शहरं
Join us  
Trending Stories
1
"आज रात्री एका संस्कृतीचा अंत होईल..."; डोनाल्ड ट्रम्प यांची इराणला सर्वात मोठी धमकी
2
अवघ्या जगाला इंधनाची कमतरता, पण चीनला नाही जाणवली? २० वर्षांपूर्वीच केली होती तयारी
3
"दैवीशक्ती असल्याचं भासवत लैंगिक शोषण, ३० पीडिता समोर आल्या..."; खरात प्रकरणात मोठे खुलासे
4
इराण 'हॉर्मुझ' करारासाठी तयार; अमेरिकेला पाठवला शांतता प्रस्ताव, पण केली मोठी मागणी....
5
"पार्थ पवारांचं विधान काँग्रेसला फारच झोंबलं", अमोल मिटकरींनी १६ आमदारांची पार्टी म्हणत डिवचले
6
इस्रायलचा इराणवर मोठा हवाई हल्ला! १८ जणांचा मृत्यू, 24 गंभीर; दिग्गज लष्करी अधिकारी ठार? तेहरानसह शस्त्रास्त्र डेपो उद्ध्वस्त
7
IPL 2026 : अर्जुन तेंडुलकरचा यॉर्कर शो! पंतसमोर अचूक गोलंदाजी; LSG नं दिली पदार्पणाची हिंट (VIDEO)
8
Latest Marathi News LIVE Updates: 'इराणसाठी आजची रात्र अखेरची', अमेरिकेचे अध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांच्या पोस्टने जग हादरले
9
बंगाल निवडणुकीसाठी कडेकोट सुरक्षा; २.४ लाख जवानांसह २० हजार महिला कमांडो तैनात
10
David Warner: क्रीडाविश्वाला हादरून टाकणारी बातमी! स्टार क्रिकेटपटू डेव्हिड वॉर्नरला अटक; नेमकं प्रकरण काय?
11
GEN Z मध्ये वाढतोय हेअर कलरचा ट्रेंड; ब्लू, रेड, गोल्डन केसांवरुन जाणून घ्या व्यक्तिमत्वाचं रहस्य
12
युद्ध चिघळलं! डेडलाइन संपण्याआधीच अमेरिकेचा खार्ग बेटावर मोठा हल्ला; इराणचा आर्थिक कणा मोडणार?
13
Manipur rocket attack: गोळ्यांचा आवाज आणि हिंसक जमाव;  मणिपूरमधील हिंसाचाराचे व्हिडीओ आले समोर
14
Mira-Bhayander Flyover: मीरा भाईंदरमधला व्हायरल झालेला 'तो' अजब पूल असा का बनला? खुद्द CM फडणवीसांनी केला खुलासा
15
सख्ख्या आतेभावानेच बहिणीवर केला अत्याचार; नराधम मुलाला धडा शिकवण्यासाठी आईनेच गाठले पोलीस स्टेशन
16
भूमिपूजन झालं, पण 'पॉड टॅक्सी' नेमकी असणार तरी कशी? फायदा काय? इत्थंभूत माहिती समजून घ्या २ मिनिटांत!
17
"मीरा भाईंदरला ३० टक्के जागा मेहतांच्या मालकीची, १० टक्के..."; मेट्रो उद्घाटनात रंगला संवाद
18
स्वतंत्र AI विभागाला मंजुरी, महावितरणाचा IPO येणार; महाराष्ट्र मंत्रिमंडळाचे ५ मोठे निर्णय
19
धोक्याची घंटा! तुम्हीही जेवताना फोन वापरताय? एका चुकीमुळे आतड्यांचं होतं गंभीर नुकसान
20
Travel : हिमालयातील निळ्याशार पाण्याचा स्वर्ग! 'चंद्रताल'ला जाण्याचा प्लॅन करताय तर 'हे' नक्की वाचा
Daily Top 2Weekly Top 5

समाज कल्याण कर्मचारी संघटनेचे आंदोलन

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: June 11, 2018 21:50 IST

समाज कल्याण विभागात कार्यरत कर्मचाऱ्यांच्या मागण्यांची शासनस्तरावरून दखल घेतली जात नसल्यामुळे त्याचा निषेध म्हणून कर्मचारी संघटनेने ११ व १२ जून रोजी रोजी काळ्याफित लावून कामकाज करणे व दुपारच्या सुट्टीत शासनाविरूद्ध निदर्शने करण्याचा निर्णय घेतला आहे.

लोकमत न्यूज नेटवर्कगोंदिया : समाज कल्याण विभागात कार्यरत कर्मचाऱ्यांच्या मागण्यांची शासनस्तरावरून दखल घेतली जात नसल्यामुळे त्याचा निषेध म्हणून कर्मचारी संघटनेने ११ व १२ जून रोजी रोजी काळ्याफित लावून कामकाज करणे व दुपारच्या सुट्टीत शासनाविरूद्ध निदर्शने करण्याचा निर्णय घेतला आहे. मंगळवारपर्यंत (दि.१२) शासन स्तरावरून प्रश्नांची सोडवणूक न झाल्यास बुधवारपासून (दि.१३) बेमुदत लेखणीबंद आंदोलन करण्यात येणार आहे.समाज कल्याण विभागातील कर्मचाऱ्यांची नियमित पदोन्नती करणे, ५० टक्यांपेक्षा जास्त रिक्त असलेल्या जागा तत्काळ भरणे, नव्याने कार्यान्वित योजनांसाठी अधिकची पदे निर्माण करणे, जिल्हा जात प्रमाणपत्र पडताळणी समितीसाठी आकृतिबंध निर्माण करणे, नवीन शासकीय वसतिगृहांसाठी पदे मंजूर करणे, अंतिम कारवाईचे अधिकार नसतांनाही कर्मचाऱ्यांचे केलेले निलंबन मागे घेणे, जिल्हा परिषद अंतर्गत कार्यरत समाज कल्याण विभागाच्या कर्मचाऱ्यांना सेवार्थ प्रणालीतून वेतन अदा करणे, मानधनावरील कर्मचा-यांना कायम करणे, वैद्यकीय देयकांचे प्रतिपूर्तीच्या अधिकाराचे विकेंद्रीकरण करणे, आदी मागण्या समाज कल्याण कर्मचारी संघटनेने शासनाकडे वारंवार केल्या आहेत.याची दखल शासन स्तरावरु न घेतली न गेल्याने त्याचा निषेध म्हणून हे आंदोलन केले जात असून सोमवारपासून (दि.११) राज्यभरातून समाज कल्याण कर्मचाºयांनी काळ्याफित लावून कामकाज करण्यास सुरूवात केली आहे. आंदोलनात नागपूर विभागीय कोषाध्यक्ष योगेश कढव, गोंदिया जिल्हाध्यक्ष सतीश वाघ , सदस्य कुंदन कोळवते, प्रभाकर निकोडे, अंकेश केदार , अनिल बोढे, विनायक जटाळे, मनोहर सोनटक्के, विलास रामटेके आदी सहभागी आहेत.