लोकमत न्यूज नेटवर्कसडक अर्जुनी : जमिनीच्या वादातून थोरल्या भावाने आपल्या मुलाच्या मदतीने शेतात झोपेत असलेल्या धाकट्या भावाचा खून केला. तालुक्यातील ग्राम रेंगेपार येथे बुधवारी (दि.९) रात्री ही घटना घडली. गुरूवारी (दि.१०) सकाळी हा प्रकार उघडकीस आला. पोलिसांनी आरोपी बाप-लेकास अटक केली आहे. मृताचे नाव मनोहर नंदलाल उईके (५१) असे आहे.प्राप्त माहितीनुसार,जमिनीच्या हिस्से वाटणीला घेऊन मनोहर व त्याचा थोरला भाऊ आरोपी ताराचंद नंदलाल उईके (५५) यांच्यात जुना वाद सुरू आहे. या वादाला घेऊनच मनोहरने नंदलालचा मुलगा कन्हैया उईके (३५) याच्या विरोधात डुग्गीपार पोलीस ठाण्यात फेब्रुवारी महिन्यात तक्रार केली होती.यानंतर पोलिसांनी त्याला अटक केली होती. याचाच राग नंदलाल व कन्हैया यांच्या डोक्यात होता आणि नंदलालचा काटा काढण्याची वाट ते बघत होते. यादरम्यान, बुधवारी (दि.९) मनोहर आपल्या शेतातील पिकांचा रानडुकरांपासून बचाव करण्यासाठी शेतातील मचानवर झोपला होता. हीच संधी साधून ताराचंद व कन्हैया यांनी मनोहरच्या मानेवर आणि छातीवर कुºहाडीने १५-२० वार करून जागीच ठार केले.गुरूवारी (दि.१०) सकाळी ६ वाजतादरम्यान गावकऱ्यांना हा प्रकार लक्षात आला. ते दोघे घरी परतले असता त्यांचे कपडे व हात-पाय रक्ताने माखलेले दिसले.प्रकरणाची माहिती मिळताच पोलीस निरीक्षक विजय पवार यांच्यापुढे ताराचंदच्या पत्नीने सर्व प्रकरण सांगितले. पोलिसांनी लगेच दोघांना अटक केली असून पुढील तपास उपविभागीय पोलीस अधिकारी प्रशांत ढोले यांच्या मार्गदर्शनात डुग्गीपार पोलीस करीत आहेत.
जमिनीच्या वादातून धाकट्या भावाचा खून
By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: October 11, 2019 06:00 IST
यानंतर पोलिसांनी त्याला अटक केली होती. याचाच राग नंदलाल व कन्हैया यांच्या डोक्यात होता आणि नंदलालचा काटा काढण्याची वाट ते बघत होते. यादरम्यान, बुधवारी (दि.९) मनोहर आपल्या शेतातील पिकांचा रानडुकरांपासून बचाव करण्यासाठी शेतातील मचानवर झोपला होता. हीच संधी साधून ताराचंद व कन्हैया यांनी मनोहरच्या मानेवर आणि छातीवर कुºहाडीने १५-२० वार करून जागीच ठार केले.
जमिनीच्या वादातून धाकट्या भावाचा खून
ठळक मुद्देरेंगेपार येथील घटना : बाप-लेकास केली अटक