतरत्र भटकावे लागत आहे. शेती आहे पण रानटी प्राण्यांच्या उपद्व्यापामुळे पिकाची चांगलीच नासाडी करतात.मूशानझोरवा हे गाव खडकी-टोला गावापासून २ किमी. अंतरवर आहे. या गाव परिसरात अस्वल, बिबट, रानगवा, तडस आदी प्राण्यांचा नेहमीच वावर असतो. जंगल व्याप्त रस्ता असल्यामुळे ये-जा करणे कठीण झाले आहे. गावात ५ वर्षां खालील १० बालके असून त्यांना शासनाचे बाल विकास प्रकल्प कार्यालयाकडून आहार पुरविला जात नसल्याची माहिती पुढे आली आहे. तालुक्यातील कुपोषणाचे प्रमाण कमी करण्यासाठी अंगणवाडी केंद्र उघडण्याची नितांत गरज आहे. गावात शाळा नसल्यामुळे ५ वर्षांपेक्षा मोठ्या बालकांना शिक्षण घेण्यासाठी खडकी गावात पायी जावे लागते. शासकीय-निमशासकीय कामांसाठी व बाजारानिमित्त सडक-अर्जुनी येथे १५ किलोमीटर यावे लागते. त्यात बस सुविधा नसल्याने जास्तच त्रास सहन करावा लागतो. आरोग्य विभागाच्या कर्मचाऱ्यांचे दर्शन होत नसल्याचे दिसून येत आहे.तालुक्यातील डोंगरपायथ्याशी असलेल्या मूशानझोरवा गावात कोणताही मोठा अधिकारी आजपर्यंत कधीच गेला नाही, हे विशेष. गावात जाण्यासाठी पक्का रस्ता नसून जंगलातून वाट शोधत मूशानझोरवा गावाकडे नागरिकांना वाट शोधत जावे लागते. विशेष म्हणजे, रात्रीच्यावेळी त्यांची पाळीव कुत्री सोबतीला असतात.गाव जंगलात असल्यामुळे वन्यप्राण्यांचा धोका निर्माण होण्याची शक्यता जास्त बळावली आहे. त्यासाठी वन्य जीव विभागाने प्राण्यांचा बंदोबस्त करण्यासाठी गावाचे बाहेर तारांची सुरक्षा भिंत करण्याची नितांत गरज आहे.मूशानझोरवा गावची लोकसंख्या फारच कमी असल्यामुळे तिथे मिनी अंगणवाडी केंद्र देण्यासंबंधी माहिती शासनाकडे पाठविली आहे.-प्रकाश मेंढेबाल विकास प्रकल्प अधिकारी,पंचायत समिती, सडक अर्जुनी