शहरं
Join us  
Trending Stories
1
युद्धविराम १४ दिवसांचाच...! नंतर पुन्हा युद्ध सुरु होणार? ट्रम्प यांचा इशारा आणि नेतन्याहूंच्या अटी 
2
US Israel Iran War: युद्ध थांबलं? ट्रम्प यांची मोठी घोषणा, पण मोज्तबा खामेनेईंच्या एका वाक्याने पुन्हा खळबळ! म्हणाले..
3
"होर्मुझच्या समुद्रधुनीत अमेरिका...!"; युद्धविरामानंतर ट्रम्प यांचा इराणला नवा संदेश; तेहरानमध्ये पुन्हा उभ्या राहणार इमारती?
4
युद्ध संपले, आता मदतीचा हात! २४ तासांत ट्रम्प यांचा 'यू-टर्न'; इराणच्या पुनर्निर्माणासाठी अमेरिका करणार सहकार्य
5
नेपाळमध्ये भारतीय वाहनांसाठी नवा नियम, सीमेवरून वाहतुकीला निर्बंध; स्थानिकांमध्ये संताप
6
नाशिकचा 'भोंदू' अशोक खरात कोठडीत ढसाढसा रडला; पोलिसांना शाप देणारा बाबा आता नरमला!
7
विकृतीचा कळस! महिलांची अंतर्वस्त्रे चोरून कॅमेऱ्यासमोरच करायचा अश्लील कृत्य; रहिवाशांनी सीसीटीव्ही पाहिला अन्...
8
IPL 2026: मुंबईविरुद्धच्या सामन्यात जयस्वालची 'स्पेशल' सेंच्युरी; याआधी असं फक्त तिघांनाच जमलंय!
9
लवकरच येणार स्वस्त मोबाईल प्लॅन! केवळ कॉल आणि एसएमएस करणाऱ्यांना मिळणार गिफ्ट; कंपन्या दिलासा देणार?
10
समरजित घाटगे यांची भाजपात घरवापसी, शरद पवार गटाला धक्का, कागलमधील समीकरणं बदलणार
11
तुमच्या नगरसेवकांना नियम शिकवा; अधिकारी, विरोधकांनी गणेश नाईकांना घेरले, नेमके काय घडले?
12
शहबाज शरीफ यांना डच्चू! ट्रम्प यांनी या दोन जणांना केले कॉल? वाचा युद्धविरामापूर्वीच्या फोन कॉलची संपूर्ण 'इनसाईड स्टोरी'
13
"जी व्यक्ती मालिकेतच नव्हती...", 'लक्ष्य'मधून बाहेर काढण्याच्या दिगंबर नाईकांच्या आरोपांवर आदेश बांदेकरांचं उत्तर
14
RBI MPC Meeting Update: रेपो दर 'जैसे थे'; जागतिक अनिश्चिततेदरम्यान रिझर्व्ह बँकेचा सावध पवित्रा
15
SHOCKING! इराण-अमेरिका युद्धातून डोनाल्ड ट्रम्पची दोन्ही मुलंच उकळताहेत प्रचंड पैसा!
16
RR vs MI: मुंबईच्या रणनीतीचा पालापाचोळा! पराभवानंतर जयवर्धने यांनी सांगितलं नेमकं कुठं गणित बिघडलं?
17
शस्त्रसंधी केली तरी ट्रम्प यांची खुर्ची धोक्यात? ८५ खासदारांनी मागितला राजीनामा; विरोध कायम
18
वैभव-यशस्वीने मुंबईला धू धू धुतले, कॅप्टन हार्दिक पांड्याने ‘या’ खेळांडूंवर पराभवाचे खापर फोडले  
19
Mumbai Local: मध्य रेल्वेची कमाल, १६४ कोटी प्रवाशांचा प्रवास; ८.१६ लाख ट्रेन, १ वर्षांत किती सेवा वाढल्या?
20
अमेरिका-इराणमध्ये अखेर तह! ट्रम्प कडाडले, पाकिस्तानने मध्यस्थी केली की चीनने? वाचा काय घडलंय...
Daily Top 2Weekly Top 5

खरेदी केलेल्या धानाचे पैसे थकून

By admin | Updated: July 5, 2015 01:58 IST

शासनाच्यावतीने सुरू करण्यात आलेल्या हमी भाव धान खरेदी केंद्रावर विकल्या गेलेल्या धानाचे अजूनही शेतकऱ्यांना पैसे मिळाले नाहीत.

