शहरं
Join us  
Trending Stories
1
होर्मुझ खुली करण्याची शेवटची आशा संपली! UNSC मध्ये झाले मतदान, पण चीन-रशियाचे 'व्हिटो'अस्त्र
2
राजस्थानचा 'रॉयल' विजय! यशस्वी, वैभवने गोलंदाजांना धुतले, मुंबई इंडियन्सचा २७ धावांनी पराभव
3
नीलम शिंदेची झुंज संपली, तो कॉल ठरला काळीज चिरून टाकणारा; वडिलांना व्हिडीओ कॉलद्वारे घ्यावे लागणार अंतिम दर्शन
4
कडक! बुमराहचं वैभव सूर्यवंशीने असं केलं स्वागत! पहिल्याच ओव्हरमध्ये ठोकले दोन गगनचुंबी षटकार; पहा व्हिडिओ
5
"पुढील ४८ तास जिथे आहात, तिथेच रहा", ट्रम्प यांच्या धमकीनंतर इराणमधील भारतीयांना केंद्राकडून अलर्ट
6
अशोक खरातच्या अश्लील व्हिडीओंची १५ ते २० रुपयांना विक्री, गुन्हा दाखल, त्या व्यक्तीला लवकरच करणार अटक
7
"आज रात्री एका संस्कृतीचा अंत होईल..."; डोनाल्ड ट्रम्प यांची इराणला सर्वात मोठी धमकी
8
धडधड वाढली! इराणने 'या' शहरातील सर्व रेल्वे सेवा केल्या रद्द; इस्रायल-अमेरिकेचे हल्ले, तीन उड्डाण पूल उद्ध्वस्त
9
अवघ्या जगाला इंधनाची कमतरता, पण चीनला नाही जाणवली? २० वर्षांपूर्वीच केली होती तयारी
10
Viral Video: नदीच्या काठावर नवऱ्यासोबत मद्यपान, लोकांनी हटकताच म्हणाली,"आमच्यामुळेच तुमची घरं चालतात!"
11
NCL: एनसीएलमध्ये नोकरीची संधी, ५७७ जागांसाठी जाहिरात प्रसिद्ध; ९ एप्रिलपासून नोंदणी सुरू
12
८वा वेतन आयोग: १३ एप्रिल रोजी महत्वाची बैठक; वेतनवाढीचा अंतिम निर्णय होणार?
13
"दैवीशक्ती असल्याचं भासवत लैंगिक शोषण, ३० पीडिता समोर आल्या..."; खरात प्रकरणात मोठे खुलासे
14
इराण 'हॉर्मुझ' करारासाठी तयार; अमेरिकेला पाठवला शांतता प्रस्ताव, पण केली मोठी मागणी....
15
"पार्थ पवारांचं विधान काँग्रेसला फारच झोंबलं", अमोल मिटकरींनी १६ आमदारांची पार्टी म्हणत डिवचले
16
इस्रायलचा इराणवर मोठा हवाई हल्ला! १८ जणांचा मृत्यू, 24 गंभीर; दिग्गज लष्करी अधिकारी ठार? तेहरानसह शस्त्रास्त्र डेपो उद्ध्वस्त
17
IPL 2026 : अर्जुन तेंडुलकरचा यॉर्कर शो! पंतसमोर अचूक गोलंदाजी; LSG नं दिली पदार्पणाची हिंट (VIDEO)
18
Latest Marathi News LIVE Updates: 'इराणसाठी आजची रात्र अखेरची', अमेरिकेचे अध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांच्या पोस्टने जग हादरले
19
बंगाल निवडणुकीसाठी कडेकोट सुरक्षा; २.४ लाख जवानांसह २० हजार महिला कमांडो तैनात
20
David Warner: क्रीडाविश्वाला हादरून टाकणारी बातमी! स्टार क्रिकेटपटू डेव्हिड वॉर्नरला अटक; नेमकं प्रकरण काय?
Daily Top 2Weekly Top 5

तुडतुड्याच्या नुकसान भरपाईसाठी आंदोलन

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: September 20, 2018 23:33 IST

शेतकऱ्यांना पैशाची चणचण भासत आहे. सावकाराकडून उसने घेवून खत, किटकनाशके शेतकऱ्यांनी खरेदी केली. मागील वर्षी तुडतुड्याने नुकसान केले. त्याची भरपाई देण्याचे कबूल केले. परंतु ती भरपाईची रक्कम अद्याप बँकेत जमा झाली नाही.

ठळक मुद्देराष्ट्रवादी काँग्रेसचा इशारा: आॅनलाईन प्रणालीमुळे गरिबांना रेशन मिळेना

लोकमत न्यूज नेटवर्कअर्जुनी-मोरगाव : शेतकऱ्यांना पैशाची चणचण भासत आहे. सावकाराकडून उसने घेवून खत, किटकनाशके शेतकऱ्यांनी खरेदी केली. मागील वर्षी तुडतुड्याने नुकसान केले. त्याची भरपाई देण्याचे कबूल केले. परंतु ती भरपाईची रक्कम अद्याप बँकेत जमा झाली नाही.या संवेदनशून्य सरकारच्या विरोधात राष्ट्रवादी काँग्रेस तहसील कार्यालयासमोर तीव्र आंदोलन करणार असल्याचा इशारा अर्जुनी-मोरगाव राष्ट्रवादी शहर काँग्रेसचे अध्यक्ष मनोहर शहारे यांनी दिला आहे.भाजपा सरकारमुळे शेतकरी देशोधडीला लागला आहे. धानाच्या समर्थन मुल्यात वाढ म्हणजे उंटाच्या तोंडात जिरा आहे. शेतकऱ्यांनी स्वत: जवळील होते नव्हते पैसे धान रोवणीत खर्च केले. आता धानपिकावर रोगकिडीचे आक्रमण झाल्याने शेतकऱ्यांकडे कीटकनाशके, खते, निदंनासाठी पैसे उरले नाही. पिके वाचविण्यासाठी शेतकऱ्यांची दारोदार भटकंती सुरु आहे. आॅनलाईनच्या छळापायी शेतकरी रेशनापासून वंचित आहेत.तुडतुड्याची नुकसान भरपाई कित्येक शेतकऱ्यांना मिळाली नाही. तालुक्यातून दूरवरुन शेतकरी बँकेत विचारणा करण्यासाठी येतात. परंतु यादी तहसील कार्यालयातून आलीच नाही असे उत्तर मिळते. तहसील कार्यालयात गेले तर संबंधित अधिकारी, कर्मचारी यादी पाठवितो, त्रुटी आहे असे अनेक कारणे सांगून टाळतात. मागील काही दिवसापासून संबंधित लिपीक सुटीवर आहे. तहसीलदार लक्ष देत नाही. यामुळे त्रस्त झालेल्या लोकांना न्याय मिळवून देण्यासाठी राष्ट्रवादी काँग्रेस रस्त्यावर उतरणार आहे. तहसीलदार, उपविभागीय अधिकारी, जिल्हाधिकारी व पालक मंत्र्यांनी या बाबीकडे गांभीर्याने लक्ष द्यावे. नुकसान भरपाईची यादी त्वरित बँकेकडे देऊन ती रक्कम खात्यात जमा करावी. शेतकऱ्यांची टोलवाटोलवी बंद करावी अन्यथा राष्ट्रवादी काँग्रेस तीव्र आंदोलन करणार असल्याचा इशारा मनोहर शहारे यांनी दिला आहे.

टॅग्स :agricultureशेती