शहरं
Join us  
Trending Stories
1
VIDEO: लाथ मारली, केस ओढून खाली आपटलं... मराठी तरूणीला परप्रांतीयाकडून बेदम मारहाण
2
बिहारच्या विधानसभेत तुफान राडा, आरजेडीचे आमदार आणि मार्शलमध्ये धक्काबुक्की
3
४ दिवसांपासून अन्नाचा कणही नाही...; मुलांच्या त्रासाला कंटाळलेल्या वृद्ध दाम्पत्याची गंगेत उडी
4
उपराष्ट्रपती पदी कोण बसणार? 'या' तीन नावे शर्यतीत; पहिल्या क्रमांकावर कोण?
5
"आधार, मतदान ओळखपत्र आणि रेशन कार्ड विश्वासार्ह कागदपत्रे नाहीत"; निवडणूक आयोगाची सुप्रीम कोर्टात धक्कादायक माहिती
6
"...असे जीवन जगत राहा"; 'मिसेस मुख्यमंत्र्यां'ची देवेंद्र फडणवीसांच्या वाढदिवशी खास पोस्ट
7
१२ कोटी रुपये, BMW आणि मुंबईत घर... पोटगीची मागणी ऐकून सुप्रीम कोर्ट म्हणालं,'तू कमवत का नाही?'
8
शेअर असावा तर असा...! ₹15 वरून ₹455 वर पोहोचला शेअर, आता मोठा व्हिस्की ब्रँड खरेदी करणार कंपनी!
9
Ajit Pawar Birthday: अजित पवारांचा असाही एक कार्यकर्ता, ११ एकर शेतजमिनीवर दादांचे चित्र रेखाटून दिल्या वाढदिवसाच्या शुभेच्छा!
10
२ मिनिटांत ₹१००० कोटींचा नफा; 'या' कंपनीच्या शेअरनं केली कमाल, मालकासह गुंतवणूकदारही मालमाल
11
सावधान...! १७ रुपयांपर्यंत घसरू शकतो या बँकेचा शेअर, २-२ तज्ज्ञांनी दिलाय विक्रीचा सल्ला; जाणून घ्या
12
मस्करीची कुस्करी! मी पडले तर तू मला वाचवशील? नवऱ्याला प्रश्न विचारला, कठड्यावरुन पाय घसरला
13
“माणिकराव कोकाटेंची हकालपट्टी करण्याची हिंमत CM फडणवीस यांच्यात नाही का?”: हर्षवर्धन सपकाळ
14
राजीनामा-शासन भिकारी, माणिकराव कोकाटेंच्या विधानावर CM फडणवीसांची प्रतिक्रिया; म्हणाले...
15
वालाचं बिरडं आणि डाळिंब्यांची उसळ यात आहे छोटासा फरक; श्रावण विशेष पारंपरिक रेसेपी 
16
Video : चाकू काढला आणि ३२ हजारांचा लेहेंगा फाडला, दुकानदाराला म्हणाला, 'तुलाही असाच फाडेन'; कल्याणमधील व्हिडीओ व्हायरल
17
Post Office मध्ये जमा करा १ लाख, मिळेल ₹१४,६६३ चं फिक्स व्याज; चेक करा डिटेल्स
18
प्राजक्ता माळीसोबत फोटो हवा म्हणून त्याने लिफ्टच थांबवली, पुढे काय घडलं? Video व्हायरल
19
कसोटीत सर्वाधिक मेडन ओव्हर्स टाकणारे टॉप ५ भारतीय गोलंदाज!
20
अदानी-महिंद्रासह दिग्गज स्टॉक्स गडगडले! सेन्सेक्स-निफ्टी सपाट; मात्र 'या' शेअरने केली कमाल!

पाणीटंचाईच्या नावाखाली लाखो रूपये खर्च

By admin | Updated: June 3, 2017 00:08 IST

सडक-अर्जुनी येथील नगर पंचायतचे मुख्याधिकारी संदीप छिद्रवार यांनी पाणी टंचाईच्या नावावर करारनामे न करता लाखो रूपये खर्च केले आहेत.

मुख्याधिकाऱ्यांवर कारवाई करा: ११ नगरसेवकांची जिल्हाधिकाऱ्यांकडे तक्रार लोकमत न्यूज नेटवर्क गोंदिया : सडक-अर्जुनी येथील नगर पंचायतचे मुख्याधिकारी संदीप छिद्रवार यांनी पाणी टंचाईच्या नावावर करारनामे न करता लाखो रूपये खर्च केले आहेत. या संदर्भात कोणत्याही नगरसेवकाला विश्वासात घेतले नसल्याचा आरोप आहे. या संदर्भात मुख्याधिकाऱ्यांवर कारवाई करण्याची मागणी ११ नगरसेवकांनी जिल्हाधिकाऱ्यांकडे केली आहे. सडक-अर्जुनी नगर पंचायतचे मुख्याधिकारी नियमबाह्य कामे करीत असल्याचा आरोप नगरसेवकांकडून होत आहे. करारनामे न करता दोन खासगी विंधन विहीरींवर मोटारपंप बसविले आहे. नगर पंचायतकडे करारनामे नसल्यामुळे ज्या विंधन विहीरीवर मोटारपंप नगरपंचायतच्या माध्यमातून बसविण्यात आले. त्या पाण्याचा पुरवठा नगर पंचायतला करण्यास विंधन विहीर मालकाने बंद केला. योजनाबध्दरित्या पंप आॅपरेटरला १५ दिवसाच्या सुट्टीवर पाठविण्यात आले. यामुळे पाण्यासाठी नागरिकांनी नगरसेवकांच्या नावाने खळे मोडले. नगर पंचायतच्या कामाकरीता एका कर्मचाऱ्याला रात्री १०.३० वाजता महिला नगरसेवकाच्या घरी पाठविले, हे कोणत्याच कायद्यात बसत नसताना हे काम या ठिकाणी होत आहे. तिव्र पाणी टंचाई पाहता सभापती मुख्याधिकाऱ्यांना फोन करून नविन मोटारपंपासंदर्भात विचारणा केली असता मुख्याधिकारी त्यांच्याशी उध्दट शब्दात बोलत नविन मोटारपंप घेऊ नका मी बील काढणार नाही असे मुख्याधिकारी म्हणतात. जूने कामाचे आदेश दिले ते मी रद्द करीत आहे. नगर पंचायतीने जानेवारी २०१६ पासून जे-जे ठराव पारीत केले ते आता जिल्हाधिकारी यांच्याकडे पाठवा अशी विनंती करूनही ते ठराव पाठवत नाही. असे अनेक नियमबाह्य कामे करणाऱ्या मुख्याधिकाऱ्यावर कारवाई करण्याची मागणी राष्ट्रवादीचे गटनेते देवचंद तरोणे, पाणी पुरवठा सभापती ज्योती गिऱ्हेपुंजे, नगरसेवक अभय राऊत, रेहान शेख, भाजपचे गटनेते दिनेश अग्रवाल, नगरसेवक तारा मडावी, जिजा पटोले, प्रियंक उजवने, कविता पात्रे, चंद्रप्रभा मुनिश्वर, स्वीकृत सदस्य मोहनकुमार शर्मा यांनी जिल्हाधिकारी यांच्याकडे केली आहे.