शहरं
Join us  
Trending Stories
1
पाकिस्तानच्या मध्यस्थीचे 'डर्टी सीक्रेट'! १००० खोल्यांचा सौदा केला, आसिम मुनीर यांनी ट्रम्प यांना दिली ८,३०० कोटींची ऑफर
2
Ashok Kharat : अशोक खरातला न्यायालयीन कोठडी; उद्या पुन्हा नव्या गुन्ह्यात कोर्टात सादर करण्याचे आदेश
3
Video : बॉयफ्रेंडला चीटिंग करताना रंगेहाथ पकडलं; भररस्त्यात गर्लफ्रेंडने धू-धू धुतलं, पण नंतर जे झालं…
4
इस्रायल तयार नव्हता...! ट्रम्प यांनी इराणला लुळा-पांगळा करण्याचा प्लॅन सांगितला; नेतान्याहू झटकन तयार झाले...
5
थायलंडच्या महाराजांना भेटायला गेले भारतीय राजदूत; समोर अधिकारी गुडघ्यावर बसले, कारण काय?
6
"बाबा, मला पोलीस नाही व्हायचं!" वडिलांचं स्वप्न बाजूला सारलं; आता स्विंगच्या जोरावर गाजवतोय आयपीएल
7
युद्धविराम १४ दिवसांचाच...! नंतर पुन्हा युद्ध सुरु होणार? ट्रम्प यांचा इशारा आणि नेतन्याहूंच्या अटी 
8
“PM मोदींचे अपयश, ट्रम्प यांनी इराण शस्त्रसंधीचे श्रेय चीन-पाकला दिले”; संजय राऊतांची टीका
9
RBI नं रद्द केला महाराष्ट्रातील 'या' बँकेचा परवाना; ग्राहकांच्या पैशांचं काय होणार? 
10
US Israel Iran War: युद्ध थांबलं? ट्रम्प यांची मोठी घोषणा, पण मोज्तबा खामेनेईंच्या एका वाक्याने पुन्हा खळबळ! म्हणाले..
11
Amravati Accident: कॅन्टीनला चहासाठी जाण्याच्या सवयीने चार युवकांचा घात; नागपूर-अकोला महामार्गावर ट्रकने कारला उडवले
12
इराणमधील संघर्ष थांबला, आता या दोन देशात तणाव वाढला, किम जोंगच्या सैन्याने डागली बॅलेस्टिक मिसाईल 
13
"होर्मुझच्या समुद्रधुनीत अमेरिका...!"; युद्धविरामानंतर ट्रम्प यांचा इराणला नवा संदेश; तेहरानमध्ये पुन्हा उभ्या राहणार इमारती?
14
युद्ध संपले, आता मदतीचा हात! २४ तासांत ट्रम्प यांचा 'यू-टर्न'; इराणच्या पुनर्निर्माणासाठी अमेरिका करणार सहकार्य
15
Vastu Tips: मनी प्लांट लावूनही पैसा टिकत नाहीये? मग 'या' ५ चुका तुम्ही करत नाही ना? तपासून घ्या!
16
नेपाळमध्ये भारतीय वाहनांसाठी नवा नियम, सीमेवरून वाहतुकीला निर्बंध; स्थानिकांमध्ये संताप
17
ST Fare Hike: उन्हाळी सुट्टीत ST प्रवाशांच्या खिशाला चटका; १०% भाडेवाढ; प्रवास १५ एप्रिलपासून महागणार
18
नाशिकचा 'भोंदू' अशोक खरात कोठडीत ढसाढसा रडला; पोलिसांना शाप देणारा बाबा आता नरमला!
19
विकृतीचा कळस! महिलांची अंतर्वस्त्रे चोरून कॅमेऱ्यासमोरच करायचा अश्लील कृत्य; रहिवाशांनी सीसीटीव्ही पाहिला अन्...
20
IPL 2026: मुंबईविरुद्धच्या सामन्यात जयस्वालची 'स्पेशल' सेंच्युरी; याआधी असं फक्त तिघांनाच जमलंय!
Daily Top 2Weekly Top 5

