शहरं
Join us  
Trending Stories
1
Manoj Jarange Patil : 'जीव गेला तरीही मागे हटणार नाही, गुलाल उधळूनच परतायचे' मनोज जरांगेंचा सरकारला इशारा
2
राहुल गांधींच्या सुरक्षेत मोठी चूक; तरुण Kiss घेऊन पळाला, व्हिडिओ व्हायरल...
3
"वडिलांच्या नवीन मर्सिडीजवर विपिनची नजर, ६० लाखांची मागणी", निक्कीच्या भावाने मांडली व्यथा
4
बायकोला जिवंत जाळल्याचा आरोप असलेल्या पतीची पहिली प्रतिक्रिया, पत्नीच्या हत्येमागील कारण काय सांगितले?
5
पहिल्यांदाच मिझोरममध्ये पोहोचली रेल्वे; १४२ पूल अन् ४८ बोगद्यांद्वारे तयार झाला मार्ग...
6
निवृत्तीनंतर चेतेश्वर पुजाराला BCCI किती पेन्शन देणार? निवृत्त वेतनासाठी कोणतं सूत्र वापरतात?
7
खुशखबर...! पुढच्याच महिन्यात मारुती नवी धाकड SUV आणणार; क्रेटा, सेल्टोसला थेट टक्कर देणार, किंमतही असणार या सर्वांपेक्षा कमी!
8
ट्रम्प यांच्या इशाऱ्यानंतरही रशियाचे युक्रेनवरील हल्ले सुरूच, दोन गावांवरही कब्जा!
9
नेतन्याहू यांचा 'कंट्रोल गाझा' प्लॅन सुरू! इस्रायली हल्ल्यात ६३ जणांचा मृत्यू; पुढे काय होणार?
10
गर्भवती पत्नीची निर्घृण हत्या, मृतदेहाचे तुकडे करून पतीने लपवले; धक्कादायक घटनेने परिसर हादरला!
11
"रोज म्हणतात व्होट चोरी... व्होट चोरी..., यांचं डोकं चोरी झालंय!" देवेंद्र फडणवीस यांचा विरोधकांवर हल्लाबोल; स्पष्टच बोलले
12
३० वर्षीय पत्नीने प्रियकरासोबत रचला कट, ६० वर्षीय पतीला जंगलात नेऊन आवळला गळा
13
घसा खूपच खवखवतोय अन् खोकलाही जाता जाईना... 'या' ६ गोष्टी आहेत रामबाण उपाय
14
'कर्नाटक-महाराष्ट्रात मतचोरी; बिहारमध्ये होऊ देणार नाही', राहुल गांधींचा निवडणूक आयोगावर निशाणा
15
५,००० रुपयांची SIP तुम्हाला बनवेल लखपती? जाणून घ्या १५ वर्षांत किती परतावा मिळेल
16
"मर्यादेत राहा...!"; आशिया कपमध्ये भारत-पाकिस्तान सामन्यापूर्वी वसीम अक्रमचा इशारा, नेमकं काय म्हणाला?
17
उपराष्ट्रपतीपदाच्या निवडणुकीसाठी ६८ अर्ज; अनेक खासदारांच्या बनावट स्वाक्षरी केल्याचे उघड
18
सोहम बांदेकरसोबत लग्नाच्या चर्चांनंतर अभिनेत्री पूजाने पहिल्यांदाच शेअर केली स्टोरी, म्हणाली...
19
८व्या वेतन आयोगात बँक कर्मचाऱ्यांचे पगारही वाढतील का? कधी होणार लागू? मोठी अपडेट समोर
20
Sara Ali Khan : जबरदस्त ट्रान्सफॉर्मेशन! सारा अली खानने फक्त 'या' २ गोष्टी सोडून कमी केलं ४५ किलो वजन

मग्रारोह योजनेचे लाखो रुपयांचे चुकारे अडले

By admin | Updated: May 29, 2014 02:28 IST

महात्मा गांधी राष्ट्रीय ग्रामीण रोजगार हमी योजनेंतर्गत तालुक्यात वर्षभरापासून झालेल्या अनेक कामांची अद्यापही मजूरी मिळाली नाही.

अर्जुनी/मोरगाव : महात्मा गांधी राष्ट्रीय ग्रामीण रोजगार हमी योजनेंतर्गत तालुक्यात वर्षभरापासून झालेल्या अनेक कामांची अद्यापही मजूरी मिळाली नाही. मजुरी वेळेवर मिळत नसल्यामुळे मजूरवर्गात या कामाविषयी उदासीनता दिसून येते तर अनेक एजन्सींना मजूर मिळेनासे झाले आहेत. जिल्हाधिकारी कार्यालयाने मजुरांना तातडीने मजुरी मिळण्यासंबंधाने कार्यवाही करण्याची मागणी पंचायत समितीचे उपसभापती पोमेश रामटेके यांनी केली आहे.

