शहरं
Join us  
Trending Stories
1
"दैवीशक्ती असल्याचं भासवत लैंगिक शोषण, ३० पीडिता समोर आल्या..."; खरात प्रकरणात मोठे खुलासे
2
इस्रायलचा इराणवर मोठा हवाई हल्ला! १८ जणांचा मृत्यू, 24 गंभीर; दिग्गज लष्करी अधिकारी ठार? तेहरानसह शस्त्रास्त्र डेपो उद्ध्वस्त
3
बंगाल निवडणुकीसाठी कडेकोट सुरक्षा; २.४ लाख जवानांसह २० हजार महिला कमांडो तैनात
4
युद्ध चिघळलं! डेडलाइन संपण्याआधीच अमेरिकेचा खार्ग बेटावर मोठा हल्ला; इराणचा आर्थिक कणा मोडणार?
5
Manipur rocket attack: गोळ्यांचा आवाज आणि हिंसक जमाव;  मणिपूरमधील हिंसाचाराचे व्हिडीओ आले समोर
6
Mira-Bhayander Flyover: मीरा भाईंदरमधला व्हायरल झालेला 'तो' अजब पूल असा का बनला? खुद्द CM फडणवीसांनी केला खुलासा
7
सख्ख्या आतेभावानेच बहिणीवर केला अत्याचार; नराधम मुलाला धडा शिकवण्यासाठी आईनेच गाठले पोलीस स्टेशन
8
भूमिपूजन झालं, पण 'पॉड टॅक्सी' नेमकी असणार तरी कशी? फायदा काय? इत्थंभूत माहिती समजून घ्या २ मिनिटांत!
9
"मीरा भाईंदरला ३० टक्के जागा मेहतांच्या मालकीची, १० टक्के..."; मेट्रो उद्घाटनात रंगला संवाद
10
स्वतंत्र AI विभागाला मंजुरी, महावितरणाचा IPO येणार; महाराष्ट्र मंत्रिमंडळाचे ५ मोठे निर्णय
11
धोक्याची घंटा! तुम्हीही जेवताना फोन वापरताय? एका चुकीमुळे आतड्यांचं होतं गंभीर नुकसान
12
Travel : हिमालयातील निळ्याशार पाण्याचा स्वर्ग! 'चंद्रताल'ला जाण्याचा प्लॅन करताय तर 'हे' नक्की वाचा
13
फी भरण्यासाठी नाही, तर एअर होस्टेस गर्लफ्रेंडसाठी आयुषने विकली १० एकर जमीन; 'किडनी' कथेमागचे वास्तव ऐकून हादराल...
14
घात लावून बसल्यात घादिर...! आता समजले अमेरिकन युद्धनौका होर्मुझमध्ये घुसण्याचे का धाडस करत नाहीएत...
15
टाटापासून मारुतीपर्यंत 'या' आहेत देशातील टॉप ५ स्वस्तात मस्त कार! ५ लाखांच्या आत घरी आणा; मायलेजही खास
16
भारताची शान, ब्रह्मोस क्षेपणास्त्राचा जन्मदाता हरपला; ज्येष्ठ शास्त्रज्ञ अलेक्झांडर लिओनोव्ह यांचे निधन
17
Manipur Violence : रॉकेट हल्ल्यात २ मुलांचा मृत्यू, मणिपूरमध्ये पुन्हा हिंसाचार; बिष्णुपूरमध्ये कर्फ्यू, ५ जिल्ह्यांत इंटरनेट बंद
18
"डॉलर वर असो किंवा खाली..." राजपाल यादवला पैशांवरुन टोमणा मारणाऱ्यांना सलमानने सुनावलं
19
Feng shui: समृद्धीचं प्रतीक की पर्यावरणाचा रक्षक? बेडूक घराजवळ दिसणं तुमच्यासाठी किती शुभ आहे?
20
SIR नंतर पश्चिम बंगालमध्ये मतदार यादीतून हटवली ९० लाख मतदारांची नावं
Daily Top 2Weekly Top 5

खुल्या मैदानावर लावले लाखोंचे क्रीडा साहित्य

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: November 1, 2017 23:49 IST

नगर परिषद महिला व बाल कल्याण विभागातर्फे शहरातील खुल्या मैदानावर क्रीडा साहित्य लावण्यात आले. मैदानावर येणाºया लहान मुलांना खेळण्याचे साहित्य उपलब्ध व्हावे, हा यामागील उद्देश होता.

