शहरं
Join us  
Trending Stories
1
एकल पदाच्या पदोन्नती, भरतीमध्ये आरक्षण नाहीच! आजवरचे सगळे आदेश रद्द करून काढला नवा शासन निर्णय
2
"तोपर्यंत इराणला पत्ताही नव्हता"; अमेरिकेतील 'त्या' खबऱ्यामुळे अडकले असते दोन सैनिक; ट्रम्प यांचा खुलासा
3
LPG Price Today: आज एलपीजी सिलिंडरच्या किमतीबाबत काय आहेत अपटेड? पटापट चेक करा
4
‘भळाभळा रक्त वाहत होते, पण तो…’ ट्रम्प यांनी सांगितली इराणमध्ये अडकलेल्या ‘त्या’ सैनिकाच्या शौर्याची कहाणी  
5
आजचे राशीभविष्य, ०७ एप्रिल २०२६: गूढ रहस्यमय विद्येचे आकर्षण राहील; प्रकृती उत्तम राहील
6
'आमच्या बाई आम्हाला परत द्या', विद्यार्थ्यांचा टाहो; जिल्हाधिकाऱ्यांच्या दालनासमोर चिमुरड्यांचा ठिय्या
7
Air India च्या सीईओंचा राजीनामा, अनेक आव्हानांचा सामना करतेय कंपनी; पाहा डिटेल्स
8
इराणला अमेरिकेचा अखेरचा अल्टिमेटम; "रात्री ८ पर्यंत निर्णय घ्या, अन्यथा थेट पाषाण युगात पाठवू"
9
राज्यातील खासदार, आमदारांविरोधात हत्या, बलात्काराचे खटले; आकडेवारीत मुंबई प्रथम
10
भोंदू अशोक खरातवर EDकडून गुन्हा दाखल; आर्थिक गैरव्यवहारप्रकरणी लवकरच होणार छापेमारी
11
समान नागरी संहिता, वन नेशन-वन इलेक्शन हे भाजपचे अजेंडे अद्याप अपूर्ण: पंतप्रधान मोदी
12
राष्ट्र समृद्ध आणि सुरक्षित असेल तरच वैयक्तिक समृद्धी शक्य- सरसंघचालक मोहन भागवत
13
धोक्याची घंटा! एआय डेटा सेंटर्समुळे वाढतोय पृथ्वीचा पारा; कोट्यवधींवर ओढावणार संकट
14
अनिल अंबानी समूहाच्या कर्ज प्रकरणात ७३ हजार कोटी रुपयांचा महाघोटाळा; CBIचा दावा
15
दिल्ली विधानसभेत थरार! कडक सुरक्षा व्यवस्थेला आव्हान देत बॅरिकेड तोडून SUV आत
16
आसाममध्ये हिमंता बिस्वा सरमा सत्ता टिकवणार की, गौरव गोगोई समीकरणे बदलणार?
17
इराणमधील अनेक शहरांवर बॉम्ब हल्ले; शैक्षणिक संस्थाही लक्ष्य, २५ हून अधिक नागरिक ठार
18
आयपीओंचा महापूर, ३८ ‘ड्राफ्ट पेपर’ दाखल! १२४ कंपन्या मुहूर्ताच्या प्रतीक्षेत, गुंतवणूकदारांची चांदी
19
तामिळनाडूमध्ये ७५ टक्के मंत्रिमंडळ भ्रष्टाचाराच्या खाईत अडकलेले : देवेंद्र फडणवीस
20
सोने दीड लाखावर, तरी खरेदी जोरात; आयात तुफान वाढली, भारताला स्वित्झर्लंडच्या सोन्याचा मोह
Daily Top 2Weekly Top 5

एमआयएम ‘सुपारी किलर’

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: January 13, 2016 02:27 IST

खासदार ओवेसी यांचा ‘एमआयएम’ हा पक्ष महाराष्ट्रातील सर्व जिल्ह्यात आपले पाय पसरू पाहात आहे.

भाजपचा आरोप : अल्पसंख्यक आघाडी सक्रियगोंदिया : खासदार ओवेसी यांचा ‘एमआयएम’ हा पक्ष महाराष्ट्रातील सर्व जिल्ह्यात आपले पाय पसरू पाहात आहे. मात्र हा पक्ष ‘सुपारी किलर’ असल्याचा आणि समाजाच्या नावावर खिसे भरण्याचे काम करणारा पक्ष असल्याचा घणाघात भाजपच्या अल्पसंख्यांक आघाडीचे प्रदेशाध्यक्ष जमाल सिद्धीकी यांनी केला.गोंदियात पत्रकारांशी बोलताना सिद्धीकी यांनी आता भाजपची अल्पसंख्यक आघाडी प्रत्येक जिल्ह्यात जास्त सक्रियपणे काम करणार असून त्यासाठी येणाऱ्या महानगर पालिका, नगर पालिकांच्या निवडणुकांमध्ये मुस्लिम उमेदवारांना योग्य प्रतिनिधीत्व देणार असल्याचे सांगितले. भाजप अल्पसंख्यक आघाडीने मुस्लिम समाजाला शिक्षणात आरक्षण देण्याची मागणी सरकारदरबारी मांडली आहे. शैक्षणिक विकास आणि सत्तेत वाटा मिळाल्याशिवाय समाजाची प्रगती होत नाही. त्यामुळे भाजपच्या प्रत्येक मुस्लिम नगरसेवकाने २० मुलांना दत्तक घेऊन त्यांच्या शिक्षणाची जबाबदारी पेलावी असा निर्णय झाल्याचेही सिद्दीकी यांनी सांगितले.मुस्लिम समाजाच्या विकासासाठी असलेल्या मौलाना आझाद आर्थिक विकास महामंडळाच्या ठिकठिकाणच्या कार्यालयांची मागील सरकारच्या काळात दुरवस्था झाली होती. आता ती दुरवस्था दूर केली जात आहे. येत्या फेब्रुवारी-मार्चपर्यंत राज्यातील बहुतांश महामंडळांच्या पदाधिकाऱ्यांची नियुक्ती होईल, असे ते म्हणाले. यावेळी भाजपचे जिल्हाध्यक्ष विनोद अग्रवाल, अल्पसंख्यक आघाडीचे कलाम शेख, मोहसीन खान, भाजप शहर अध्यक्ष भरत क्षत्रिय प्रामुख्याने उपस्थित होते. (जिल्हा प्रतिनिधी)