शहरं
Join us  
Trending Stories
1
उपराष्ट्रपती जे.डी. व्हान्स यांना पाकिस्तानात जायला वाटतेय भीती; US-इराण चर्चा फिस्कटणार?
2
"...तोपर्यंत आम्ही हल्ले करत राहू", इस्रायलचे पंतप्रधान नेतन्याहू यांचा इशारा; हल्ल्याचे व्हिडीओही दाखवले
3
KKR vs LSG : अर्जुन तेंडुलकरची नुसतीच हवा! Playing XI मध्ये मिळाली नाही जागा; अजिंक्य रहाणेचा गेम प्लॅनही फसला
4
बुलेट आली! पहिली इलेक्ट्रिक बाईक 'Flying Flea C6' लाँच; किंमत आणि फिचर्स पाहून व्हाल थक्क
5
टी-२० सामन्यात तब्बल ९ विकेट्स, एका षटकांत ४ बळी; कधीही न तुटणारा वर्ल्ड रेकॉर्ड कुणी बनवला?
6
रशियाच्या पाणबुड्या महिनाभर ब्रिटनच्या समुद्रात लपलेल्या, काय करत होत्या? ब्रिटीशांच्या दाव्याने खळबळ...
7
ट्रम्प यांच्या दाव्याने खळबळ, १०० मिसाईल...! 'शांतीदूत' म्हणवून घेणारा पाकिस्तान 'बेनकाब'; चीनचा बुरखा फाटला
8
अजबच विनोद...! अमेरिका-इराण सीजफायरनंतर पाकिस्तानची थेट 'नोबेल' शांतता पुरस्काराची मागणी
9
Fashion On Bike: बाईकवर लॉन्ग राईडचा प्लॅन आहे? फॉलो करा 'या' फॅशन टिप्स; दिसाल कूल आणि डॅशिंग!
10
“मला माफ कर, चूक झाली”; प्रेमासाठी तरुणाचा हायव्होल्टेज ड्रामा; कॉलेजच्या भिंतींवर लावले पोस्टर्स
11
सुरक्षित होर्मुझ पार केले...१५,४०० मेट्रिक टन LPG गॅस भरलेले 'ग्रीन आशा' जहाज भारतात दाखल
12
CBSE चा नवा अल्टीमेटम..! आता सहावीच्या वर्गापासून शिकावी लागणार तिसरी भाषा; काय आहे R3 नियम?
13
एका मॅचसाठी मिळतात फक्त ७५० रुपये; बांगलादेशी खेळाडूची व्यथा ऐकून बीसीबी प्रमुख झाले शॉक!
14
खाकी वर्दीतला 'हा' चेहरा ओळखला का?; ज्यानं टीम इंडियाला पहिला टी-२० वर्ल्डकप जिंकवला
15
"दहशतवादी संघटनेशी संबंध”; कुटुंब ९ तास डिजिटल अरेस्टमध्ये; मुलाच्या हुशारीने वाचले ६ लाख
16
समुद्री चाचे लुटूनही सोबत घेऊन जाऊ शकले नाहीत, एवढा खजिना भारताच्या जहाजावर सापडला; हिरे, सोने, चांदी...
17
शस्त्रसंधी धोक्यात, भारताच्या चिंतेत वाढ! होर्मुझ सामुद्रधुनीत सध्या परिस्थिती काय आहे?
18
Travel : रात्री चमकणारा समुद्र अन् काचेची वाळू; जगातील सर्वात हटके बीचेस, भारतातील 'या' किनाऱ्याचाही समावेश!
19
अवघ्या २४ तासांतच फुस्सं झाला पाकिस्तानचा प्लॅन?; २५० मृत्यूनंतर तुर्कीनं इस्रायलला फटकारलं
20
Latest Marathi News LIVE: ...म्हणून मी माघार घेण्याचा निर्णय रद्द केला; करूणा मुंडेंचा दावा, बारामतीत लढणारच
Daily Top 2Weekly Top 5

कोविड केअर सेंटर सुरू करण्याच्या हालचाली

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: March 20, 2021 05:00 IST

जिल्ह्यात बोटावर मोजण्याइतपत आलेली बाधितांची संख्या पुन्हा ३२८ पर्यंत पोहोचली आहे. त्यात दररोज बाधितांची संख्या वेगाने वाढत असून, हीच स्थिती राहिल्यास मागीलवर्षीप्रमाणे रुग्णांची व्यवस्था करण्यासाठी जागेची कमतरता भासणार, यात शंका वाटत नाही. सध्या जिल्ह्यातील २४९ रुग्ण घरीच अलगीकरणात ठेवण्यात आले आहेत. मात्र हा प्रकारही धोक्याचाच असून, अशा रुग्णांपासूनही कोरोनाचा प्रसार होणार, यात शंका नाही.

