लोकमत न्यूज नेटवर्कगोंदिया : जिल्ह्यात अवैध दारू विक्रेत्यांच्या विरोधात जोमाने कारवाई करणे सुरू आहे. महात्मा गांधी तंटामुक्त गाव समितीने अवैध दारू विरोधात आधी एल्गार पुकारला होता. परंतु शासनाने महात्मा गांधी तंटामुक्त गाव मोहीमेकडे दुर्लक्ष केल्यामुळे ग्रामीण भागात अवैध दारूचा महापूर वाहात आहे. सोमवारी जिल्हाभरात २३ अवैध दारू विक्रेत्यांवर कारवाई करण्यात आली.यात, गोंदिया ग्रामीण पोलीस ठाण्यांतर्गत मुंडीपार येथील कस्तुरा ज्ञानीराम सतदेवे (५७) हिच्याकडून देशी दारुचे ५ पव्वे, डुग्गीपार पोलीस ठाण्यांतर्गत सौंदड येथील प्रदीप श्रावण बिलोने (३६) याच्याकडून मोहफुलाची १५ लिटर दारु, दवनीवाडा पोलीस ठाण्यांतर्गत बोंडराणी येथील सविता राजकुमार मरबते (३२) हिच्याकडून मोहफुलाची १० लिटर दारु, धापेवाडा येथील नरसैय्या परसराम मुलीवार (४५) याच्याकडून देशी दारुचे १० पव्वे, रतनारा येथील ठाकुरदास मेथाजी बोरकर (३२) याच्याकडून देशी दारुचे १३ पव्वे, केशोरी ठाण्यांतर्गत गवर्ला येथील तिमा धनसू परचामी (६५) याच्याकडून देशी दारुचे १३ पव्वे, गोरेगाव ठाण्यांतर्गत हिरडामाली येथील हेमराज बारीकराम राहुळकर (७०) याच्याकडून देशी दारुचे ३ पव्वे, हलबीटोला येथील दुलीचंद दसाराम कपाल (६०) याच्याकडून देशी दारुचे ४ पव्वे जप्त करण्यात आले.देवरी ठाण्यांतर्गत नवाटोला येथील कल्पना सुरेश उईके (४०) याच्याकडून देशी दारुचे ४ पव्वे, गंगाझरी पोलीस ठाण्यांतर्गत हनुमानटोला येथील आनंदराव किसन कुमरे (५०) याच्याकडून हातभट्टीची ३ लिटर दारु, जुनेवानी येथील छबीलाल ब्रिजलाल मरस्कोल्हे (५१) याच्याकडून हातभट्टीची २ लिटर दारु, गोंदिया शहर पोलीस ठाण्यांतर्गत पिंडकेपार मूर्री येथील योगराज सुखराम मेश्राम (४२) याच्याकडून हातभट्टीची ५ लिटर दारु, गौतमनगर बाजपेई वॉर्ड येथील जावेद मोहम्मद शेख (२७) याच्याकडून हातभट्टीची १० लिटर दारु, आंबेडकर वॉर्ड निवासी सिंगलटोली येथील ममता प्रविण वाहने (५०) हिच्याकडून हातभट्टीची ५ लिटर दारु पकडण्यात आली.त्याचप्रकारे, चिचगड पोलीस ठाण्यांतर्गत पलानगाव येथील प्रदिप निळकंठ टेंभूर्णेकर (३४) याच्याकडून देशी दारुचे ९ पव्वे, तिरोडा पोलीस ठाण्यांतर्गत गांगला येथील ज्ञानेश्वर तुलाराम नंदेश्वर (३८) याच्याकडून हातभट्टीची १० लिटर दारु, तिरोडाच्या गौतम बुद्ध वॉर्ड निवासी कला हंसलाल दमाहे (५८) हिच्याकडून मोहफुलाची ५ लिटर दारु, नवेगावबांध पोलीस ठाण्यांतर्गत नवेगावबांध टी-पार्इंट येथील माधोराव काशीनाथ चचाणे (४५) याच्याकडून देशी दारुचे १० पव्वे, अर्जुनी-मोरगाव पोलीस ठाण्यांतर्गत बाक्टी येथील पतीरात उरकुडा चौरे (६९) याच्याकडून हातभट्टीची ५ लिटर दारु तसेच २० किलो सडवा मोहफुल तर रावणवाडी पोलीस ठाण्यांतर्गत कटंगटोला येथील किशननबाई ढवरे (६३) हिच्याकडून हातभट्टीची ९ लिटर दारु जप्त करण्यात आली आहे. सदर आरोपीविरूद्ध मुंबई दारूबंदी कायद्यान्वये गुन्हा दाखल करण्यात आला आहे.व्यसनमुक्तीसाठी तंटामुक्ती पिछाडलीमहात्मा गांधी तंटामुक्त गाव समित्यांनी गावागावातील महिलांना अवैध दारूविक्रेत्यांच्या विरोधात उभे केले होते. ग्रामीण भागातील महिलांना दारूबंदी संबधात सहकार्य करण्याचे काम तंटामुक्त समित्यांनी केले होते. परंतु मागील दोन वर्षापासून तंटामुक्त समित्यांनी व्यसनमुक्तीच्या संकल्पनेकडे दुर्लक्ष केले आहे. परिणामी गावागावात अवैध दारूविक्रीला उधाण आले आहे. शासनाने तंटामुक्त मोहीमेला बळकट केल्यास व्यसनमुक्त सहज शक्य हाईल.
आणखी २३ अवैध दारूविक्रेत्यांवर कारवाई
By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: November 8, 2017 23:34 IST
जिल्ह्यात अवैध दारू विक्रेत्यांच्या विरोधात जोमाने कारवाई करणे सुरू आहे. महात्मा गांधी तंटामुक्त गाव समितीने अवैध दारू विरोधात आधी एल्गार पुकारला होता.
आणखी २३ अवैध दारूविक्रेत्यांवर कारवाई
ठळक मुद्देतंटामुक्तीचे पदाधिकारी थंडावले: ग्रामीण भागात अवैध दारूचा महापूर