शहरं
Join us  
Trending Stories
1
बारावीचा आज निकाल; या संकेतस्थळांवर पाहता येणार..., कुठे आणि कसा पहावा...
2
अनैतिक संबंधातून वाद, जळगावात भररस्त्यात घडला थरार; पाठलाग करत युवकाला कायमचं संपवलं
3
दूत पाठवले म्हणून अजितदादांची शिंदेंवर नाराजी, पुढे काय?
4
India Pakistan: युद्धाचे ढग गडद होताच मध्यस्थीसाठी मुस्लिम देश आला पुढे, 'हा' नेता येणार भारत दौऱ्यावर
5
कानपूरमध्ये ६ मजली इमारतीला भीषण आग; एकाच कुटुंबातील ५ जणांचा होरपळून मृत्यू
6
जातीनिहाय जनगणनेची फार वर्षे वाट पाहिली, अखेर निर्णय झाला!
7
Today Daily Horoscope: आजचे राशीभविष्य: या व्यक्तींची लग्न जुळू शकतात; लाभदायक बातम्या प्राप्त होतील!
8
तंदूरी रोटी बनली मृत्यूचं कारण! लग्न समारंभात भिडले २ युवक; हाणामारीत दोघांचा जीव गेला
9
संपादकीय: ...शिक्षा शेतकरी भावाला! घोटाळा सरकारनेच मान्य केला हे बरे झाले...
10
छोटा दत्तू आला! 'महाराष्ट्राची हास्यजत्रा' फेम अभिनेता झाला बाबा, लग्नानंतर २ वर्षांनी दिली गुडन्यूज
11
भारताने रोखले चिनाबचे पाणी, लवकरच झेलमचेही थांबवणार
12
राज्यातील २,९९७ प्रकल्पांत ३३ टक्के पाणी शिल्लक; पातळी आणखी खालावणार
13
कर्नाळा येथे खाजगी प्रवासी बस उलटली; दोन प्रवाशांचा मृत्यू 
14
‘भारताबरोबर युद्ध झाले तर मी इंग्लंडला पळून जाईन’; पाकिस्तानी खासदार शेर मारवत यांचे अजब विधान 
15
‘जर्मन हँगर’ मंडपात राज्य मंत्रिमंडळाची बैठक
16
निवडणूक आयोगाचे ४० मोबाइल ॲप्स एकाच प्लॅटफॉर्मवर; नाव शोधणे, तक्रार करणे सोयीचे
17
बँक, विमा, म्युच्युअल फंड असाे की शेअर बाजार; एकाच ठिकाणी होणार ‘केवायसी’ 
18
२७,८३७ विद्यार्थी आज देणार एमएचटी सीईटीची फेरपरीक्षा 
19
पाऊस पडायला अजून दीड महिना, अन् मे महिन्याच्या प्रारंभीच मुंबईचा पाणीसाठा २३ टक्क्यांवर
20
जे. जे. सुपर स्पेशालिटी रुग्णालयाबाबत आणखी ‘तारीख पे तारीख’ नको ! 

ठाणेदारासह पाचजणांवर खुनाचा गुन्हा

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: May 29, 2021 04:22 IST

नरेश रहिले गोंदिया : आमगाव येथील जिल्हा परिषद शाळेत करण्यात आलेल्या चोरीच्या प्रकरणात अटकेत असलेल्या आरोपी राजकुमार अभयकुमार (वय ...

नरेश रहिले

गोंदिया : आमगाव येथील जिल्हा परिषद शाळेत करण्यात आलेल्या चोरीच्या प्रकरणात अटकेत असलेल्या आरोपी राजकुमार अभयकुमार (वय ३०, रा. कुंभारटोली) याला तुरुंगातच बेदम मारहाण करण्यात आली. या बेदम मारहाणीमुळे राजकुमार याचा मृत्यू झाला आहे. या प्रकरणात आमगावच्या ठाणेदारासह पाचजणांवर खून केल्याचा गुन्हा नोंदविण्यात आला आहे.