प्रत्येक हाताला काम व प्रत्येक कामाला हात असे या योजनेचे बिद्र आहे. प्रशासनाच्या गलथान कारभारामुळे या योजनेलाच तडे गेले आहेत. नोंदणी केलेल्या प्रत्येक मजुराला वर्षभरात किमान १00 दिवस काम देण्याची ही योजना आहे. गावागावात कामाचे नियोजन ग्रामसभेत होत असते. या योजनेत मागेल त्याला कामाची हमी शासनातर्फे देण्यात आली आहे. मग्रारोहयो कायद्यांतर्गत १५ दिवसात मजूरांची मजूरी देणे बंधनकारक आहे. मजूरी देण्यास विलंब झाल्यास प्रतिदिवस पाच पैसे दंड आकारण्याची या कायद्यात तरतूद आहे. तालुक्यात अनेक कामांचे वर्षभरापासून मजूरांना चुकारे देण्यात आले नसल्याची तक्रार आहे. तालुक्यातील यंत्रणांही फंड ट्रान्सफर ऑर्डर या प्रणालीद्वारे जिल्हाधिकारी कार्यालयाकडे चुकरे पाठविले आहेत. मात्र अद्यापही मजूरांच्या बँक खात्यात मजूरीचे पैसे जमा झाले नसल्याचे समजते.

२0१३-१४ या आर्थिक वर्षातील ग्रामपंचायत बोंडगावदेवी अंतर्गत रुपचंद परसराम बोरकर यांचे विहिर पाईप लाईन मटेरियल, ग्रामपंचायत गौरनगर येथील २ हजार वृक्षलागवड, ग्रा.पं. कोरंभीटोला येथील वृक्षालागवड भाग -३, ग्रा.पं. पिंपळगाव, सावरटोला, सिलेझरी येथील वृक्षलागवड, ग्रा.पं. विहिरगाव अंतर्गत येरंडीदेवी गट वृक्षलागवड, ग्रा.पं. येगाव येथील सुखदेव रामटेके यांची विहिर, ग्रा.पं. बोंडगाव/सूरबन येथील वृक्षलागवड २0१२-१३ , वृक्षलागवड अर्जुनी/मोर. निताराम दांडेकर बिडटोला यांची विहिर, खांबी वृक्षलागवड, ग्रा.पं. महालगाव वृक्षलागवड, मालकनपूर कक्ष क्र. २५६ मधील मिश्र रोपवन व पवनी येथील वृक्षलागवड संगोपन येथील चुकारे अडले आहेत.

तिडका/करडगाव येथील २ लाख ८0 हजार ७७२ रुपये सिमेंट रस्ता, बोंडगाव/सुरबन येथील विजय दिवटे यांची ७२ हजार ९७१ रुपयांची सिंचन विहिर, बोरटोला येथील रेवालाल चिंधू यांची ३३ हजार १२५ रुपयांची सिंचन विहिर, कोहलगाव येथील २३ हजार ७६९ रुपयांचे मुरुम खोदकाम, बाराभाटी येथील शकुंतला चुटे यांची ८९ हजार १४३ रुपयांची सिंचन विहिर, सिरोली येथील देवेंद्रा मस्के यांची १४ हजार ८00 रुपयांची सिंचन विहिर व खांबी येथील पाईपलाईनचे ५३ हजार ८१ रुपयांची आज (दि.२८) फंड ट्रान्सफर ऑर्डर जिल्हाधिकारी कार्यालय रोहयो विभागाकडे पाठविण्यात आली.

बोदरा/देऊळगाव, देवलगाव, जानवा, सिरेगाव व नवेगावबांध या ग्रामपंचायतचे रोहयो खाते अजूनपर्यंत जिल्हाधिकारी कार्यालयीन दस्तावेजात नमूद नाहीत. त्यामुळे या ग्रा.पं.चे १५ ऑक्टोबर २0१३ पासून देयके अडली आहेत. विदर्भ क्षेत्रीय ग्रामीण बँक शाखा बोंडगावदेवी येथील रोहयो खाते जिल्हाधिकारी कार्यालयाच्या यादीत समाविष्ट नसल्यामुळे या बँकेत खाते असलेल्या मजूरांना मजुरी मिळू शकली नाही.

रोहयो हा विभाग उपजिल्हाधिकारी हंबादे यांच्याकडे आहे. येथे आंबेडारे, उराडे व शहारे हे कंत्राटी कर्मचारी आहेत. या संदर्भात चौकशी केली असता ते उडवाउडवीची उत्तरे देतात. या विभागावर कुणाचेही नियंत्रण नसल्याने मात्र त्रेधातिरपट उडते. मग्रारोहयोच्या कामावर गेलेल्या मजूरांचे को-ऑपरेटिव्ह व ग्रामीण बँकेत खाते आहेत. ज्या मजुरांचे जेव्हापासून ऑनलाईन खाते करण्यात आले तेव्हापासूनच मजूरी मिळाली नसल्याची ओरड आहे. (तालुका प्रतिनिधी)