शहरं
Join us  
Trending Stories
1
इथे युद्ध थांबलं, तिथे शेअर बाजार सुस्साट... Sensex २६०० अंकांनी वधारला, Nifty मध्ये ७०० अंकांची तेजी
2
“शस्त्रसंधी वगैरे काही नाही”; इस्रायलने केले स्पष्ट, अमेरिका-इराण युद्ध खरेच थांबणार का?
3
भय इथले संपत नाही! अमेरिका-इराण शस्त्रसंधी झाली तरी आखाती देश हाय अलर्टवर; तणाव कायम
4
अमेरिकेने रोखली क्षेपणास्त्रे, इराणही भूमिकेवर ठाम, अखेर ‘या’ देशाची एंट्री, अन् झाला युद्धविराम
5
HDFC Bank New Rates: एचडीएफसी बँकेच्या व्याजदरात बदल; लोनच्या EMI वर होणार परिणाम, पटापट चेक करा नवे दर
6
आजचे राशीभविष्य, ०८ एप्रिल २०२६: नोकरदारांना ऑफिसमध्ये अनुकूल वातावरण, आर्थिक लाभाची शक्यता
7
भंडाऱ्यात चोरांचे तांडव! ५ तासांत २१ दुकाने फोडली; लाखोंचा मुद्देमाल गायब, टोळी असल्याचा संशय
8
Iran युद्धात शस्त्रसंधीच्या घोषणेनं दिलासा; कच्च्या तेलाच्या किमतीत मोठी घसरण आणि अमेरिकन बाजारात बंपर तेजी
9
रवींद्र एरंडेच्या ऑफिसमध्ये धनादेशांचा खच; वाचवण्यासाठी अहिल्यानगरच्या 'त्या' नेत्यांचा पोलिसांवर दबाव
10
धक्कादायक वास्तव! हा बघा मुंबई विद्यापीठाच्या क्रीडा संकुलातील ‘जलतरण तलाव’
11
अखेर शस्त्रसंधी झाली तरी कशी? अमेरिकेला पाठवला १० कलमी प्रस्ताव; इराणने केली भूमिका स्पष्ट
12
ट्रम्प-इराण युद्धविरामात पाकिस्तानचा गेम? 'कॉपी-पेस्ट' मेसेजने पोलखोल, शाहबाज यांची स्क्रिप्ट कुणी लिहिली?
13
आठ वर्षांच्या चिमुरडीचा डम्परखाली चिरडून मृत्यू; संतप्त नागरिकांचा रास्ता रोको, चालकाला अटक
14
अमेरिका-इराणमध्ये २ आठवड्यांसाठी युद्धबंदी; डोनाल्ड ट्रम्प यांच्याकडून हल्ले थांबवण्याची घोषणा
15
पहिल्या पॉड टॅक्सीचे भूमिपूजन; मात्र कुर्ला ते वांद्रे रेल्वे स्थानक प्रवासासाठी २०३१ची प्रतीक्षा
16
‘टनेल बोरिंग’ मशिनवर 'ठाणेकर' उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे ठेवणार नजर- मुख्यमंत्री फडणवीस
17
बंगालमध्ये मतदारयादीत 'महा-सफाई'! आगामी विधानसभा निवडणुकीआधी वगळली ९१ लाख नावे
18
इशारा : युद्धामुळे महागाई, व्याजदर वाढणार; ‘जेपी मॉर्गन चेस’चे सीईओ जेमी डिमन यांचे भाकीत
19
भोंदूबाबा अशोक खरात संबंधीच्या ४,६५० अश्लील लिंक डिलीट; ६० दिवसांत दोषारोपपत्र
20
पुनर्वसनानंतर १२ हजार कोटींचा बोजा; नवी मुंबईच्या गळ्याला बसणार लोकसंख्येचा फास
Daily Top 2Weekly Top 5

बकी गेट ठरतोय पर्यटकांसाठी पर्वणी

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: May 12, 2019 20:46 IST

तालुक्यातील नवेगावबांध - नागझिरा अभयारण्यातंर्गत येणारा बकी गेट सध्या पर्यटकांनासाठी पर्वणी ठरत आहे. या परिसरात वन्यप्राण्यांचे पर्यटकांना सहज दर्शन होत असल्याने बकी गेट पर्यटकांना आर्कषित करीत आहे. मागील काही वर्षांपासून नवेगाव- नागझिरा अभयारण्यात वन्यप्राण्यांच्या संख्येत सातत्याने वाढ होत असल्याचे चित्र आहे.

ठळक मुद्देवन्य प्राण्यांचे सहज दर्शन : पर्यटकांच्या संख्येत होतेय वाढ

लोकमत न्यूज नेटवर्कसडक-अर्जुनी : तालुक्यातील नवेगावबांध - नागझिरा अभयारण्यातंर्गत येणारा बकी गेट सध्या पर्यटकांनासाठी पर्वणी ठरत आहे. या परिसरात वन्यप्राण्यांचे पर्यटकांना सहज दर्शन होत असल्याने बकी गेट पर्यटकांना आर्कषित करीत आहे.मागील काही वर्षांपासून नवेगाव- नागझिरा अभयारण्यात वन्यप्राण्यांच्या संख्येत सातत्याने वाढ होत असल्याचे चित्र आहे. त्यामुळे येथे येणाऱ्या पर्यटकांची संख्या सुध्दा दिवसेंदिवस वाढत असून रोजगार निर्मितीला वाव मिळत आहे. या अभयारण्यात वाघ, बिबट, हरिण, सांभर, चितळ, नीलगाय, ससे, अस्वल, नीलघोडा, रानडुक्कर, मोर, लावा, तीतर, लांढोर, गुंधुर लावा, नीलकंठ, रानकुत्रे आदी वन्यप्राण्यांचे सहज दर्शन होते. बकी गेटने पर्यटन केल्यास हमखास वन्य प्राण्यांचे दर्शन होते.त्यामुळे पर्यटकांचा कल सुध्दा या गेटकडून जाण्यात अधिक असल्याचे दिसून येत आहे. या गेटवरून पुढे गेल्यास थातेमारी, गो, जांबुडझरी, झलकारगोंदी तलाव, टी के जाईन, रांजीतोक, बोद्राई, अगेझरी, कमकाझारी, कालीमाती गवत कुरण, बदबदा झरी या परिसरात वन्यप्राणी पाणी पिण्यासाठी दुपारच्या वेळी येतात.बकी गेट ने जाण्यासाठी खडीकरणाचा पक्का रास्ता आहे . बकी गेट हा राष्ट्रीय महामार्ग कोहमारा गावापासून तीन कि.मीे.अंतरावर आहे. या गेट मधून रायपूर , देवरी, गोंदिया, गोरेगाव , सडक अर्जुनी, नागपूर, भंडारा साकोली, मार्गे येणाºया पर्यटकांना फारच सोयीचे आहे. सद्या गाईड नसल्यामुळे शासनाचे हंगामी मजूर पर्यटकांना सोबत पाठवित आहे. यासाठी पर्यटकांना वेगळे शुल्क द्यावे लागत नाही. त्यामुळे येथे येणाºया पर्यटकांच्या संख्येत सुध्दा वाढ होत आहे.

टॅग्स :tourismपर्यटन