शहरं
Join us  
Trending Stories
1
नारायण राणे म्हणजे शून्यातून विश्व निर्माण करणारे नेतृत्व; मुख्यमंत्री फडणवीसांकडून कार्याचा गौरव
2
खामेनेईच्या हत्येनंतर इराण बनला आणखी धोकादायक, अमेरिका-इस्रायलचे IDF च्या रिपोर्टने वाढवले टेन्शन
3
वैभव सूर्यवंशीचा आणखी एक धमाका! भुवी-जोश हेजलवूडची धुलाई; फक्त १५ चेंडूत ठोकली फिफ्टी
4
हे काय चाललंय! आधी धडक दिली, प्रश्न विचारताच तरुणाला फरफटत नेले, अंबरनाथमधील घटना कॅमेऱ्यात कैद
5
Virat Kohli Clean Bowled : बिश्नोईचा जादूई चेंडू...२०० च्या स्ट्राईक रेटनं धावा काढणारा कोहली फसला
6
RR vs RCB : जोफ्राचा सॉलिड बाउन्सर! पहिल्याच बॉलवर सॉल्टचा 'करेक्ट कार्यक्रम' (VIDEO)
7
‘धुरंधर’ अभिनेता रणवीर सिंगने संघ मुख्यालयात घेतली सरसंघचालक मोहन भागवत यांची भेट
8
"अमेरिकेची जहाजेही होर्मुझ सामुद्रधुनीतून जाऊ शकतात, फक्त त्यांनी...", इराणची ट्रम्प यांच्याकडे मागणी काय?
9
LPG-PNG ची चिंता मिटली! देशभरात गॅस अन् पेट्रोल-डिझेलचा पुरवठा सुरळीत, केंद्राची स्पष्टोक्ती
10
IPL 2026 : RR नं हुषार गोलंदाजाला बसवलं बाकावर; RCB च्या ताफ्यात 'मॅच विनर' परतल्याचा आनंद
11
मुंबईत २५३८, तर महाराष्ट्रात MHADA १३ हजार १२ घरे बांधणार
12
Video - वृंदावनमध्ये मोठी दुर्घटना! यमुनेत भाविकांची बोट उलटली; १० जणांचा मृत्यू, अनेक जण बेपत्ता
13
LSG ला मोठा धक्का! मॅच विनर ऑलराउंडर स्पर्धेतून OUT; 'या' खेळाडूची IPL मध्ये वाइल्ड कार्ड एन्ट्री
14
चमत्कार! अपघातात अपहरण केलेले दोन चिमुकले वाचले, तर तीन अपहरणकर्त्यांचा जागीच मृत्यू
15
Sanoj Mishra : Video - "मोनालिसा अल्पवयीन, सत्याचा विजय, लव्ह-जिहादचा पर्दाफाश"; सनोज मिश्रांचा हल्लाबोल
16
होर्मुजमधून जाण्यासाठी इराण घेतोय २० लाख डॉलर! भारत किती रुपये मोजतोय? परराष्ट्र मंत्रालयानं दिले उत्तर
17
Ashok Kharat Case: रुपाली चाकणकर यांची बहीण प्रतिभा चाकणकरांची चौकशी होणार,पोलिसांनी बजावली नोटीस
18
Mumbai: वांद्र्यात जलवाहिनी फुटल्यानं रस्ते जलमय; वाहतूक विस्कळीत, नागरिकांचेही हाल!
19
RR vs RCB : 'छोटा पॅक बडा धमाका' की, स्विंगचा किंग पुन्हा ठरणार भारी! वैभव पलटवार करणार?
20
मोठी पण अनपेक्षित घडामोड! रशिया-युक्रेनमध्ये झालेले सीझफायर भविष्यासाठी किती फायद्याचे...
Daily Top 2Weekly Top 5

मिनी मंत्रालयाचा २८ कोटीचा अर्थसंकल्प

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: February 28, 2019 22:37 IST

गोंदिया जिल्हा परिषदेचा सन २०१८-१९ चा सुधारीत व २०१९-२० चा २८ कोटी २६ लाख ६६ हजार रुपयांचा संभाव्य खर्चाचा अर्थसंकल्प जि.प.उपाध्यक्ष अल्लाफ हमीद यांनी गुरूवारी (दि.२८) सभागृहात सादर केला. या अर्थसंकल्पात जिल्हा परिषद सदस्यांना दिल्या जाणाऱ्या निधीत वाढ करीत हा निधी ७ वरुन ८ लाख रुपये करण्यात आला.

