शहरं
Join us  
Trending Stories
1
एकल पदाच्या पदोन्नती, भरतीमध्ये आरक्षण नाहीच! आजवरचे सगळे आदेश रद्द करून काढला नवा शासन निर्णय
2
"तोपर्यंत इराणला पत्ताही नव्हता"; अमेरिकेतील 'त्या' खबऱ्यामुळे अडकले असते दोन सैनिक; ट्रम्प यांचा खुलासा
3
LPG Price Today: आज एलपीजी सिलिंडरच्या किमतीबाबत काय आहेत अपटेड? पटापट चेक करा
4
‘भळाभळा रक्त वाहत होते, पण तो…’ ट्रम्प यांनी सांगितली इराणमध्ये अडकलेल्या ‘त्या’ सैनिकाच्या शौर्याची कहाणी  
5
आजचे राशीभविष्य, ०७ एप्रिल २०२६: गूढ रहस्यमय विद्येचे आकर्षण राहील; प्रकृती उत्तम राहील
6
'आमच्या बाई आम्हाला परत द्या', विद्यार्थ्यांचा टाहो; जिल्हाधिकाऱ्यांच्या दालनासमोर चिमुरड्यांचा ठिय्या
7
Air India च्या सीईओंचा राजीनामा, अनेक आव्हानांचा सामना करतेय कंपनी; पाहा डिटेल्स
8
इराणला अमेरिकेचा अखेरचा अल्टिमेटम; "रात्री ८ पर्यंत निर्णय घ्या, अन्यथा थेट पाषाण युगात पाठवू"
9
राज्यातील खासदार, आमदारांविरोधात हत्या, बलात्काराचे खटले; आकडेवारीत मुंबई प्रथम
10
भोंदू अशोक खरातवर EDकडून गुन्हा दाखल; आर्थिक गैरव्यवहारप्रकरणी लवकरच होणार छापेमारी
11
समान नागरी संहिता, वन नेशन-वन इलेक्शन हे भाजपचे अजेंडे अद्याप अपूर्ण: पंतप्रधान मोदी
12
राष्ट्र समृद्ध आणि सुरक्षित असेल तरच वैयक्तिक समृद्धी शक्य- सरसंघचालक मोहन भागवत
13
धोक्याची घंटा! एआय डेटा सेंटर्समुळे वाढतोय पृथ्वीचा पारा; कोट्यवधींवर ओढावणार संकट
14
अनिल अंबानी समूहाच्या कर्ज प्रकरणात ७३ हजार कोटी रुपयांचा महाघोटाळा; CBIचा दावा
15
दिल्ली विधानसभेत थरार! कडक सुरक्षा व्यवस्थेला आव्हान देत बॅरिकेड तोडून SUV आत
16
आसाममध्ये हिमंता बिस्वा सरमा सत्ता टिकवणार की, गौरव गोगोई समीकरणे बदलणार?
17
इराणमधील अनेक शहरांवर बॉम्ब हल्ले; शैक्षणिक संस्थाही लक्ष्य, २५ हून अधिक नागरिक ठार
18
आयपीओंचा महापूर, ३८ ‘ड्राफ्ट पेपर’ दाखल! १२४ कंपन्या मुहूर्ताच्या प्रतीक्षेत, गुंतवणूकदारांची चांदी
19
तामिळनाडूमध्ये ७५ टक्के मंत्रिमंडळ भ्रष्टाचाराच्या खाईत अडकलेले : देवेंद्र फडणवीस
20
सोने दीड लाखावर, तरी खरेदी जोरात; आयात तुफान वाढली, भारताला स्वित्झर्लंडच्या सोन्याचा मोह
Daily Top 2Weekly Top 5

अवैधरीत्या दारूची सर्रास विक्री

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: May 26, 2017 00:41 IST

स्थानिक बस स्थानकजवळील बिअर बारमधून सर्रास विदेशी दारूची विक्री सुरु आहे. यात ग्राहकांकडून दिडपट ते दुप्पट रक्कम वसूल करण्यात येत आहे.

स्टेट हायवेवरील बारमधून विक्री : सर्वोच्च न्यायालयाच्या आदेशाला केराची टोपलीलोकमत न्यूज नेटवर्कतिरोडा : स्थानिक बस स्थानकजवळील बिअर बारमधून सर्रास विदेशी दारूची विक्री सुरु आहे. यात ग्राहकांकडून दिडपट ते दुप्पट रक्कम वसूल करण्यात येत आहे. याकडे संबंधित अधिकारी लक्ष देतील काय? असा नागरिकांचा सवाल आहे.लग्नसराईचे दिवस असल्याने व सगळीकडे दारूबंदी असल्याने या ठिकाणी आंबट शौकीन तसेच ग्राहकांची खूप गर्दी असते. दीडपट ते दुप्पट दर असूनही या ठिकाणावरुन मोठ्या प्रमाणात मद्य विक्री होत आहे. एखाद्या चोखंदळ ग्राहकाने दराच्या बाबतीत विचारले असता ‘हमे गोंदिया से माल लाना पडता है और उपर तक पैसे भी भेजना पडता है, दारुवाले के हाथ बहोत लंबे होते है’ असे सांगून त्यांना गप्प केले जाते.स्टेट हायवेवरील सर्व बार एक एप्रिलपासून बंद झाले असून सुद्धा तिरोडा शहरातील नवीन बस स्थानकाजवळील बार मात्र अजूनही चालूच असून ग्राहकांची लूट सुरू आहे. याबाबत गोंदिया जिल्हा आबकारी विभाग मात्र गाढ झोपेत आहे की झोपल्याचे सोंग घेत आहे, हेच कळत नाही. त्यामुळे कोर्टाच्या, शासनाच्या आदेशाची अवहेलना होत असून याकडे जिल्हा पोलीस अधीक्षक यांनी लक्ष घालावे, अशी मागणी जनतेमधून होत आहे.जिल्ह्यात शासनाच्या तसेच कोर्टाच्या आदेशाची अवहेलना होत असेल तर याकडे जिल्हाधिकारी गोंदिया यांनीही लक्ष देणे गरजेचे आहे. हा प्रशासनाचा भाग असून जनता, नागरिक लुबाडले जात आहेत. या गंभीर बाबीची चौकशी करून योग्य कारवाई करण्याची मागणी नागरिकांनी केली आहे.सगळीकडे दारूबंदी असल्याने मात्र लग्नात दारूशिवाय मजा नाही, अशी काहींची मानसिकता असल्याने आवश्यकतेपेक्षा जास्त दारू ढोसली जाते. त्यामुळे अपघाताचे प्रमाणसुद्धा वाढत असल्याचे दिसून येत आहे.