शहरं
Join us  
Trending Stories
1
अनिल अंबानी समूहाच्या कर्ज प्रकरणात ७३ हजार कोटी रुपयांचा महाघोटाळा; CBIचा दावा
2
आसाममध्ये हिमंता बिस्वा सरमा सत्ता टिकवणार की, गौरव गोगोई समीकरणे बदलणार?
3
तामिळनाडूमध्ये ७५ टक्के मंत्रिमंडळ भ्रष्टाचाराच्या खाईत अडकलेले : देवेंद्र फडणवीस
4
सोने दीड लाखावर, तरी खरेदी जोरात; आयात तुफान वाढली, भारताला स्वित्झर्लंडच्या सोन्याचा मोह
5
इराणला एका रात्रीत नष्ट करू शकतो आणि ती रात्र मंगळवारची रात्रही असू शकते; ट्रम्प यांच्या विधानाने जगात खळबळ
6
IPL 2026 : PBSK विरुद्धही अजिंक्य रहाणे चुकला! पण पावसाच्या बॅटिंगमुळे वाचला! KKR नं मॅच न जिंकता उघडले खाते
7
"धड भाषणही देता न येणाऱ्या, कुटुंबीयांच्या पुण्याईवर खासदार झालेल्या मुलाने...", काँग्रेसने पार्थ पवारांना सुनावले
8
अर्शदीप सिंग 'या' अभिनेत्रीला करतोय डेट? क्रिकेटरने चेहरा लपवला, पण टॅटूमुळे नेटकऱ्यांनी तिला ओळखलं
9
इराणच्या सर्वात मोठ्या पेट्रोकेमिकल प्लांटवर हवाई हल्ला; इस्रायलचे संरक्षण मंत्री म्हणाले, पूर्ण ताकदीने हल्ले करणार
10
दोन दिवसात भारताच्या किती जहाजांनी पार केली होर्मुझची सामुद्रधुनी; केंद्र सरकारने सांगितली सद्यस्थिती
11
सांगली जिल्ह्यात दोन खासदार, नऊ आमदार होतील; चंद्रकांत पाटील यांचे सूचक वक्तव्य 
12
अशोक खरातसोबत नेत्यांचे संबंध; शरद पवार म्हणाले, 'आमच्यातील लोकप्रतिनिधी जाऊन जे काही...'
13
Thane Crime: खासगी बोलण्याचा बहाणा, हॉटेलमध्ये नेले आणि नर्सवर दोन वेळा बलात्कार
14
१,८९८ कोटींची थकबाकी, ‘पीडब्ल्यूडी’ची देणी थकल्याने रस्ते-पूल कामे ठप्प होणार? ठेकेदारांचे कामबंद आंदोलन
15
IPL 2026 : शाहरुख खानची खास झलक! सुहानाचा स्टायलिश लूकही ठरला लक्षवेधी; इथं पाहा व्हिडिओ
16
बंदूक नव्हे आता अक्कल पाजळणार! भारताविरोधात असीम मुनीरचा कांड; पाकिस्तानचा नवा कुरापती प्लॅन
17
Latest Marathi News LIVE Updates:इराणच्या हल्ल्यात चार इस्रायली नागरिकांचा मृत्यू, इमारतीच्या ढिगाऱ्याखाली मिळाले मृतेदह
18
IPL 2026, MI vs RR : हार्दिक पांड्या खेळणार का? MI कोच म्हणाले, तो काही दुखापतग्रस्त नव्हता, तर...
19
सुनेत्रा पवारांना पाठिंबा दिला, पण प्रचार करणार की नाही, शरद पवारांनी मांडली भूमिका; काँग्रेसबद्दल काय बोलले?
20
‘त्या’ घटनेतील तिसरी हत्या पोलिस व सुरक्षारक्षकांच्या डोळ्यासमोर; व्हिडिओ व्हायरल
Daily Top 2Weekly Top 5

