देवरी : राष्ट्रीय महामार्ग क्रमांक ६ वरील मासुलकसा घाटावर वायरिंगमध्ये झालेल्या शॉर्ट सर्किटमुळे चालत्या मिनीट्रकने पेट घेतल्याने तो ट्रक जळून खाक झाला. ही घटना मध्यरात्री १.३० वाजताच्या सुमारास घडली. प्राप्त माहितीनुसार, सदर ट्रक (एमएच ४०, एन ३०४४) नागपूरवरून रायपूरकडे जात होता. या ट्रकमध्ये १० ते १५ लाखांचे डी.जे.चे साहित्य होते. सुदैवाने ट्रकमध्ये आग लागल्याचे लक्षात येताच चालक व वाहकाने ट्रक रस्त्यालगत थांबवून बाहेर उडी घेतली. त्यामुळे कोणतीही जीवित हाणी झाली नाही. देवरी पोलीस याप्रकरणी अधिक तपास करीत आहे. (प्रतिनिधी)
मिनी ट्रक जळून खाक
By admin | Updated: September 8, 2016 00:33 IST