कुंभार समाजबांधवांचा जिल्हाधिकारी कार्यालयावर मोर्चा

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: December 26, 2018 21:46 IST

विमुक्त भटक्या जमातीत कुंभार समाजाचा समावेश करण्यात यावा, यासह अन्य मागण्यांकरीता महाराष्ट्र कुंभार समाज महासंघ गोंदिया शाखेच्या नेतृत्वात बुधवारी (दि.२६) जिल्हाधिकारी कार्यालयावर मोर्चा काढण्यात आला.तसेच जिल्हाधिकारी कार्यालयासमोर धरणे देण्यात आले.

ठळक मुद्देविमुक्त भटक्या जमातीत समावेश करा : जिल्हाधिकाऱ्यांना निवेदन

लोकमत न्यूज नेटवर्कगोंदिया : विमुक्त भटक्या जमातीत कुंभार समाजाचा समावेश करण्यात यावा, यासह अन्य मागण्यांकरीता महाराष्ट्र कुंभार समाज महासंघ गोंदिया शाखेच्या नेतृत्वात बुधवारी (दि.२६) जिल्हाधिकारी कार्यालयावर मोर्चा काढण्यात आला.तसेच जिल्हाधिकारी कार्यालयासमोर धरणे देण्यात आले.शहरातील जयस्तंभ चौक येथून बुधवारी दुपारी १२ वाजता मोर्चाला सुरूवात झाली. यानंतर हा मोर्चा जिल्हाधिकारी कार्यालयासमोर पोहचला. या मोर्चात सहभागी जिल्ह्यातील कुंभारसमाजबांधवानी जिल्हाधिकारी कार्यालयासमोर धरणे दिली.या वेळी विविध मागण्यांचे निवेदन जिल्हाध्यक्ष सुरेश चितवे यांच्या नेतृत्वात जिल्हाधिकारी डॉ. कांदबरी बलकवडे यांना देण्यात आले. या वेळी दिलेल्या निवेदनातून उदरनिर्वाहासाठी भटकंतीचे आयुष्य जगणाऱ्या कुंभार समाजाचा विमुक्त भटक्या जमातीत समावेश करण्यात यावा. कुंभार समाजातील विट, मटकी व मूर्ती व्यवसायाकरिता असलेल्या कुंभार खाणी समाजाला त्वरीत देण्यात याव्या, कुंभार समाजाला विधान परिषदेत प्रतिनिधीत्व देण्यात यावे,संत शिरोमणी गोरोबा काका यांचे जन्मगांव तेर जिल्हा उस्मानाबाद येथे विस्तृत विकास आराखडा तयार करून तेरचा सर्वांगीण विकास करण्यात यावा. तेर तीर्थक्षेत्रास अ दर्जा देण्यात यावा, मातीवरील रॉयल्टी माफ करण्यात यावी. समाजातील विट व्यावसायिकांना आवश्यक परवाना देण्याचे निर्देश जिल्हाधिकारी व तहसीलदार यांना देण्यात यावे. कुंभार समाजातील ५० वर्षावरील निवृत्त व्यवसायीकाला एमआयडीसीमध्ये जागा देण्यात यावी, प्लॉस्टर आॅफ पॅरिसच्या मूर्ती बनविणे आणि विक्र ीवर बंदी करण्यात यावी.गोंदिया जिल्ह्यातील विट भट्टया कुंभारांना पर्यायी व्यवस्था होईपर्यंत उपलब्ध करुन देण्यात याव्या आदी मागण्यांचा समावेश होता. शिष्टमंडळात गुड्डू चक्र वर्ती, ईश्वर चक्रवती,काशीनाथ कपाट, सुभाष वाघाडे, हेमंत चक्रवती, रवि प्रजापती, सुरेश प्रजापती, कुंवरलाल तेलासू यांच्यासह मोठया संख्येने कुंभार समाजबांधव सहभागी झाले होते.