आमगाव येथील जिल्हा परिषद शाळेतून दोनवेळा संगणक संच व एलसीडीची चोरी करणाऱ्या चार आरोपींना स्थानिक गुन्हे शाखेच्या पथकाने २० मे रोजी ताब्यात घेतले होते. मात्र त्यात एक अल्पवयीन बालक असल्याने त्याला सोडून तिघांना अटक करून आमगाव पोलिसांच्या स्वाधीन केले होते. या प्रकरणात कुंभारटोली येथील राजकुमार अभयकुमार याला बेदम मारहाण झाल्यानेच त्याचा मृत्यू झाला. यामुळे मृत्यूला जबाबदार आमगावचे ठाणेदार सुभाष सदाशिव चव्हाण (वय ४१), सहायक पोलीस निरीक्षक महावीर शिवाजी जाधव (४०), ठाणेदाराचा वाहनचालक पोलीस हवालदार खेमराज मार्कंड खोब्रागडे (५२, बक्कल नंबर १०१४), पोलीस शिपाई अरुण देवाजी उईके (३३, बक्कल नंबर १८७७) व दत्तात्रय ज्ञानोबा कांबळे (३३, बक्कल नं. १७८०) यांच्यावर सीआयडीचे पोलीस निरीक्षक विनोद वाकडे यांच्या तक्रारीवरून आमगाव पोलीस ठाण्यात भादंवि कलम ३०२, ३३०, ३४ अन्वये गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

आमगाव पोलीस ठाण्यातील अप क्र ७०/२०२१ कलम ४६१, ३८०, ३४ या गुन्ह्याचा तपास करताना आमगाव पोलिसांनी अटक आरोपी राजकुमार अभयकुमार याला बेदम मारहाण केल्यामुळे पोलीस कोठडीत त्याचा मृत्यू झाला. यासंदर्भात सीआयडीने आमगाव येथील न्यायाधीशांच्या उपस्थितीत या घटनेतील आयविटनेस सुरेश धनराज राऊत व राजकुमार गोपीचंद मरकाम यांचे बयाण नोंदविले. त्यांनीही आमगाव पोलिसांनी केलेल्या मारहाणीमुळेच मृत्यू झाल्याचे म्हटले आहे. आमगाव पोलिसांनी लाकडी दांडा व पट्ट्याने जबर मारहाण केल्यामुळे राजकुमारचा मृत्यू झाला आहे.

बॉक्स

साीयआयडीने केले पुरावे गोळा

आमगाव येथील पोलीस कोठडीत राजकुमारचा मृत्यू झाला. त्यासंदर्भात सीआयडीने आतापर्यंत केलेल्या चौकशीत इन्क्वेस्ट पंचनामा, शवविच्छेदन अहवाल, साक्षीदारांचे जबाब, घटनास्थळावरील पुरावे यांचे अवलोकन करून ठाणेदार सुभाष चव्हाण, एपीआय महावीर जाधव, वाहनचालक खेमराज खोब्रागडे, पोलीस शिपाई अरुण उके यांनी अपराध क्रमांक ३२६/२०२० भादंविचे कलम ४५७,३८० मधील चोरीचा माल हस्तगत करण्यासाठी आमगाव पोलिसांनी अटक असलेल्या आरोपींना लाकडी दांडा असलेल्या पट्ट्याने व हाता-पायाने बेदम मारहाण केली. त्याचा जीव जाऊ शकतो, याची माहिती असतानाही राजकुमार अभयकुमार याला पट्ट्याने व हाता-पायाने डोक्यात, पाठीवर, पायावर, हातावर, तळपायावर, कानावर, मानेवर मारहाण करून जीव घेतल्याची तक्रार पोलिसांत दिली आहे.

-------------------------------

सीआयडीने दिलेली तक्रारीची प्रत व्हायरल

आमगाव येथील पोलीस कोठडीतील मृत्यू प्रकरणात पोलीस निरीक्षकासह पाच पोलिसांवर खुनाचा गुन्हा दाखल करण्यासंबंधी सीआयडीचे पोलीस निरीक्षक विनोद बाळकृष्ण वाकडे यांनी आमगाव पोलिसांत तक्रार दिली. त्या तक्रारीची प्रत गोंदिया जिल्ह्यातील पोलिसांच्या ग्रुपवर व्हायरल झाल्याने गुप्तता राहिलेली नाही. वाकडे यांनी दिलेल्या तक्रारीत मृत राजकुमारला मारहाण केल्याच्या वैद्यकीय अहवालातील काही मुद्दे त्या फिर्यादीत देण्यात आले आहे. सीआयडीनेही या कोठडीतील अहवालासंदर्भात गुप्तता पाळली नाही. या प्रकरणाचा तपास सुरूच असताना सीआयडीने दिलेल्या तक्रारीची प्रत व्हायरल होणे ही तपास यंत्रणेवर प्रश्नचिन्ह निर्माण करणारी बाब आहे.