शहरं
Join us  
Trending Stories
1
भय इथले संपत नाही! अमेरिका-इराण शस्त्रसंधी झाली तरी आखाती देश हाय अलर्टवर; तणाव कायम
2
Iran युद्धात शस्त्रसंधीच्या घोषणेनं दिलासा; कच्च्या तेलाच्या किमतीत मोठी घसरण आणि अमेरिकन बाजारात बंपर तेजी
3
ट्रम्प-इराण युद्धविरामात पाकिस्तानचा गेम? 'कॉपी-पेस्ट' मेसेजने पोलखोल, शाहबाद यांची स्क्रिप्ट कुणी लिहिली?
4
आजचे राशीभविष्य, ०८ एप्रिल २०२६: नोकरदारांना ऑफिसमध्ये अनुकूल वातावरण, आर्थिक लाभाची शक्यता
5
अमेरिका-इराणमध्ये २ आठवड्यांसाठी युद्धबंदी; डोनाल्ड ट्रम्प यांच्याकडून हल्ले थांबवण्याची घोषणा
6
पहिल्या पॉड टॅक्सीचे भूमिपूजन; मात्र कुर्ला ते वांद्रे रेल्वे स्थानक प्रवासासाठी २०३१ची प्रतीक्षा
7
‘टनेल बोरिंग’ मशिनवर 'ठाणेकर' उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे ठेवणार नजर- मुख्यमंत्री फडणवीस
8
बंगालमध्ये मतदारयादीत 'महा-सफाई'! आगामी विधानसभा निवडणुकीआधी वगळली ९१ लाख नावे
9
इशारा : युद्धामुळे महागाई, व्याजदर वाढणार; ‘जेपी मॉर्गन चेस’चे सीईओ जेमी डिमन यांचे भाकीत
10
भोंदूबाबा अशोक खरात संबंधीच्या ४,६५० अश्लील लिंक डिलीट; ६० दिवसांत दोषारोपपत्र
11
पुनर्वसनानंतर १२ हजार कोटींचा बोजा; नवी मुंबईच्या गळ्याला बसणार लोकसंख्येचा फास
12
२०१४ मधील पोलिस कोठडी मृत्यू प्रकरणी सात पोलिसांविरुद्ध खुनाचा आरोप कायम
13
१०% श्रीमंतांच्या ताब्यात ४४% जमीन; ग्रामीण भागात ४६% कुटुंबे भूमिहीन; जमीनदारांचे वर्चस्व
14
निष्पाप विघ्नेशला मुख्यमंत्री निधीतून मदत; देवेंद्र फडणवीस यांच्याकडून वसईतील घटनेची दखल
15
होर्मुझ खुली करण्याची शेवटची आशा संपली! UNSC मध्ये झाले मतदान, पण चीन-रशियाचे 'व्हिटो'अस्त्र
16
राजस्थानचा 'रॉयल' विजय! यशस्वी, वैभवने गोलंदाजांना धुतले, मुंबई इंडियन्सचा २७ धावांनी पराभव
17
नीलम शिंदेची झुंज संपली, तो कॉल ठरला काळीज चिरून टाकणारा; वडिलांना व्हिडीओ कॉलद्वारे घ्यावे लागणार अंतिम दर्शन
18
कडक! बुमराहचं वैभव सूर्यवंशीने असं केलं स्वागत! पहिल्याच ओव्हरमध्ये ठोकले दोन गगनचुंबी षटकार; पहा व्हिडिओ
19
अशोक खरातच्या अश्लील व्हिडीओंची १५ ते २० रुपयांना विक्री, गुन्हा दाखल, त्या व्यक्तीला लवकरच करणार अटक
20
"आज रात्री एका संस्कृतीचा अंत होईल..."; डोनाल्ड ट्रम्प यांची इराणला सर्वात मोठी धमकी
Daily Top 2Weekly Top 5

‘मिनी मंत्रालय’ कोणाच्या ताब्यात?

By admin | Updated: July 6, 2015 01:11 IST

जिल्हा परिषदेसह आठही पंचायत समित्यांच्या सार्वत्रिक निवडणुकीचा निकाल सोमवारी (दि.६) लागणार आहे.

आज फैसला : ६६० उमेदवारांचे भाग्य ठरणारगोंदिया : जिल्हा परिषदेसह आठही पंचायत समित्यांच्या सार्वत्रिक निवडणुकीचा निकाल सोमवारी (दि.६) लागणार आहे. सकाळी १० वाजतापासून तालुकास्थळी होणाऱ्या या मतमोजणीची उत्सुकता सर्वांना लागली असून ‘मिनी मंत्रालय’ समजल्या जाणाऱ्या जिल्हा परिषदेवर आपली सत्ता कायम राखण्यात भाजपला यश येते की राष्ट्रवादी काँग्रेस आणि काँग्रेस जिल्हा परिषदेवर कब्जा करते याकडे सर्वांचे लक्ष लागले आहे.जिल्हा परिषदेच्या ५३ जागांसाठी २३७ तर पंचायत समित्यांच्या १०६ जागांसाठी ४२३ असे एकूण ६६० उमेदवार निवडणूक रिंगणात होते. प्रामुख्याने भाजप, राष्ट्रवादी काँग्रेस आणि काँग्रेस अशी तिहेरी लढत बहुसंख्य ठिकाणी होती. विशेष म्हणजे ५० टक्के महिला आरक्षणामुळे योग्य अशा महिला उमेदवार निवडताना सर्वच पक्षांची शेवटपर्यंत तारांबळ उडाली होती. काहींनी स्वकर्तृत्वावर तर काहींनी पक्षाच्या ताकदीने पूर्ण ताकद लावून निवडणूक लढली. पण मतदार राजाने कोणाच्या झोळीत बहुमताचे दान टाकले हे सोमवारच्या मतमोजणीनंतरच स्पष्ट होणार आहे. दुपारी २ वाजेपर्यंत सर्व निकाल जाहीर होणे अपेक्षित आहे. (जिल्हा प्रतिनिधी)या ठिकाणी होणार मतमोजणी३० जूनला झालेल्या मतदानानंतर गेले पाच दिवस मतदान यंत्र (ईव्हीएम) ठिकठिकाणच्या स्ट्राँग रूममध्ये सीलबंद करून ठेवण्यात आले आहे. सोमवारी सकाळी हे सील उघडून १० वाजता मतमोजणीला सुरूवात होणार आहे. गोंदिया तालुक्यातील जिल्हा परिषद आणि पंचायत समिती मतदार संघांची मतमोजणी शासकीय तंत्रनिकेतन फुलचूरपेठ, फुलचूर येथे, आमगाव व अर्जुनी मोरगाव तालुक्याची मतमोजणी तेथील कृषी उत्पन्न बाजार समितीच्या आवारात, सालेकसा, तिरोडा, गोरेगाव व देवरी येथील मतमोजणी तेथील शासकीय औद्योगिक प्रशिक्षण संस्थेत (आयटीआय), तर सडक अर्जुनी तालुक्याची मतमोजणी तेथील तहसील कार्यालयात होणार आहे.