शहरं
Join us  
Trending Stories
1
Delhi Assembly: दिल्ली विधानसभा परिसरात मोठी खळबळ, VIP गेट तोडून घुसली अज्ञात कार, तपास सुरू!
2
चीनकडून काहीतरी वेगळेच सुरु आहे...! अमेरिका-इराण युद्धाच्या सावटात सोन्या-चांदीची प्रचंड खरेदी; डॉलरला शह देण्यासाठी नवी चाल?
3
जगातील भल्याभल्या देशांना 'या' बाबतीत तगडी टक्कर देतो इराण; अमेरिका तर त्यांच्या आसपासही नाही!
4
इराणचा 'डिजिटल' बॉम्ब! जगाचा इंटरनेट संपर्क तोडण्याची धमकी; समुद्राखालील केबल्स कापल्यास महाभयंकर संकट?
5
Video: शिंदेसेनेच्या ज्योती वाघमारेंना खासदारकीची शपथ घेताना मध्येच थांबवले; संसदेत काय घडलं?
6
सोने-चांदीवरील आयात शुल्कात मोठी कपात! दागिन्यांचे दर उतरणार? तोळ्यामागे ११,७०० रुपयांचा दिलासा
7
शेतकरी ते उद्योजक! मुद्रा कर्जाच्या मदतीने उभा करा स्वतःचा व्यवसाय; जाणून घ्या अर्ज करण्याची प्रक्रिया
8
पाकिस्तानात ४ दिवस वर्किंग, बांगलादेशात सं. ७ नंतर मॉल बंद; तेल संकटात शेजारील देशांनी काय केले?
9
Divya Singh : अभूतपूर्व! कडाक्याची थंडी, खांद्यावर सायकल; माउंट एव्हरेस्ट बेस कॅम्प गाठून दिव्या सिंहने रचला इतिहास
10
लोकप्रिय मराठी अभिनेत्रीने दुसऱ्यांदा बांधली लग्नगाठ, इंडस्ट्रीतलाच आहे नवरा; ओळखलंत का?
11
"दादांचं स्वप्न, बारामतीचा ध्यास... दुःख तळघरात कोंडलं अन्...!"; उमेदवारी अर्ज भरण्यापूर्वी सुनेत्रा पवार भावुक, दिलं मोठं वचन
12
अखेर ट्रायम्फने ३५० सीसीची मोटरसायकल लाँच केली! जीएसटीचा फायदा अन् किंमत पाहून म्हणाल...
13
"काळजी करू नका, एकाही कार्यकर्त्याला वाऱ्यावर सोडणार नाही, दादांचा जनता दरबार..."; सुनेत्रा पवार यांचा शब्द
14
इराणच्या होर्मुझमधून निघालं भारताचं ८वं जहाज, २० हजार टन LPG घेऊन 'ग्रीन आशा' मायदेशात येणार!
15
तरुणीचा 'शोले' स्टाईल ड्रामा! असं काय घडलं की मोबाईल टॉवरवर चढून तरुणीने घरच्यांना दिली धमकी?
16
राहुरीत शरद पवार गटाचा उमेदवार ठरला, गोविंद मोकाटे निवडणूक लढवणार, प्राजक्त तनपुरेंची माघार?
17
७ दिवसांत दुप्पट झाला 'हा' शेअर; १००% पेक्षा अधिक वाढली किंमत, IPL टीमची मालक आहे कंपनी
18
इराण-इस्रायल संघर्षाचा भारतीय PMI वर परिणाम! सर्व्हिस सेक्टरची गती मंदावली; महागाईने कंबरडे मोडणार?
19
सलग तीन पराभवनानंतर CSK साठी गुड न्यूज, धोनी आणि ब्रेव्हिस ‘या’ सामन्यातून करणार पुनरागमन 
20
लग्नाच्या पहिल्याच रात्री नववधूला...! नवरदेवाने थेट गाठले पोलीस स्टेशन; आग्र्यातील धक्कादायक घटना
Daily Top 2Weekly Top 5

मनरेगाला निधीचा दुष्काळ

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: April 17, 2018 22:12 IST

दुष्काळी परिस्थितीत मजुरांच्या हाताला काम उपलब्ध व्हावे. यासाठी महात्मा गांधी राष्ट्रीय ग्रामीण रोजगार हमी योजनेतंर्गत कुशल-अकुशल कामे उपलब्ध करुन देण्यात आली.