ठळक मुद्देआरोग्य विभाग लागले कामाला : ४ तालुक्यांत पुन्हा सुरू होणार

लोकमत न्यूज नेटवर्कगोंदिया : जिल्ह्यात वेगाने होत असलेली कोरोनाबाधितांची वाढ बघता आता आरोग्य विभाग कामाला लागले आहे. बाधितांची वाढती संख्या बघता आता आरोग्य विभागाकडून ४ तालुक्यांत कोविड केअर सेंटर सुरू करण्यासाठी हालचाल सुरू झाली आहे. यामध्ये गोंदिया, सालेकसा, देवरी व अर्जुनी-मोरगाव तालुक्यांचा समावेश आहे. जिल्ह्यात बोटावर मोजण्याइतपत आलेली बाधितांची संख्या पुन्हा ३२८ पर्यंत पोहोचली आहे. त्यात दररोज बाधितांची संख्या वेगाने वाढत असून, हीच स्थिती राहिल्यास मागीलवर्षीप्रमाणे रुग्णांची व्यवस्था करण्यासाठी जागेची कमतरता भासणार, यात शंका वाटत नाही. सध्या जिल्ह्यातील २४९ रुग्ण घरीच अलगीकरणात ठेवण्यात आले आहेत. मात्र हा प्रकारही धोक्याचाच असून, अशा रुग्णांपासूनही कोरोनाचा प्रसार होणार, यात शंका नाही. अशात या सक्रिय रुग्णांची वेगळीच व्यवस्था करणे आहे. हीच बाब हेरून आरोग्य विभाग आतापासूनच यावर तोडगा म्हणून कोविड केअर सेंटर सुरू करण्यासाठी तयारीला लागले आहे. याअंतर्गत आरोग्य विभागाकडून जिल्ह्यातील गोंदिया, सालेकसा, देवरी व अर्जुनी-मोरगाव तालुक्यात कोविड केअर सेंटर सुरू करण्याच्या हालचाली सुरू आहेत. यात गोंदिया तालुक्यातील जिल्हा क्रीडा संकुल, सालेकसा येथे शासकीय आदिवासी मुलांचे वसतिगृह, देवरी येथील शासकीय निवासस्थान, तर अर्जुनी-मोरगाव तालुक्यातील ग्राम बाराभाटी येथील जिल्हा परिषद शाळेचे कोविड केअर सेंटरसाठी अधिग्रहण केले जाणार आहे. 

सोमवारपासून पॉलिटेक्निक कॉलेजमध्ये सुरू होणार मागीलवर्षी कोरोनाचा उद्रेक वाढला असता, येथील शासकीय पॉलिटेक्निक कॉलेजमध्ये कोविड केअर सेंटर सुरू करण्यात आले होते. सौम्य लक्षण असलेल्या बाधित रुग्णांची व्यवस्था येथे करण्यात आली होती. त्यामुळे बाधितांच्या व्यवस्थेला घेऊन एक मोठी समस्या या कॉलेजमुळे सुटली होती. आता पुन्हा कोरोनाचा धोका बघता आरोग्य विभागाने पुन्हा पॉलिटेक्निक कॉलेजमध्ये कोविड केअर सेंटरसाठी तयारी सुरू केली असून, सोमवारपासून (दि.२२) हे सेंटर सुरू होणार असल्याची माहिती आहे. नियम पाळा व लस घ्या कोरोनाचा वाढता धोका बघता नागरिकांनी कोरोनावियषक उपाययोजनांची काटेकोरपणे अंमलबजावणी करण्याची गरज आहे. यामुळे नागरिकांनी मास्कचा वापर, शारीरिक अंतराचे पालन, गर्दीत जाणे टाळणे, वारंवार हात धुणे किंवा सॅनिटायझरचा वापर करणे गरजेचे आहे. याशिवाय, कोरोनापासून बचावासाठी नागरिकांनी लसीकरण करवून घेण्याची गरज आहे. नागरिकांनी लसीकरणासाठी स्वत: पुढाकार घ्यावा, असे जिल्हा आरोग्य अधिकारी डॉ. नितीन कापसे यांनी कळविले आहे.

 

टॅग्स :corona virusकोरोना वायरस बातम्या