शहरं
Join us  
Trending Stories
1
गिल है की मानता नहीं...; 'द्विशतकी' खेळीनंतर 'शतकी' डाव, इंग्लंडवर आणखी एक 'घाव'
2
12 देशांवर पडणार डोनाल्ड ट्रम्प यांच्या टॅरिफचा हातोडा, स्वाक्षरीही झाली! म्हणाले...
3
ENG vs IND :आता यजमान इंग्लंडची खैर नाही! टीम इंडियानं 'बॅझबॉल'वाल्यांसमोर सेट केलं मोठं टार्गेट
4
"भाजपची दुसऱ्यांदा माघार, केंद्राकडे राज यांच्या प्रश्नांची उत्तरे नाहीत"; स्टॅलिन यांचा ठाकरेंना पाठिंबा
5
VIDEO: प्रचंड गर्दी तरीही वारकऱ्यांनी दाखवली शिस्त! रुग्णवाहिकेसाठी क्षणात मोकळी करून दिली वाट
6
Neeraj Chopra Wins Gold NC Classic 2025: घरच्या मैदानातील पहिली स्पर्धा! 'गोल्ड'सह इथंही नीरज चोप्राची हवा
7
"त्यासाठी मनगटात जोर लागतो, नुसत्या तोंडाच्या वाफा..."; एकनाथ शिंदे यांचा राज-उद्धव मेळाव्याला टोला
8
Video: "डाव घोषित करतोस का? उद्या पाऊस पडणार आहे"; हॅरी ब्रुकच्या प्रश्नाला गिलचे मजेशीर उत्तर
9
"मुंबईला नवा चेहरा दिल्याने उद्धव ठाकरेंचा जळफळाट"; CM फडणवीस म्हणाले, "एकमेकांशी भांडूनच ते…"
10
"ठाकरे ब्रँड असता, तर बाळासाहेब असतानाच २८८ आमदार असते"; शिंदेंच्या आमदाराचे धक्कादायक विधान
11
सर्वात जलद सेंच्युरी! १४ वर्षीय वैभव सूर्यवंशीनं रचला इतिहास; मोडला पाक फलंदाजाचा रेकॉर्ड
12
Photo: आजच दुकान गाठलं पाहिजे, बजाजची नवीन स्पोर्ट्स बाईक पाहून तुम्हीही हेच म्हणाल!
13
Viral Video: रेल्वे स्टेशन आहे की हायवे? प्लॅटफॉर्मवरून गाड्यांना धावताना पाहून प्रवाशी शॉक!
14
PHOTOS: जसप्रीत बुमराहच्या बाजूला बसून हळूच हसणारी 'ती' तरूणी कोण? जाणून घ्या तिच्याबद्दल...
15
COVID19: महाराष्ट्रावरचं कोरोना संकट आणखी गडद, आज १२ नव्या रुणांची नोंद, २४ तासात एकाचा मृत्यू
16
उद्धव-राज ठाकरेंसंदर्भात रामदास आठवले यांची मोठी भाविष्यवाणी, म्हणाले, 'आमच्या महायुतीला...!'
17
जयजयकार...मराठी शक्तीचा, 'ठाकरे ब्रँड'वरील भक्तीचा! उद्धव-राज एकत्र येतात तेव्हा...
18
आशा आहे, मी आणखी 30-40 वर्षे जगेन आणि...; दलाई लामांकडून उत्तराधिकारी वादाला पूर्णविराम
19
"डोळे आणि मन आज तृप्त झालं...", ठाकरे बंधू एकत्र, मराठी अभिनेत्याचा आनंद गगनात मावेना
20
"हिंदी सक्ती मुंबई महाराष्ट्रापासून तोडण्याआधीची चाचपणी होती"; राज ठाकरे यांचा गंभीर आरोप

माता मृत्यूबाबत अहवाल मागितला

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: October 1, 2017 21:37 IST

गोरेगाव तालुक्यातील कुºहाडी येथील ललिता भुमेश्वर पंधरे (२२) या नऊ महिन्याच्या गर्भवती महिलेचा १५ सप्टेबर रोजी केटीएस जिल्हा सामान्य रुग्णालयात उपचारादरम्यान मृत्यू झाला.

