शहरं
Join us  
Trending Stories
1
बालेंद्र शाहांचा नकार; सुशीला कार्की होणार नेपाळच्या पंतप्रधान? तरुणांचा सर्वाधिक पाठिंबा...
2
महाराष्ट्राचे नवे राज्यपाल कोण? सीपी राधाकृष्णन राजीनामा देणार; १२ सप्टेंबरला उपराष्ट्रपतीपदाची शपथ घेण्याची शक्यता
3
शोरुममधून बाहेर पडताच नवीन कारचा अपघात झाला तर विमा मिळतो का? जाणून घ्या...
4
IND vs UAE : सूर्यानं टॉस जिंकला! बॉलिंग घेतल्यावर UAE चा कॅप्टन म्हणाला; बॅटिंग करायची ना...
5
दात घासताना ८० वर्षीय वृद्धाच्या अन्ननलिकेत झाडाची काडी अडकली; ७ दिवस उपाशी राहिले अन्...
6
पुण्यात भलामोठा आयकर रिटर्न घोटाळा; आयटी, मल्टीनॅशनल कंपन्यांचे कर्मचारी अडकले... 
7
नेपाळमधील सत्तापालटावर चीनची पहिली प्रतिक्रिया; माजी पंतप्रधान ओलींचं नाव घेणं टाळलं!
8
मुंबई महापालिका निवडणुकीसाठी शिंदेसेनेची 'जम्बो टीम'; २१ नेत्यांची मुख्य कार्यकारी समिती जाहीर
9
आर्टिफिशियल फ्लेवर्स, प्रिझर्व्हेटिव्ह्जशिवाय घरीच करा 'अ‍ॅपल जॅम'; मुलं म्हणतील, यम्मी...
10
ठाकरेंचा आवाज छत्रपती शिवाजी महाराज पार्कवर घुमणार; दसरा मेळाव्याला महापालिकेची परवानगी
11
Samruddhi Mahamarg : ‘समृद्धी महामार्गावर’वर दिसणारे ते खिळे नाहीत, मग काय?; समजून घ्या 'इपॉक्सी ग्राउटिंग' तंत्रज्ञान
12
वायफाय राउटरच्या बाजूला ठेवल्यात 'या' गोष्टी? आताच बाजूला करा अन्यथा...
13
आयटी सेक्टरमध्ये तेजी! गुंतवणूकदारांनी कमावले २.६४ लाख कोटी रुपये; 'हे' स्टॉक्स ठरले टॉप गेनर
14
वॉशिंग्टन सुरक्षित केले म्हणून डोनाल्ड ट्रम्प हॉटेलमध्ये जेवायला गेले...; लोकांनी जे केले...
15
अमरावतीची 'हवा'च न्यारी! देशात डंका, राष्ट्रीय स्तरावर पटकावला पहिला क्रमांक
16
उपराष्ट्रपती निवडणुकीत 'क्रॉस व्होटिंग'च्या संशयाची सुई; कोणत्या खासदारांनी ऐनवेळी पलटी मारली?
17
भरणी श्राद्ध २०२५: गुरुवारी भरणी श्राद्ध, एकदा करावे की दरवर्षी? अधिकार कोणाला आणि नियम काय?
18
भारतीय अर्थव्यवस्था सुसाट! टॅरिफचा धाक दाखवणाऱ्या अमेरिकेला 'फिच' रिपोर्टने धक्का! इतका वाढणार जीडीपी
19
भयंकर! नेपाळनंतर फ्रान्समध्ये सरकारविरुद्ध मोठं आंदोलन; रस्त्यावर जाळपोळ अन् तोडफोड
20
जिच्यासाठी माजी उपसरपंच गोविंद बर्गे यांनी आयुष्य संपवलं, ती पूजा गायकवाड कोण?

नोकरीचे आमिष देऊन गंडविले

By admin | Updated: July 20, 2015 01:30 IST

येथील नतून महाराष्ट्र विद्यालयात शिक्षकाची नोकरी देण्याचे आमिष देऊन पाच लाख रूपये घेऊन फसवणूक केल्याची तक्रार भंडारा पोलीस ठाण्यात केली.