ठळक मुद्देमजुरांवर उपासमारीची पाळी : ३६ कोटी रूपये थकीत

नरेश रहिले।लोकमत न्यूज नेटवर्कगोंदिया : दुष्काळी परिस्थितीत मजुरांच्या हाताला काम उपलब्ध व्हावे. यासाठी महात्मा गांधी राष्ट्रीय ग्रामीण रोजगार हमी योजनेतंर्गत कुशल-अकुशल कामे उपलब्ध करुन देण्यात आली. यामुळे हजारो मजुरांच्या हाताला काम मिळाले. मात्र दिवसभर घाम गाळून चार पैसे हाती पडतील अशी अपेक्षा मजुरांना होती. पण शासनाकडून निधी न मिळाल्याने मनरेगाला निधीचा दुष्काळ पडल्याचे चित्र आहे.दुष्काळाचा सामना करण्यासाठी महात्मा गांधी राष्ट्रीय ग्रामीण रोजगार हमी योजना सुरू करण्यात आली. या अभियानांतर्गत मजुरांना कामे उपलब्ध करुन देण्यात जिल्हा राज्यात अव्वल आला. परंतु दुसरीकडे कुशल-अकुशल कामाचे पैसे प्रलंबित ठेवण्यात जिल्हा राज्यात अव्वल आहे. सन २०१७-१८ मध्ये राज्यात मनरेगाच्या कामाचे २८३ कोटी १२ लाख ५ हजार रूपये प्रलंबित आहेत. यातील २६४ कोटी ४६ लाख ९७ हजार कुशल तर १८ कोटी १७ लाख १३ हजार अकुशल कामाचे आहेत. जिल्ह्यातील ३६ कोेटी ३ लाख ५२ हजार रूपये निधी शासनाने अद्यापही दिला नाही. यातील ३५ कोटी ६३ लाख १५ हजार कुशल तर ३९ लाख ९६ हजार अकुशल कामाचे प्रलंबित आहेत. यात जिल्ह्याच्या देवरी तालुक्यातील १२ कोटी ५ लाख ७४ हजार, अर्जुनी-मोरगाव ५ कोटी एक लाख ९१ हजार रूपये, सालेकसा ४ कोटी ५० लाख ६१ हजार, आमगाव ३ कोटी ७१ लाख ७४ हजार रूपये, गोरेगाव तालुक्याचे ३ कोटी २ लाख ४४ हजार रूपये, सडक-अर्जुनी २ कोटी ८२ लाख ४८ हजार रूपये, गोंदिया २ कोटी ६२ लाख ८८ हजार व तिरोडा २ कोटी २५ लाख ७३ हजार रूपये प्रलंबित आहेत. कुशल कामाचे पैसे मोठ्या प्रमाणात न मिळाल्यामुळे, घरकुल, शौचालयाचे बांधकाम ठप्प पडले आहे.बांधकाम साहित्य पुरवठा करणाऱ्या दुकानदारांनी आधी उधारी द्या नंतरच साहित्य पुरवठा करु अशी भूमिका घेतली आहे. त्यामुळे लाभार्थ्यांसमोर प्रश्न चिन्ह निर्माण झाला आहे. जिल्हा प्रशासनातर्फे एकीकडे सर्वाधिक कामे उपलब्ध करुन देण्याचा दावा केला जात आहे. मात्र दुसरीकडे मजुरांची कोट्यवधी रुपयांची मजुरी शिल्लक आहे.चंद्रपूर राज्यात दुसऱ्या क्रमांकावरगोंदियानंतर राज्यात नागपूर विभागातील चंद्रपूर जिल्हा दुसऱ्या क्रमांकावर आहे. चंद्रपूर जिल्ह्याचे २९ कोटी ३२ लाख ७७ हजार रूपये प्रलंबित आहेत. यात २९ कोटी १३ लाख ५५ हजार कुशल तर १८ लाख ६ हजार अकुशल मजुरीचे प्रलंबित आहेत. तिसऱ्या क्रमांकावर अमरावती असून या जिल्ह्याचे २४ कोटी २८ लाख ८ हजार रूपये प्रलंबित आहेत. यात २३ कोटी १३ लाख १७ हजार कुशल तर एक कोटी १२ लाख ६६ हजार अकुशल मजुरीचे आहेत.