शहरं
Join us  
Trending Stories
1
इराणच्या 'पीस प्लॅन'मध्ये मोठा घोळ! फारसी आणि इंग्रजी मसुद्यात आढळला फरक; युरेनियमच्या अटीवरून संभ्रम वाढला
2
'चमका हिंदुस्तान हमारा!'; अणुऊर्जा क्षेत्रात भारताचा 'करिश्मा'! रशियानंतर भारत दुसरा देश ठरला! ४०० वर्षांपर्यंत टेन्शन संपणार!
3
सस्पेन्स कायम! भारतीयांनो, इराण तात्काळ सोडा; युद्धविरामनंतर काही तासांत भारताने जारी केली सूचना
4
आयसीएल फिनकॉर्पचा नवीन एनसीडी इश्यू १० एप्रिल रोजी खुला होणार; १२.२५% पर्यंत परताव्याचा दावा
5
पाकिस्तानच्या मध्यस्थीचे 'डर्टी सीक्रेट'! १००० खोल्यांचा सौदा केला, आसिम मुनीर यांनी ट्रम्प यांना दिली ८,३०० कोटींची ऑफर
6
Ashok Kharat : अशोक खरातला न्यायालयीन कोठडी; उद्या पुन्हा नव्या गुन्ह्यात कोर्टात सादर करण्याचे आदेश
7
School bus Accident: काळजाचा ठोका चुकवणारा अपघात; ३५ विद्यार्थ्यांसह शालेय बस खड्ड्यात उलटली!
8
७ मिनिटांच्या बैठकीत निवडणूक आयुक्त म्हणाले, Get Lost...; डेरेक ओ ब्रायन यांचा गंभीर आरोप
9
नवऱ्याचे ९ महिलांसोबत संबंध, १४ वर्षांचा संसार मोडला; प्रसिद्ध अभिनेत्रीचा खुलासा, एकटीने करतेय मुलाचा सांभाळ
10
आसाराम बापूच्या मुलाचा घटस्फोट, पत्नीला द्यावी लागणार कोट्यवधी रुपयांची पोटगी, कोर्टाचे आदेश
11
Video : बॉयफ्रेंडला चीटिंग करताना रंगेहाथ पकडलं; भररस्त्यात गर्लफ्रेंडने धू-धू धुतलं, पण नंतर जे झालं…
12
इस्रायल तयार नव्हता...! ट्रम्प यांनी इराणला लुळा-पांगळा करण्याचा प्लॅन सांगितला; नेतान्याहू झटकन तयार झाले...
13
थायलंडच्या महाराजांना भेटायला गेले भारतीय राजदूत; समोर अधिकारी गुडघ्यावर बसले, कारण काय?
14
"बाबा, मला पोलीस नाही व्हायचं!" वडिलांचं स्वप्न बाजूला सारलं; आता स्विंगच्या जोरावर गाजवतोय आयपीएल
15
युद्धविराम १४ दिवसांचाच...! नंतर पुन्हा युद्ध सुरु होणार? ट्रम्प यांचा इशारा आणि नेतन्याहूंच्या अटी 
16
“PM मोदींचे अपयश, ट्रम्प यांनी इराण शस्त्रसंधीचे श्रेय चीन-पाकला दिले”; संजय राऊतांची टीका
17
RBI नं रद्द केला महाराष्ट्रातील 'या' बँकेचा परवाना; ग्राहकांच्या पैशांचं काय होणार? 
18
US Israel Iran War: युद्ध थांबलं? ट्रम्प यांची मोठी घोषणा, पण मोज्तबा खामेनेईंच्या एका वाक्याने पुन्हा खळबळ! म्हणाले..
19
Amravati Accident: कॅन्टीनला चहासाठी जाण्याच्या सवयीने चार युवकांचा घात; नागपूर-अकोला महामार्गावर ट्रकने कारला उडवले
20
इराणमधील संघर्ष थांबला, आता या दोन देशात तणाव वाढला, किम जोंगच्या सैन्याने डागली बॅलेस्टिक मिसाईल 
Daily Top 2Weekly Top 5

डोंगर तलाव व पिंडकेपार बागेची पाहणी

By admin | Updated: June 10, 2017 02:09 IST

केंद्र शासनाच्या ‘अमृत’ अभियानांतर्गत आता विकासाची दारे उघडण्यात आली असून यात गोंदिया शहराचा समावेश करण्यात आला आहे.

