शहरं
Join us  
Trending Stories
1
दोन दिवसात भारताच्या किती जहाजांनी पार केली होर्मुझची सामुद्रधुनी; केंद्र सरकारने सांगितली सद्यस्थिती
2
सांगली जिल्ह्यात दोन खासदार, नऊ आमदार होतील; चंद्रकांत पाटील यांचे सूचक वक्तव्य 
3
अशोक खरातसोबत नेत्यांचे संबंध; शरद पवार म्हणाले, 'आमच्यातील लोकप्रतिनिधी जाऊन जे काही...'
4
Thane Crime: खासगी बोलण्याचा बहाणा, हॉटेलमध्ये नेले आणि नर्सवर दोन वेळा बलात्कार
5
IPL 2026 : शाहरुख खानची खास झलक! सुहानाचा स्टायलिश लूकही ठरला लक्षवेधी; इथं पाहा व्हिडिओ
6
बंदूक नव्हे आता अक्कल पाजळणार! भारताविरोधात असीम मुनीरचा कांड; पाकिस्तानचा नवा कुरापती प्लॅन
7
Latest Marathi News LIVE Updates:इराणच्या हल्ल्यात चार इस्रायली नागरिकांचा मृत्यू, इमारतीच्या ढिगाऱ्याखाली मिळाले मृतेदह
8
IPL 2026, MI vs RR : हार्दिक पांड्या खेळणार का? MI कोच म्हणाले, तो काही दुखापतग्रस्त नव्हता, तर...
9
सुनेत्रा पवारांना पाठिंबा दिला, पण प्रचार करणार की नाही, शरद पवारांनी मांडली भूमिका; काँग्रेसबद्दल काय बोलले?
10
‘त्या’ घटनेतील तिसरी हत्या पोलिस व सुरक्षारक्षकांच्या डोळ्यासमोर; व्हिडिओ व्हायरल
11
तृणमूल काँग्रेस की भाजप? यंदा मतदारांचा कौल कुणाला? धक्कादायक ओपिनियन पोल समोर...
12
टॉर्चर करून करून पिता-पुत्राला मारलेले! तामिळनाडूच्या गाजलेल्या 'कस्टोडियल डेथ' प्रकरणात ९ पोलिसांना मृत्यूदंडाची शिक्षा
13
एकेकाळी १४०० एकर जमिनीचे मालक, आता मोहफुले वेचून जगण्याची वेळ; गोंड राजाच्या वंशजांची बिकट परिस्थिती
14
KKR च्या ताफ्यातून एकाच वेळी दोन्ही मिस्ट्री स्पिनर 'गायब'! अजिंक्य रहाणेनं सांगितलं त्यामागचं कारण
15
"शस्त्रसंधी करणे म्हणजे शत्रूंना आणखी गुन्हे करण्यासाठी...", इराणने ट्रम्प यांचा प्रस्ताव धुडकावला
16
Ekana Stadium: एकाना स्टेडियममध्ये पाण्याची एक बॉटल किती रुपयांना मिळते? किंमत ऐकून चक्रावून जाल!
17
बायको अधिकारी बनली अन् पतीला विसरली; अडीच वर्षांनी वाद मिटला, ज्योती-आलोक पुन्हा झाले एकत्र
18
नात्यांचा मोठा पेच! २५ वर्षांनंतर पती पुन्हा प्रकटला, पत्नीचे दीरासोबत लग्न लावले गेले; तिने आता काय करायचे?
19
मायलेज, पॉवर अन् फीचर्सनी सुसज्ज..; फक्त 6 लाखांत घरी घेऊन या लग्झरी सेडान कार
20
ना होर्मुझ खुला करणार, ना ४५ दिवसांचा युद्धविराम होणार! इराणनं प्रस्ताव धुडकावला; आता अमेरिका काय करणार?
Daily Top 2Weekly Top 5

केरोसीन विक्रेत्यांचा जिल्हाधिकारी कार्यावर मोर्चा

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: November 15, 2018 22:30 IST

जिल्ह्यातील केरोसीन विक्रेते व स्वस्त धान्य दुकानादारांनी शासनाच्या चुकीच्या धोरणाविरोधात गुरूवारी (दि.१५) जिल्हाधिकारी कार्यालयावर मोर्चा काढला. या वेळी विविध मागण्यांचे निवेदन जिल्हाधिकाऱ्यांना दिले.