मारण्याची धमकी : पोलिसात तक्र ार देऊनही कारवाई नाहीभंडारा : येथील नतून महाराष्ट्र विद्यालयात शिक्षकाची नोकरी देण्याचे आमिष देऊन पाच लाख रूपये घेऊन फसवणूक केल्याची तक्रार भंडारा पोलीस ठाण्यात केली. परंतु, पोलिसांनी अद्याप कारवाई केली नाही. संबंधितांविरुद्ध कारवाईची मागणी टिकाराम बांते यांनी केली आहे.लाखनी तालुक्यातील लाखोरी येथील टिकाराम बांते यांनी मुलगा प्रसाद बांते यांच्या नोकरीसाठी ८ आॅक्टोबर २०११ रोजी नूतन महाराष्ट्र विद्यालयाचे सचिव रविंद्र भालेराव यांना भेटले. त्यावेळी माध्यमिक शिक्षक म्हणून नोकरी लावून देतो, फेब्रुवारी महिन्यामध्ये तुम्हाला नोकरीचे आदेश मिळेल, असे आश्वासन देऊन ५ लाख रूपये मागितले. मुलगा शिक्षक बनेल या उद्देशाने बांते यांनी नातेवाईकांकडून उसणवारी करून ५ लाख रूपयाची जुळवाजुळव केली. मुरलीधर कंगाले रा.उसरागोंदी यांच्या मध्यस्थीने १५ आॅक्टोबर २०११ ला ही रक्कम भालेराव यांना दिली. त्यावेळी मनोहर ठवकर, प्रसाद बांते व दोनोडे उपस्थित होते, असे टिकाराम बांते यांनी तक्र ारीत नमूद केले आहे. परंतु, फेब्रुवारी महिना लोटूनही नोकरीचे आदेश मिळाले नाही. त्यामुळे टिकाराम बांते यांनी भालेराव यांना विनंती केली. शेवटी २ मार्च २०१५ ला स्वत:च्या स्वाक्षरीचे अडीच लाख रूपयांचा धनादेश बांते यांचे नातेवाईक अरविंद हलमारे यांच्याकडे आणून दिला. यावेळी भालेराव यांच्यासोबत शाळेचा शिपाई जयदेव कांबळे सोबत होता. उर्वरीत रक्कम एक महिन्यात देण्याची कबुलीही दिली होती. लाखनी स्टेट बँकेचा अडीच लाख रूपयाचा धनादेश दिला. परंतु खात्यात पैसे नसल्यामुळे बँकेतून धनादेश परत आला. त्यानंतर पैसे मिळण्यासाठी त्यांनी भालेराव यांना मागणी केली. परंतु कारणे समोर करीत टाळाटाळ करीत आहेत. ७ जून २०१५ रोजी रविंद्र भालेराव यांच्या घरी जाऊन पैशाची मागणी केली असता, त्यांनी उडवाउडवीची उत्तरे देऊन शिवीगाळ केल्याचे बांते यांचे म्हणणे आहे. याप्रकरणी टिकाराम बांते यांनी विशेष पोलीस महानिरीक्षक, जिल्हाधिकारी, पोलीस अधिक्षक यांना निवेदन दिले. परंतु, पोलिसांनी कोणतीही कारवाई केली नाही. यासंदर्भात भालेराव यांच्याशी संपर्क साधण्याचा प्रयत्न केला असता त्यांचा भ्रमणध्वनी बंद होता. (नगर प्रतिनिधी) धावत्या रेल्वेत तरुणीला लुबाडलेतुमसर (भंडारा) : गोंदिया-तुमसर रोड रेल्वे प्रवासादरम्यान दोन युवकांनी एका युवतीजवळील सोनसाखळी व रोख ९०० रुपये हिसकाविले. तुमसर रोड रेल्वे स्थानकावर उतरल्यावर त्या युवकांनी तिचा पाठलाग केला. या घटनेचा मानसिक धक्का बसल्याने तिच्यावर नागपूर येथील खासगी रुग्णालयात उपचार सुरु आहेत.गोंदियाहून नागपूरकडे सायंकाळच्या प्रवाशी रेल्वने जात होती. गोंदियाहून रेल्वे सुटल्यानंतर दोन युवक तिच्याजवळ आले. धावत्या रेल्वेत तिच्याजवळील सोनसाखळी व रोख ९०० रुपये हिसकावले. या घटनेमुळे ती घाबरली. त्यानंतर दुसऱ्या डब्ब्यात बसून नागपूरला गेली. (तालुका प्रतिनिधी)