शेतकरी हवालदिल : सहकारी संस्थांना मन:स्तापनवेगावबांध : शासनाच्यावतीने सुरू करण्यात आलेल्या हमी भाव धान खरेदी केंद्रावर विकल्या गेलेल्या धानाचे अजूनही शेतकऱ्यांना पैसे मिळाले नाहीत. त्यामुळे शेतकऱ्यांवर मोठे संकट कोसळले आहे. तसेच ज्या सहकारी संस्थांनी आपल्या बँक लिमीट मधून काही शेतकऱ्यांचे चुकारे अदा केलेत त्या संस्था देखील डबघाईस आल्याचे चित्र सध्या दिसून येत आहे.उन्हाळी पिकासाठी शासनातर्फे धान खरेदी करण्यासाठी विविध ठिकाणी धान खरेदी केंद्र सुरू करण्यात आले होते. त्यासाठी १३५० रुपये प्रति क्विंटल हमी भाव निश्चित करण्यात आला होता. शासकीय खरेदी केंद्र असल्याकारणाने शेतकऱ्यांनी आपला उत्पादित केलेला धान केंद्रावर विकला. परंतु सुमारे दीड-ते दोन महिन्यांचा कालावधी लोटूनही शेतकऱ्यांना त्यांच्या विकल्या गेलेल्या धानाचे पैसे मिळाले नाहीत. आता नवीन हंगाम सुरू झाला त्यामुळे बियाणे, खत व औषधी खरेदी करण्यासाठी व मजुरी देण्यासाठी पैशांची नितांत आवश्यकता आहे. तरी सुद्धा शासनातर्फे शेतकऱ्यांचे पैसे देण्यात आलेले नाहीत. त्यामुळे शेतकऱ्यांना पुढील हंगाम कसा करावा असा प्रश्न निर्माण झाला आहे.तसेच काही सहकारी संस्थांनी आपल्या बँक लिमीट मधून पैसे काढून काही शेतकऱ्यांचे पैसे दिलेत. शेतकऱ्यांचे काम व्हावे व शासनातर्फे लवकरच आपल्याला पैसे मिळतील असा संस्थांचा उद्देश होता. परंतु शासनाच्या दिरंगाईच्या धोरणामुळे पैशांअभावी बऱ्याच संस्था डबघाईस आल्यासारख्या आहेत.धान उत्पादक शेतकऱ्यांसाठी २५० रुपये प्रतिक्विंटल दराने शासनाने बोनस जाहीर केला. त्यासाठी ५२ कोटी रुपये देणार असल्याचे शासनातर्फे मागेच जाहीर करण्यात आले. परंतु बोनसचे पैसे कुठे अजूनपर्यंत अडकून आहेत हे कुणालाच माहिती नाही. शासनातर्फे मार्केटिंग फेडरेशनला पैसे पाठविले जातात व त्यानंतर फेडरेशनतर्फे विविध सहकारी संस्थांना पैसे दिले जातात. त्यानंतर शेतकऱ्यांना पैसा मिळतो. परंतु अजुनपर्यंत पैसा शेतकऱ्यांपर्यंत पोहोचला नसल्यामुळे शासनाच्या धोरणावरच प्रश्नचिन्ह निर्माण झाले आहे.त्यांच्याकडून शेतकऱ्यांच्या होत असलेल्या फसवणुकीला आळा घालण्यासाठी शासनातर्फे सहकारी संस्थांच्या माध्यमातून धान खरेदी केंद्र सुरू करण्यात येतात. परंतु शासनच दिरंगाईचे धोरण अवलंबून धान उत्पादक शेतकऱ्यांची फसवणूक करीत असल्याचा आरोप होत आहे. बरे धानाच्या भाववाढीवर राजकारण करणारे पदाधिकारीही या बाबीवर मुंग गिळून गप्प आहेत. शासनाने धान उत्पादक शेतकऱ्यांच्या अडचणी लक्षात घेवून तसेच सहकारी संस्थांची परिस्थिती लक्षात घेवून त्वरित खरेदी केलेल्या धानाचे चुकारे व बोनस अदा करावे, अशी मागणी सहकारी संस्थांचे पदाधिकारी व शेतकऱ्यांनी केली आहे. (वार्ताहर)