ठळक मुद्देजिल्हाधिकाºयांकडून आस्थेने चौकशी : घरी भेट देऊन घेतली माहिती

लोकमत न्यूज नेटवर्कगोंदिया : गोरेगाव तालुक्यातील कुºहाडी येथील ललिता भुमेश्वर पंधरे (२२) या नऊ महिन्याच्या गर्भवती महिलेचा १५ सप्टेबर रोजी केटीएस जिल्हा सामान्य रुग्णालयात उपचारादरम्यान मृत्यू झाला. या मातामृत्यू झालेल्या घरी कुºहाडी येथे जिल्हाधिकारी अभिमन्यू काळे यांनी २८ सप्टेबर रोजी भेट दिली. तिच्या पती व सासूकडून गर्भवती असतानाच्या काळात कशाप्रकारे आहार देण्यात येवून काळजी घेण्यात आली, याची माहिती त्यांनी जाणून घेतली. मातामृत्यू झालेल्या या महिलेचा संपूर्ण अहवाल सादर करण्याचे निर्देश जिल्हा आरोग्य अधिकाºयांना दिले.जिल्हाधिकारी काळे यांच्या भेटीप्रसंगी त्यांच्यासोबत जिल्हा आरोग्य अधिकारी डॉ. श्याम निमगडे, उपजिल्हाधिकारी आर.टी. शिंदे, तालुका आरोग्य अधिकारी डॉ.आर.डी. पाचे, कुºहाडी प्राथमिक आरोग्य केंद्राचे वैद्यकीय अधिकारी डॉ. देव चांदेवार, डॉ. किर्तीकुमार चुलपार प्रामुख्याने उपस्थित होते.जिल्हाधिकारी अभिमन्यू काळे यांच्या संकल्पनेतून जिल्ह्यात शून्य माता व बालमृत्यू अभियान राबविण्यात येत आहे. या अभियानाचा उद्देश कोणत्याही गर्भवती महिलेचा बाळंतपणादरम्यान मृत्यू होऊ नये तसेच जन्माला येणाºया बालकांचादेखील मृत्यू होऊ नये, हा आहे. सर्व बाळंतपणे आरोग्य संस्थेतच झाली पाहिजे. घरी सर्व कामे महिला करीत असताना बाळंतपणाच्या काळात महिलांची घरच्या पुरुष मंडळींनी योग्य काळजी घेतली पाहिजे. तसेच तिच्या आहाराकडे देखील लक्ष दिले पाहिजे. बाळंतपणाच्या काळात घरची पुरूष मंडळी त्या महिलेच्या आरोग्याकडे लक्ष देतात की नाही, यासाठी प्राथमिक आरोग्य केंद्र, उपकेंद्र व प्रत्येक गावात प्रत्येक महिन्याला निश्तिच केलेल्या दिवशी पती किंवा सासºयांची सभा आयोजित करण्यात येत आहे. या सभा घेण्यामागचा उद्देश माता व बालमृत्यू टाळणे हाच आहे.कुºहाडी येथील मातामृत्यू झालेल्या ललिता पंधरे यांची प्रकृती ज्या दिवशी अचानक बिघडली त्या दिवशी तिला कुºहाडी येथील प्राथमिक आरोग्य केंद्रात वैद्यकीय अधिकारी उपस्थित नसल्यामुळे तिला गोंदिया येथील बाई गंगाबाई शासकीय स्त्री रुग्णालयात भरती करण्यासाठी नेले. त्यावेळी तेथे उपस्थित असलेल्या अधिकाºयांनी दोनदा परत केल्याची माहिती मयत महिलेचे पती भूमेश्वर पंधरे व सासू यांनी जिल्हाधिकाºयांना दिली.या वेळी २४ व २८ आॅगस्ट रोजी गर्भवती महिलेच्या घरच्या मंडळीसाठी घेण्यात आलेल्या सभेत आपण गेलो होतो, असे भूमेश्वरने सांगितले. सभेत वैद्यकीय अधिकारी यांनी योग्य मार्गदर्शन केले. बाळंतपणाच्या वेळी पत्नीचे वजन ४१ किलो होते. ३ व ५ आॅगस्टला बाई गंगाबाई रु ग्णालयातून परत पाठविल्याचे त्याने सांगितले. पुढील उपचारासाठी नागपूरला नेले. घरी परिस्थिती हलाखीची असताना सुध्दा नागपूरच्या सरकारी वैद्यकीय महाविद्यालयात भरती केले. औषधी, इंजेक्शनसुध्दा तेथे बाहेरुनच खरेदी करून आणावे लागत असल्यामुळे दररोज १५०० रूपये खर्च होत होते. जवळपास १३ दिवस तिथे ठेवण्यात आले. पैसा संपल्यामुळे परत गोंदियाला केटीएस रूग्णालयामध्ये दाखल केले. उपचारादरम्यान तिचा मृत्यू झाल्याचे त्याने सांगितले.जिल्हाधिकारी काळे यांनी यावेळी जिल्हा आरोग्य अधिकारी डॉ. निमगडे यांना सूचना केली की, त्यांच्या कार्यक्षेत्रातील सर्व वैद्यकीय अधिकाºयांनी अशा अडचणीच्या प्रसंगी तहसीलदार, गटविकास अधिकारी व तालुका वैद्यकीय अधिकारी यांची मदत घ्यावी. गर्भवती महिलांच्या घरी आरोग्य कर्मचारी नियमित भेट देतील, त्यांच्या अडीअडचणी जाणून घेतील. एकीकडे शासन आरोग्य सुविधा मोठ्या प्रमाणात उपलब्ध करून देत असताना बाळंतपणाच्या काळात मातामृत्यू झालेल्या कुटुंबाला एवढा खर्च कसा आला असेल, याचा शोध घेणे गरजचे आहे.