हरित क्षेत्र विकास प्रकल्प : नवनियुक्त एजन्सीकडून झाली पाहणी लोकमत न्यूज नेटवर्क गोंदिया : केंद्र शासनाच्या ‘अमृत’ अभियानांतर्गत आता विकासाची दारे उघडण्यात आली असून यात गोंदिया शहराचा समावेश करण्यात आला आहे. या अभियानांतर्गत हरित क्षेत्र विकास प्रकल्पाची अंमलबजावणी करण्यासाठी मुंबईच्या नवनियुक्त एजंसीकडून डोंगर तलाव व पिंडकेपार येथील बागेची पाहणी करण्यात आली. आता एजंसीकडून या बागांच्या सौंदर्यीकरणाचे डिझाईन तयार करून नगर परिषदेला पाठविले जाईल व तसा प्रस्ताव नगर परिषदेकडून शासनाकडे सादर केला जाईल. याला मंजूरी मिळाल्यास शहरातील बाग व तलावाला सौंदर्यीकरणाचे ‘अमृत’ मिळणार. गोंदिया शहराचा सर्वच क्षेत्रात विकास होत असला तरिही हरित क्षेत्राच्या बाबतीत शहर मागासलेलेच आहे. आजघडीला शहरात सिव्हील लाईन्स परिसरातील सुभाष बाग हे एकच बाग उरले असून याशिवाय दुसरे हिरवळीचे स्थान नाही. मात्र देखभाल दुरूस्ती अभावी सुभाष बागेचीही स्थिती काही बरी नाही. नगर परिषदेकडून बागेला रेटत चालल्याचे दिसून येत आहे. परिणामी शहरवासीयांना मोकळ््या हवेत श्वास घेण्यासाठी दुसरी जागाच उरलेली नाही. बागेत कित्येक वर्षांपूर्वी लागलेले मोजके जुनेच खेळणे लागलेले आहेत. त्यामुळे चिमुकल्यांचाही बागेत येऊन हिरमोडच होतो. याकरिता पालिकेकडून आता शहरात काही बागांची निर्मिती केली जात आहे. मात्र आता सुभाष बागेसह शहरात नव्याने तयार होत असलेल्या पिंडकेपार व कुडवा येथील बागांचाही विकास होण्याची शक्यता दिसून येत आहे. त्याचे कारण असे की, केंद्र शासनाच्या ‘अमृत’ अभियानांतर्गत हरित क्षेत्र विकास प्रकल्पावर गांभीर्याने लक्ष दिले जात आहे. या प्रकल्पाची अंमलबजावणी करण्यासाठी सात सल्लागार समित्यांचे गठन करण्यात आले आहे. यात गोंदिया शहरासाठी दिल्ली येथील ‘ओसीस डिजाईन’ या एजंसीची नेमणूक करण्यात आली होती. एजंसीचे कर्मचारी वरूण सैनी यांनी सुभाष बाग, कुडवा व पिंडकेपार येथील बागांची पाहणी करून त्यांचे छायाचित्र काढून नेले होते. मात्र ओसीस डिजाईन या एजंसीने काही कारणास्तव काम करण्यास नकार दिल्याची माहिती आहे. त्यामुळे आता हे काम मुंबईच्या टंडन कंसल्टंसी यांच्याकडे देण्यात आले आहे. त्यानुसार या एजंसीचे कर्मचारी विकास भालेराव गुरूवारी (दि.८) गोंदियात आले होते. या दौऱ्यात त्यांनी शहरातील पिंडकेपार येथील बाग तसेच डोंगर तलावची पाहणी करून त्यांचे फोटो काढले आहेत. तसेच त्यांनी या बाग व तलावा संबंधीत जुनी माहिती, डी.पी.प्लान, लीड चार्ट यासह आवश्यक ते कागदपत्र नगर परिषदेकडून घेतले आहेत. येथून संकलीत केलेली ही सर्व माहिती भालेराव आता त्यांच्या एजंसीकडे देणार असून एजंसीकडून या बाग व तलावाच्या सौंदर्यीकरणासाठी डिजाईन्स तयार केले जातील. ते डिजाईन्स एजंसी गोंदिया नगर परिषदेला पाठविणार आहे व नगर परिषद त्याचा प्रस्ताव तयार करून शासनाकडे पाठविणार आहे. या प्रस्तावाला मंजूरी मिळाल्यास शहरातील या बाग व तलावाचा कायापालट होणार असून एकप्रकारे त्यांना ‘अमृत’च मिळणार असल्याचे म्हणता येईल. एक कोटींच्या वार्षिक निधीची तरतूद ‘अमृत’ अभियानांतर्गत हरित क्षेत्र विकास प्रकल्पासाठी एक कोटींची वार्षिक तरतूद करण्यात आली आहे. त्यामुळे शहरातील बागांच्या प्रस्तावाला शासनाकडून मंजूरी मिळाल्यास बागांच्या सौंदर्यीकरण व देखभाल दुरूस्तीसाठी नगर परिषदेला दरवर्षी एक कोटींचा निधी मिळणार असल्याची माहिती आहे. एवढा निधी मिळत असल्यास येथील बागांचे व या तलावाचे चित्र काय राहणार याची कल्पना करता येते.