ठळक मुद्देजि.प.सदस्यांच्या निधीत वाढ : पाणीपुरवठा, कृषी विषयक योजनांवर भर

लोकमत न्यूज नेटवर्कगोंदिया : गोंदिया जिल्हा परिषदेचा सन २०१८-१९ चा सुधारीत व २०१९-२० चा २८ कोटी २६ लाख ६६ हजार रुपयांचा संभाव्य खर्चाचा अर्थसंकल्प जि.प.उपाध्यक्ष अल्लाफ हमीद यांनी गुरूवारी (दि.२८) सभागृहात सादर केला. या अर्थसंकल्पात जिल्हा परिषद सदस्यांना दिल्या जाणाऱ्या निधीत वाढ करीत हा निधी ७ वरुन ८ लाख रुपये करण्यात आला. पाणी पुरवठा आणि कृषी विषयक योजनांवर भरीव तरतूद करण्यात आली.जिल्हा परिषदेची अर्थसंकल्पीय सर्वसाधारण सभा गुरूवारी (दि.२८) दुपारी जि.प.च्या सभागृहात आयोजित करण्यात आली होती. जि.प.अध्यक्षा सीमा मडावी यांच्या अध्यक्षतेखाली सभेला सुरूवात झाली. जि.प.उपाध्यक्ष तथा अर्थ सभापती अल्लाफ हमीद यांनी दुपारी १ वाजता अर्थसंकल्प सादर केला. या वेळी सन २०१८-१९ चा ३३ कोटी ४१ लाख ९३ हजार रुपयांचा सुधारित तर सन २०१९-२० चा २८ कोटी २६ लाख ६६ हजार रूपयांचा संभावित अर्थसंकल्प सादर केला आहे. या अर्थसंकल्पात समाज कल्याण, ग्रामीण पाणी पुरवठा, महिला व बाल कल्याण व दिव्यांग कल्याणासाठी भरीव निधीची तरतूद करण्यात आली.जिल्हा परिषद सदस्यांना दिल्या जाणारा निधी ८ लाख रूपये करण्यात आला. तर दुकान गाळे बांधकामासाठी १ कोटी रुपयांची तरतूद करण्यात आली. जिल्हा परिषदेच्या शाळांमध्ये पाणी व शौचालयांची व्यवस्था करण्यासाठी २० लाख रुपयांची तरतूद करण्यात आली आहे. गोरेगाव तालुक्यातील आंतरराष्ट्रीय दर्जाच्या जाम्या तिम्या जिल्हा परिषद हायस्कूलसाठी विशेष निधी अंतर्गत ५ लाख रुपयांची तरतूद करण्यात आली. वसतिगृहातील विद्यार्थ्यांचा आकस्मिक मृत्यू झाल्यास सानुग्रह अनुदानासाठी ८६ लाख रुपये, दिव्यांगाना तीन चाकी सायकल,श्रवणयंत्र, संगणक प्रशिक्षण यासाठी १७ लाख व महिलांना शिलाई मशिन, सौरकंदील व अंगणवाडी दुरूस्तीसाठी १ कोटी ३९ लाख रुपयांची तरतूद करण्यात आली आहे. ग्रामीण पाणी पुरवठा विभागाकरिता १ कोटी ५० लाख व कृषी विभागासाठी मागील वर्षीच्या तुलनेत २० टक्के निधीत वाढ केली आहे.पंचायत विभागातंर्गत महाआॅनलाईनचे संगणक आॅपरेटर यांचे थकीत मानधन देण्यासाठी नवीन लेखाशिर्ष तयार करण्यात आला आहे. या वेळी जि.प.सदस्य गंगाधर परशुरामकर, किशोर तरोणे, रमेश चुºहे, पी.जी.कटरे, सुरेश हर्षे, उषा शहारे, उषा मेंढे या सदस्यांनी बांधकामासाठी करण्यात आलेल्या निधीत कपात करुन तो निधी कृषी आणि पाणी पुरवठा विभागासाठी वाढविण्याची मागणी केली. सेंद्रिय शेती व तसेच कृषी विषयक योजनांवर भर देण्याची मागणी केली. ही मागणी मान्य करीत या योजनांवरील निधीत वाढ करण्यात आली.अर्थसंकल्पाची वैशिष्टयेशहीद जाम्या तिम्या हायस्कूलसाठी ५ लाखांची तरतूदप्रत्येक जि.प.शाळेत शौचालय व शुध्द पाण्याची सुविधादुकान गाळे बांधकामासाठी १ कोटी रुपयेसंगणक आॅपरेटरच्या मानधनासाठी निधीची तरतूददिव्यांगाना साहित्य वाटपासाठी दीड कोटीउत्कृष्ट शेतकऱ्यांचा सत्कारअंगणवाडी इमारतीची दुरूस्ती करणार

टॅग्स :zpजिल्हा परिषद