शहरं
Join us  
Trending Stories
1
Delhi Assembly: दिल्ली विधानसभा परिसरात मोठी खळबळ, VIP गेट तोडून घुसली अज्ञात कार, तपास सुरू!
2
आयआयटी बाबाने गुपचूप लग्न उरकले! जोड्याने सरप्राईज द्यायला गावी गेले, संन्यास सोडून संसारातील 'अध्यात्म' सांगणार?
3
चीनकडून काहीतरी वेगळेच सुरु आहे...! अमेरिका-इराण युद्धाच्या सावटात सोन्या-चांदीची प्रचंड खरेदी; डॉलरला शह देण्यासाठी नवी चाल?
4
पाकिस्तानचा शांतता प्रस्ताव इराणने फेटाळला; राष्ट्रीय हितांवर तडजोड नाही, इराणची स्पष्टोक्ती...
5
Delhi Assembly: दिल्ली विधानसभेत कार घुसल्यानंतर पुढील ५ मिनिटं काय घडलं? प्रत्यक्षदर्शीनं सांगितला संपूर्ण थरार!
6
सकाळी रडवले, दुपारी हसवले! शेअर बाजाराची 'रॉकेट' भरारी; 'या' ४ कारणांमुळे गुंतवणूकदारांची चांदी
7
जगातील भल्याभल्या देशांना 'या' बाबतीत तगडी टक्कर देतो इराण; अमेरिका तर त्यांच्या आसपासही नाही!
8
इराणचा 'डिजिटल' बॉम्ब! जगाचा इंटरनेट संपर्क तोडण्याची धमकी; समुद्राखालील केबल्स कापल्यास महाभयंकर संकट?
9
Video: शिंदेसेनेच्या ज्योती वाघमारेंना खासदारकीची शपथ घेताना मध्येच थांबवले; संसदेत काय घडलं?
10
Astro: सावधान! नशिबाला दोष देण्यापूर्वी एकदा 'हे' वाचा; तुमच्या कोणत्या साध्या चुकीमुळे कोणता ग्रह कोपतोय?
11
सोने-चांदीवरील आयात शुल्कात मोठी कपात! दागिन्यांचे दर उतरणार? तोळ्यामागे ११,७०० रुपयांचा दिलासा
12
शेतकरी ते उद्योजक! मुद्रा कर्जाच्या मदतीने उभा करा स्वतःचा व्यवसाय; जाणून घ्या अर्ज करण्याची प्रक्रिया
13
पाकिस्तानात ४ दिवस वर्किंग, बांगलादेशात सं. ७ नंतर मॉल बंद; तेल संकटात शेजारील देशांनी काय केले?
14
Divya Singh : अभूतपूर्व! कडाक्याची थंडी, खांद्यावर सायकल; माउंट एव्हरेस्ट बेस कॅम्प गाठून दिव्या सिंहने रचला इतिहास
15
लोकप्रिय मराठी अभिनेत्रीने दुसऱ्यांदा बांधली लग्नगाठ, इंडस्ट्रीतलाच आहे नवरा; ओळखलंत का?
16
"दादांचं स्वप्न, बारामतीचा ध्यास... दुःख तळघरात कोंडलं अन्...!"; उमेदवारी अर्ज भरण्यापूर्वी सुनेत्रा पवार भावुक, दिलं मोठं वचन
17
अखेर ट्रायम्फने ३५० सीसीची मोटरसायकल लाँच केली! जीएसटीचा फायदा अन् किंमत पाहून म्हणाल...
18
"काळजी करू नका, एकाही कार्यकर्त्याला वाऱ्यावर सोडणार नाही, दादांचा जनता दरबार..."; सुनेत्रा पवार यांचा शब्द
19
इराणच्या होर्मुझमधून निघालं भारताचं ८वं जहाज, २० हजार टन LPG घेऊन 'ग्रीन आशा' मायदेशात येणार!
20
तरुणीचा 'शोले' स्टाईल ड्रामा! असं काय घडलं की मोबाईल टॉवरवर चढून तरुणीने घरच्यांना दिली धमकी?
Daily Top 2Weekly Top 5

पालिकेच्या मोहिमेने शहरातील पशुपालक नाराज

By admin | Updated: September 19, 2016 00:24 IST

मोकाट जनावरांमुळे वाहतुकीला होत असलेली अडसर शिवाय अपघातांवर आळा बसावा यासाठी नगर परिषदेने शहरात मोकाट जनावरांची धरपकड मोहीम सुरू केली आहे.

