विविध मागण्यांचा समावेश : जिल्ह्यातील हजारो शिक्षकांचा समावेशगोंदिया : राज्यस्तरावरील २७ व जिल्हास्तरावरील १५ मागण्यांना घेऊन जिल्ह्यातील हजारो शिक्षकांनी महाराष्ट्र राज्य प्राथमिक शिक्षक संघाच्या नेतृत्वात जिल्हाधिकारी कार्यालयावर शनिवारी मोर्चा काढला. विविध मागण्या शासनाने पूर्ण करण्याच्या घोषणा देत त्यांनी आपल्या मागण्यांसंदर्भातील निवेदन जिल्हाधिकाऱ्यांना देण्यात आले. शिक्षकांना १ तारखेला वेतन देण्यात यावे, प्राथमिक शिक्षकांचे एप्रिल २०१४ पासूनचे जीपीएफ खाते अद्यावत करण्यात यावे, विषयवार पदवीधरांच्या जागा भरण्यात याव्या, उच्च परीक्षेस बसण्याची परवानगी द्यावी, प्रसूती रजांना प्रसूतीपूर्व परवानगी देऊन त्यांना नियमित वेतन देण्यात यावे, चट्टोपाध्याय, निवड श्रेणी पात्र शिक्षकांच्या यादीतून सुटलेल्या शिक्षकांना कायम करण्यात यावे, निमशिक्षकांचे वेतन शालार्थ वेतन प्रणालीने करण्यात यावे, १५ टक्के प्रोत्साहन भत्ता वेतनवाढीनुसार अंतिम मर्यादेपर्यंत देण्यात यावे, पंचायत समिती गोरेगाव येथील प्राथमिक शिक्षकांची जीपीएफची मासीक कपात करण्यात आलेली रक्कम खात्यात जमा करण्यात यावी. सहाव्या वेतन आयोगाच्या निश्चितीस विस्तार अधिकाऱ्यांची मंजुरी प्रदान करण्यात यावी, सडक-अर्जुनी येथील शिक्षकांची मासिक कपात करण्यात आलेली नऊ लाख रूपये रक्कम संबंधितांच्या खात्यात जमा करण्यात यावी, आरटीई कायद्यानुसार शिक्षकांचे पदनिश्चिती त्वरित करण्यात यावी, प्रत्येक शाळेला संगणक पुरवठा करण्यात यावा अश्या विविध मागण्यांना घेवून इंदिरा गांधी स्टेडियम येथून निघालेला मोर्चा जिल्हाधिकारी कार्यालयावर धडकला.या मोर्च्याचे नेतृत्व शिक्षक संघाचे जिल्हाध्यक्ष वीरेंद्र कटरे, यू.पी. पारधी, सरचिटणीस एस. यू. वंजारी, नागसेन भालेराव, नूतन बांगरे, डी.टी. कावळे, चंदू कोसरकर, अशोक खोटेले, केदार गोटेफोडे, रेणुका जोशी, अनिरूध्द मेश्राम, गणेश चुटे, क्रिणकुमार कापसे, मुकेश रहांगडाले, यशोधरा सोनवाने यांनी केले. तसेच विविध मागण्यांचे निवेदन जिल्हाधिकाऱ्यांना देण्यात आले. सदर मोर्च्यात सुधीर पाजपेयी, हेमंत पटले, मोरेश्वर बडवाईक, नरेंद्र कटरे,अशोक तावाडे, सुरेश गायधने, एच.पी. तुरकर, पी.पी. डोंगरवार, एस.पी. वासनिक, नरेंद्र घायवट, अयुब खान व जिल्ह्यातील हजारो शिक्षक सहभागी होते. (तालुका प्रतिनिधी)
शिक्षकांचा जिल्हाधिकारी कार्यालयावर मोर्चा
By admin | Updated: November 2, 2015 01:26 IST