शहरं
Join us  
Trending Stories
1
अनिल अंबानी समूहाच्या कर्ज प्रकरणात ७३ हजार कोटी रुपयांचा महाघोटाळा; CBIचा दावा
2
आसाममध्ये हिमंता बिस्वा सरमा सत्ता टिकवणार की, गौरव गोगोई समीकरणे बदलणार?
3
इराणमधील अनेक शहरांवर बॉम्ब हल्ले; शैक्षणिक संस्थाही लक्ष्य, २५ हून अधिक नागरिक ठार
4
आयपीओंचा महापूर, ३८ ‘ड्राफ्ट पेपर’ दाखल! १२४ कंपन्या मुहूर्ताच्या प्रतीक्षेत, गुंतवणूकदारांची चांदी
5
तामिळनाडूमध्ये ७५ टक्के मंत्रिमंडळ भ्रष्टाचाराच्या खाईत अडकलेले : देवेंद्र फडणवीस
6
सोने दीड लाखावर, तरी खरेदी जोरात; आयात तुफान वाढली, भारताला स्वित्झर्लंडच्या सोन्याचा मोह
7
इराणला एका रात्रीत नष्ट करू शकतो आणि ती रात्र मंगळवारची रात्रही असू शकते; ट्रम्प यांच्या विधानाने जगात खळबळ
8
IPL 2026 : PBSK विरुद्धही अजिंक्य रहाणे चुकला! पण पावसाच्या बॅटिंगमुळे वाचला! KKR नं मॅच न जिंकता उघडले खाते
9
"धड भाषणही देता न येणाऱ्या, कुटुंबीयांच्या पुण्याईवर खासदार झालेल्या मुलाने...", काँग्रेसने पार्थ पवारांना सुनावले
10
अर्शदीप सिंग 'या' अभिनेत्रीला करतोय डेट? क्रिकेटरने चेहरा लपवला, पण टॅटूमुळे नेटकऱ्यांनी तिला ओळखलं
11
इराणच्या सर्वात मोठ्या पेट्रोकेमिकल प्लांटवर हवाई हल्ला; इस्रायलचे संरक्षण मंत्री म्हणाले, पूर्ण ताकदीने हल्ले करणार
12
दोन दिवसात भारताच्या किती जहाजांनी पार केली होर्मुझची सामुद्रधुनी; केंद्र सरकारने सांगितली सद्यस्थिती
13
सांगली जिल्ह्यात दोन खासदार, नऊ आमदार होतील; चंद्रकांत पाटील यांचे सूचक वक्तव्य 
14
अशोक खरातसोबत नेत्यांचे संबंध; शरद पवार म्हणाले, 'आमच्यातील लोकप्रतिनिधी जाऊन जे काही...'
15
Thane Crime: खासगी बोलण्याचा बहाणा, हॉटेलमध्ये नेले आणि नर्सवर दोन वेळा बलात्कार
16
१,८९८ कोटींची थकबाकी, ‘पीडब्ल्यूडी’ची देणी थकल्याने रस्ते-पूल कामे ठप्प होणार? ठेकेदारांचे कामबंद आंदोलन
17
IPL 2026 : शाहरुख खानची खास झलक! सुहानाचा स्टायलिश लूकही ठरला लक्षवेधी; इथं पाहा व्हिडिओ
18
बंदूक नव्हे आता अक्कल पाजळणार! भारताविरोधात असीम मुनीरचा कांड; पाकिस्तानचा नवा कुरापती प्लॅन
19
Latest Marathi News LIVE Updates:इराणच्या हल्ल्यात चार इस्रायली नागरिकांचा मृत्यू, इमारतीच्या ढिगाऱ्याखाली मिळाले मृतेदह
20
IPL 2026, MI vs RR : हार्दिक पांड्या खेळणार का? MI कोच म्हणाले, तो काही दुखापतग्रस्त नव्हता, तर...
Daily Top 2Weekly Top 5

महिलेच्या हत्येचे गूढ कायम

By admin | Updated: July 11, 2015 02:06 IST

येथील गजबजलेल्या कापगते वसाहतीत एका व्यापाऱ्याच्या घरी लुटमार करून पत्नीची दुपारी भरदिवसा हत्या झाली.

पोलिसांपुढे तपासाचे आव्हान : नगरात कडकडीत बंद अर्जुनी-मोरगाव : येथील गजबजलेल्या कापगते वसाहतीत एका व्यापाऱ्याच्या घरी लुटमार करून पत्नीची दुपारी भरदिवसा हत्या झाली. या हत्येचे रहस्य अद्यापही कायम आहे. शुक्रवारी (दि.१०) सकाळी ग्रामीण रुग्णालयात शवचिकित्सा केल्यानंतर दुपारी सुमारे १२ वाजता स्थानिक स्मशानघाटावर शोकाकुल वातावरणात अंत्यसंस्कार करण्यात आले. दरम्यान नगरात शुक्रवारी कडकडीत बंद पाळण्यात आला. या हत्येचा उलगडा करण्याचे मोठे आव्हान पोलिसांसमोर आहे.प्राप्त माहितीनुसार, गुरुवारी दुपारी येथील नितू सुरेश पशिने (४५) या महिलेची हत्या करण्यात आली. हत्या केल्यानंतर मारेकरी पसार झाले. मात्र नेमकी हत्या कोणत्या कारणावरून झाली या बाबीचा उलगडा होऊ शकला नाही. नेमके पैसे किती चोरीला गेले याची माहिती उघड झाली नाही. मृतक या एक दिवसांपूर्वी बँकेत गेल्या होत्या मात्र त्यांनी बँकेतून पैसे काढले नाही. घरात असलेले पैसे चोरीला गेल्याचे समजते. मृतक महिला बँकेत नेमकी कशासाठी गेली होती ते कळू शकले नाही. हत्येनंतरही महिलेच्या अंगावरील दागिने मात्र जैसे थे होते. पोलिसांनी मृतकाचे पती सुरेश यांची यासंदर्भात विचारपूस केली. ते अद्यापही यातून सावरले नाहीत. नेमके काय चोरीला गेले याची त्यांनाही माहिती नाही. त्यामुळे हत्येचे कारण नेमके लुटमार आहे की अन्य काही याबाबत संभ्रम कायम आहे.शुक्रवारी सकाळी इन कॅमेरा शवविच्छेदन करण्यात आले. त्यानंतर अंत्यसंस्कार करण्यात आले. व्यापारी संघटनेतर्फे बंद पुकारण्यात आला होता. नगरातील शाळा, व्यापाराी प्रतिष्ठाने कडकडीत बंद होती. मारेकऱ्यांचा त्वरित शोध लावावा या मागणीचे व्यापारी संघटनेतर्फे निवेदन तहसीलदार रहांगडाले व उपविभागीय पोलीस अधिकारी गजानन राजमाने यांना देण्यात आले. त्यांनी लवकरच या प्रकरणी आरोपींना गजाआड करण्याचे आश्वासन दिले. ठाणेदार अभिषेक पाटील, सहा. पोलीस निरीक्षक राजेश गज्जल, उपनिरीक्षक रत्नदीप साळुंके तपास करीत आहेत. (तालुका प्रतिनिधी)