ठळक मुद्देशासनाच्या धोरणाचा विरोध : ३० हजार रुपये मानधनाची मागणी

लोकमत न्यूज नेटवर्कगोंदिया : जिल्ह्यातील केरोसीन विक्रेते व स्वस्त धान्य दुकानादारांनी शासनाच्या चुकीच्या धोरणाविरोधात गुरूवारी (दि.१५) जिल्हाधिकारी कार्यालयावर मोर्चा काढला. या वेळी विविध मागण्यांचे निवेदन जिल्हाधिकाऱ्यांना दिले.शासनाने स्वस्त धान्य दुकानदार व केरोसीन विक्रेत्यांना रोख अनुदान देण्याचा निर्णय घेतला. तसेच त्यांना दिल्या जाणाऱ्या सोयी सुविधांमध्ये सुध्दा कपात केली आहे. यामुळे केरोसीन विक्रेते व स्वस्त धान्य दुकानदारांमध्ये रोष व्याप्त आहे. रोख अनुदान देण्याची पध्दत बंद करुन पूर्वी दिल्या जाणाऱ्या सोयी सुविधा देण्यात याव्या, या मागणीला घेवून गोंदिया जिल्हा शासकीय स्वस्त धान्य व केरोसीन विक्रेता संघाच्या नेतृत्त्वात स्थानिक इंदिरा गांधी स्टेडियम येथून गुरूवारी दुपारी १२ वाजता जिल्हाधिकारी कार्यालयावर मोर्चा काढण्यात आला.मोर्चात जिल्हाभरातील केरोसीन विक्रेत मोठ्या संख्येनी सहभागी झाले होते. जिल्हाधिकारी कार्यालयावर मोर्चा पोहचल्यानंतर मोर्चाचे रुपातंर सभेत झाले.यावेळी शिष्टमंडळाच्या वतीने विविध मागण्यांचे निवेदन जिल्हाधिकारी कादंबरी बलकवडे यांना देण्यात आले. या वेळी दिलेल्या निवेदनातून सर्व शिधापत्रिकाधारकांना स्वस्त धान्य देण्यात यावे, सर्व परवानधारकांना नियमित केरोसीनचा पुरवठा करण्यात यावा,चंदीगड, पांडेचरी राज्यांसारखी वितरण व्यवस्था पूर्ववत लागू करण्यात यावी,स्वस्त धान्य दुकानदारांना प्रती क्विंटल २५० ते ३०० रुपये कमशिन देण्यात यावे तसेच ३० हजार दरमाह मानधन देण्यात यावे,नक्षलग्रस्त भागात डीबीटीचा विरोध केला जात आहे.त्यामुळे शासनाने या सर्व मागण्यांची दखल घेवून त्या मान्य करण्याची मागणी केली आहे. शिष्टमंडळात योगराज रहांगडाले, खेमराज साखरे, खेमेंद्र वासनिक, दुर्गेश रहांगडाले, शालू पंधरे, प्रतिभा पवार, मोहन शर्मा यांचा समावेश होता.तहसील कार्यालयासमोर धरणे आंदोलनजिल्हा शासकीय स्वस्त धान्य व केरोसीन विक्रेता संघाच्या नेतृत्त्वात शासनाच्या चुकीच्या धोरणाचा निषेध नोंदविण्यासाठी जिल्ह्यातील तहसील कार्यालयासमोर धरणे आंदोलन करण्यात आले. तसेच विविध मागण्यांचे निवेदन तहसीलदारांना देण्यात आले.

टॅग्स :Morchaमोर्चाcollectorजिल्हाधिकारी