ठळक मुद्देनगर परिषदेचे अजब धोरण : चोरीपासून न.प. कर्मचारी अनभिज्ञ

लोकमत न्यूज नेटवर्कगोंदिया : नगर परिषद महिला व बाल कल्याण विभागातर्फे शहरातील खुल्या मैदानावर क्रीडा साहित्य लावण्यात आले. मैदानावर येणाºया लहान मुलांना खेळण्याचे साहित्य उपलब्ध व्हावे, हा यामागील उद्देश होता. मात्र खुल्या मैदानावर लावले लाखो रुपयांचे क्रीडा साहित्य अज्ञात चोरट्यांनी लांबविल्याची आहे. पण यापासून नगर परिषदचे कर्मचारी अनभिज्ञ असल्याचा प्रकार उघडकीस आला आहे.मुलांना खेळण्याचे साहित्य उपलब्ध करुन देण्यासाठी नगर परिषद महिला बालकल्याण विभागाने सन २०१३ मध्ये शहरातील विविध १४ ठिकाणी क्रीडा साहित्य लावण्याचे आर्डर दिले होते. तत्कालीन नगरसेवकांच्या मागणीवरुन लहान बालकांसाठी खेळणे आणि क्रीडा साहित्य लावण्याचा निर्णय घेण्यात आला होता. मात्र नगर परिषदेच्या संबंधित विभागाच्या अधिकाºयांनी क्रीडा साहित्य मागविल्यानंतर ते कोणकोणत्या ठिकाणी लावायचे याचे नियोजन केले नाही. त्यासाठी जागा सुध्दा निश्चित केल्या नाही.साहित्य येऊन पडल्याने अखेर ते शहरातील खुल्या मैदानावर लावण्यात आले. यानंतर या साहित्यांच्या देखभाल दुरूस्तीकडे कर्मचाºयांनी दुर्लक्ष केले. त्यामुळे बºयाच मैदानावर लावलेले क्रीडा साहित्य चोरीला गेल्याची माहिती आहे. क्रीडा साहित्य लावण्याचे कंत्राट अंजली फायब्रोटेक्स, एसके फायब्रोटेक्स व चंचल आॅफसेट यांना देण्यात आले होते.एकूण चार ठिकाणी हे साहित्य लावण्यात आले होते. अजंली फायब्रोटेक्स ला ९३ हजार ६०० रुपये, एसके फायब्रोटेक्सला १ लाख ७५ हजार ६८० रुपये, चंचल आॅफसेटला १ लाख २९ हजार २४० रुपयांच्या साहित्याचे आर्डर दिले होेते. दोन वर्षांपर्यंत हे साहित्य लावण्याचे काम सुरू होते.शहरात एकूण १४ ठिकाणी हे क्रीडा साहित्य लावण्यात येणार होते. मात्र सामान्य फडांत निधी नसल्याने निधी उपलब्धतेनुसार हे काम करण्यात आले.मैदानावर साहित्य लावल्यानंतर त्यांच्या देखभाल दुरूस्तीची जबाबदारी या विभागाची होती. मात्र त्यांनी याकडे दुर्लक्ष केल्याने काही मैदानावरील साहित्य चोरीला गेल्याचे चित्र आहे. तर काही ठिकाणच्या साहित्यांची दुरवस्था झाली असून त्यांचा उपयोग कपडे वाळविण्यासाठी केला जात आहे.नियम बसविले धाब्यावरज्या ठिकाणी बालोद्यान असेल त्या ठिकाणी लहान मुलांसाठी क्रीडा साहित्य लावले जाते. मात्र नगर परिषद महिला व बाल कल्याण विभागाने त्यांच्या मनमर्जीनुसार इतर ठिकाणी साहित्य लावले. जिथे हे क्रीडा साहित्य लावण्यात आले, त्यात गणेशनगर प्राथमिक शाळा, सिंधी स्कूलच्या मागे हरीकाशीनगर, प्राथमिक शाळा रामनगर, रेल्वे वार्ड, आंबेडकर वार्ड समाज भवन, गोवर्धन चौक छोटा गोंदिया, कृष्णपुरा वार्ड दर्गा, कव्वाली मैदान, संजयनगर, बिरजू चौक रामनगर, रावजीभाई समाजवाडी रामनगर, इंजिन शेड, चावडी चौक छोटा गोंदिया, मालवीय शाळा मैदान आदी जागांचा समावेश आहे.हे काम माझ्या कार्यकाळातील नाही. मात्र नगर परिषदेचे क्रीडा साहित्य चोरीला जाणे ही गंभीर बाब आहे. याची संबंधित अधिकाºयांकडून माहिती घेतो. तसेच यातील दोषींवर निश्चित कारवाई केली जाईल.- अशोक इंगळे,नगराध्यक्ष गोंदिया नगर परिषद.