कर्मचाऱ्यांसोबत बाचाबाची : कोंडवाड्याचे कुलूप तोडले गोंदिया : मोकाट जनावरांमुळे वाहतुकीला होत असलेली अडसर शिवाय अपघातांवर आळा बसावा यासाठी नगर परिषदेने शहरात मोकाट जनावरांची धरपकड मोहीम सुरू केली आहे. मात्र पालिकेच्या या मोहिमेमुळे पशुपालक नाराज असून ते पशू पकडणाऱ्या कर्मचाऱ्यांसोबत बाचाबाची करीत आहेत. एवढेच नव्हे तर त्यांनी मोकाट पशुंना बंद करून ठेवलेल्या कोंडवाड्याचे कुलूपही तोडल्याची माहिती आहे. शहरात बघावे तेथे रस्त्यांवर मोकाट जनावरांचा वावर दिसून येत होता. या मोकाट जनावरांमुळे वाहतुकीला अडसर होत असून नागरिकांना वाहन चालविणे कठीण होऊ लागले होते. शिवाय रात्रीच्या वेळी विशेषत: मोकाट जनांवरांमुळे अपघात घडले आहेत. विशेष म्हणजे जनावरांमुळे घडलेल्या अपघातांत जीवीतहानीही झाली आहे. या सर्व बाबींना लक्षात घेत जिल्हाधिकारी डॉ. विजय सुर्यवंशी यांनी मध्यंतरी बैठक बोलावून नगर परिषदेला मोकाट जनावरांना पकडून वाहतूक व्यवस्था सुरळीत करण्याचे निर्देश दिले होते. तसेच पोलीस विभागाकडूनही नगर परिषदेला मोकाट जनावरांची व्यवस्था करण्यासंदर्भात पत्र देण्यात आले होते. या सर्व बाबींना गांभीर्याने घेत नगर परिषदेने शहरातील मोकाट जनावरांना पकडण्याची मोहीम सुरू केली आहे. नगर परिषदेकडे मनुष्यबळ कमी असल्यामुळे सध्या प्रायोगीक तत्वावर कंत्राटी पद्धतीवर २९ आॅगस्ट पासून ही मोहीम सुरू करण्यात आली असून यासाठी एक विशेष वाहन कार्यरत आहे. या वाहनात मोकाट जनावरे पकडून त्यांना नगर परिषदेच्या बाजूला जुन्या अग्निशमन कार्यालयात सोडले जात आहे. पालिकेच्या या मोहिमेचे शहरवासीयांकडून कौतूक केले जात आहे. मात्र पशुपालकांत या मोहिमेने रोष व्याप्त आहे. पशुंना पकडण्यात येत असल्याने हे पशुपालक आता भांडणावर उतरले असल्याचीही माहिती आहे. शिवाय ते पशु पकडणाऱ्या कर्मचाऱ्यांसोबत बाचाबाची करीत असल्याचेही कळले. तर दोन दिवसांपूर्वी पशुंना कोंडून ठेवण्यात येत असलेल्या कोंडवाड्याचे कुलूप तोडण्यात आल्याचा प्रकारही घडल्याची माहिती आहे. या प्रकारामुळे पशू पकडणारे कर्मचारी दहशतीत वावरत आहेत. फाडली जाते ३०० रूपयांची पावती पशुंना पकडण्यात आल्यानंतर त्यांना सोडण्यासाठी नगर परिषदेकडून ३०० रूपयांची पावती फाडली जात आहे. पावती फाडल्यानंतरच पशुला सोडले जात आहे. पैसे लागत असल्यामुळेच पशुपालक संतापले आहेत. आतापर्यंत पशु मोकाट फिरत होते याची त्यांना चिंता नव्हती. मात्र आता पशुंना सोडविण्यासाठी पैसे लागत असल्याने ते भांडणावर आले आहेत. पशुपालकांच्या सहकार्याची गरज मोकाट पशुंमुळे होत असलेले अपघात टाळण्यासाठी व वाहतुकीची अडसर दूर करण्यासाठी पालिकेने ही मोहिम हाती घेतली आहे. विशेष म्हणजे अपघातांत एखादा मनुष्य जखमी होऊन जीवीतहानीची शक्यता टाळता येत नाही. तर दुसरीकडे पशुंच्या जीवावरही बेतणार असल्याची शक्यता टाळता येत नाही. यासाठी पशु पकडणे सुरू आहे. त्यामुळे पशुपालकांनी पालिकेला सहकार्य करण्याची गरज आहे.