नगर पालिकेच्या कर्मचाऱ्यांचे आंदोलन समाप्त

By admin | Updated: July 26, 2014 02:24 IST

राज्यातील सर्व परिषदेच्या कर्मचाऱ्यांनी आपल्या विविध

मुख्यमंत्र्यांचे आश्वासन : सुधारित आकृतिबंद आराखड्यानुसार होणार नियुक्यागोंदिया : राज्यातील सर्व परिषदेच्या कर्मचाऱ्यांनी आपल्या विविध मागण्यांसाठी १५ जुलैपासून बेमुदत आंदोलन सुरू केले होते. २३ जुलै रोजी संघटनेच्या पदाधिकाऱ्यांशी मुख्यमंत्र्यांनी चर्चा करून मागण्या पूर्ण करण्याचे आश्वासन दिल्याने न.प. कर्मचाऱ्यांनी आपले बेमुदत आंदोलन समाप्त केले. प्राप्त माहितीनुसार, महाराष्ट्र राज्य नगर परिषद कर्मचारी/संवर्ग कर्मचारी संघटनेचे अध्यक्ष विश्वनाथ घुगे व इतर पदाधिकाऱ्यांनी २३ जुलै रोजी मुख्यमंत्री पृथ्वीराज चव्हाण व नगरविकास राज्यमंत्री उदय सामंत यांच्याशी नगर परिषदेच्या कर्मचाऱ्यांच्या विविध मागण्यांवर चर्चा करण्यात आली. चर्चेनुसार, नगर परिषद कर्मचारी व सेवानिवृत्त कर्मचाऱ्यांना १०० टक्के वेतन शासनाद्वारे दिला जाईल. तसेच नगर परिषदेच्या सन २००० पूर्वीच्या रोजंदारी कर्मचाऱ्यांना सेवेत कायम करण्यासाठी सुधारित आकृतीबंद आराखडा तयार करून त्यात नियुक्ती करण्यासाठी कार्यवाही केली जाईल. याशिवाय इतर मागण्यांवरही सकारात्मक कार्यवाही करण्याचे आश्वासन मुख्यमंत्री चव्हाण यांनी दिले. त्यामुळे नगर परिषदेच्या सर्व कर्मचाऱ्यांमध्ये आनंदाचे वातावरण निर्माण झाले आहे. नगर परिषद कर्मचाऱ्यांच्या मागण्यांना मान्य करण्यासाठी मुख्यमंत्री चव्हाण, नगरविकास राज्यमंत्री उदय सामंत, तसेच महाराष्ट्र राज्य नगर परिषद कर्मचारी/संवर्ग कर्मचारी संघटनेचे अध्यक्ष विश्वनाथ घुगे, संघटनेचे इतर पदाधिकारी व चर्चेत उपस्थित इतर लोकप्रतिनिधी यांचे महाराष्ट्र राज्य नगर परिषद कर्मचारी/संवर्ग कर्मचारी संघटना शाखा गोंदियाचे अध्यक्ष छेदीलाल ईमलाह यांनी आभार मानले. (प्रतिनिधी)शहरात अस्वच्छता कायमनगर पालिका कर्मचाऱ्यांच्या आंदोलनात सफाई कर्मचाऱ्यांचाही सहभाग होता. शासनाने २३ जुलै रोजी त्यांच्या मागण्या पूर्ण करण्याचे आश्वासन दिले. त्यामुळे आंदोलन समाप्त झाले. पण गोंदिया शहरातील अस्वच्छता कायमच आहे. शुक्रवारी शहराचा फेरफटका मारला असता ठिकठिकाणी घाणीचे साम्राज्य आढळले. आंदोलन संपल्यावर नगर परिषदेच्या वरिष्ठ अधिकाऱ्यांनी सफाई कामगारांकडून शहराची स्वच्छता करून घेतली नाही काय? असा प्रश्न नागरिकांना पडला आहे.