शहरं
Join us  
Trending Stories
1
मोठी बातमी! इराण युद्धामुळे भारतीय अर्थव्यवस्थेसमोर निर्माण झाली ५ मोठी संकटे; आरबीआय गव्हर्नर संजय मल्होत्रांचा महागाईचा इशारा
2
इराणच्या 'पीस प्लॅन'मध्ये मोठा घोळ! फारसी आणि इंग्रजी मसुद्यात आढळला फरक; युरेनियमच्या अटीवरून संभ्रम वाढला
3
इराणमधील युद्धविरामावर भारताची पहिली प्रतिक्रिया आली समोर, निर्णयाचं स्वागत करत व्यक्त केली अशी अपेक्षा 
4
'चमका हिंदुस्तान हमारा!'; अणुऊर्जा क्षेत्रात भारताचा 'करिश्मा'! रशियानंतर भारत दुसरा देश ठरला! ४०० वर्षांपर्यंत टेन्शन संपणार!
5
सस्पेन्स कायम! भारतीयांनो, इराण तात्काळ सोडा; युद्धविरामानंतर काही तासांत भारताने जारी केली सूचना
6
अमेरिका-इराणमध्ये युद्धविरामाची घोषणा; जगभरातील देशांनी काय म्हटले? पाकिस्तानच्या भूमिकेची चर्चा
7
स्मरण दिन २०२६: ७ दिवस ३ उपाय, ‘ही’ सेवा सुरक्षा कवच ठरेल; स्वामी कृपेचा अद्भूत अनुभव येईल!
8
आयसीएल फिनकॉर्पचा नवीन एनसीडी इश्यू १० एप्रिल रोजी खुला होणार; १२.२५% पर्यंत परताव्याचा दावा
9
पाकिस्तानच्या मध्यस्थीचे 'डर्टी सीक्रेट'! १००० खोल्यांचा सौदा केला, आसिम मुनीर यांनी ट्रम्प यांना दिली ८,३०० कोटींची ऑफर
10
Ashok Kharat : अशोक खरातला न्यायालयीन कोठडी; उद्या पुन्हा नव्या गुन्ह्यात कोर्टात सादर करण्याचे आदेश
11
School bus Accident: काळजाचा ठोका चुकवणारा अपघात; ३५ विद्यार्थ्यांसह शालेय बस खड्ड्यात उलटली!
12
७ मिनिटांच्या बैठकीत निवडणूक आयुक्त म्हणाले, Get Lost...; डेरेक ओ ब्रायन यांचा गंभीर आरोप
13
नवऱ्याचे ९ महिलांसोबत संबंध, १४ वर्षांचा संसार मोडला; प्रसिद्ध अभिनेत्रीचा खुलासा, एकटीने करतेय मुलाचा सांभाळ
14
आसाराम बापूच्या मुलाचा घटस्फोट, पत्नीला द्यावी लागणार कोट्यवधी रुपयांची पोटगी, कोर्टाचे आदेश
15
Video : बॉयफ्रेंडला चीटिंग करताना रंगेहाथ पकडलं; भररस्त्यात गर्लफ्रेंडने धू-धू धुतलं, पण नंतर जे झालं…
16
इस्रायल तयार नव्हता...! ट्रम्प यांनी इराणला लुळा-पांगळा करण्याचा प्लॅन सांगितला; नेतान्याहू झटकन तयार झाले...
17
थायलंडच्या महाराजांना भेटायला गेले भारतीय राजदूत; समोर अधिकारी गुडघ्यावर बसले, कारण काय?
18
"बाबा, मला पोलीस नाही व्हायचं!" वडिलांचं स्वप्न बाजूला सारलं; आता स्विंगच्या जोरावर गाजवतोय आयपीएल
19
युद्धविराम १४ दिवसांचाच...! नंतर पुन्हा युद्ध सुरु होणार? ट्रम्प यांचा इशारा आणि नेतन्याहूंच्या अटी 
20
“PM मोदींचे अपयश, ट्रम्प यांनी इराण शस्त्रसंधीचे श्रेय चीन-पाकला दिले”; संजय राऊतांची टीका
Daily Top 2Weekly Top 5

डिझेलच्या नावावर लाखो रुपये गडप केले

By admin | Updated: July 4, 2015 02:15 IST

भंडारा अर्बन बँकेच्या येथील शाखा कार्यालयात विजेची सोय असताना विद्यमान संचालक गोपीचंद थावानी यांनी

गोंदिया : भंडारा अर्बन बँकेच्या येथील शाखा कार्यालयात विजेची सोय असताना विद्यमान संचालक गोपीचंद थावानी यांनी जनरेटरमध्ये डिझेल लागल्याचे भासवून लाखो रुपयांचा घोटाळा केला आहे. कार्यालयात महिनाभर वीज नसली तरीही १२ हजार रूपयांपेक्षा जास्तीचे डिझेल लागणार नाही. मात्र थावानी यांनी यांनी १ एप्रिल २०१० ते ३१ मार्च २०११ या काळात २ लाख ९५ हजार १३८ रुपयांचे डिझेल घेतल्याचे लेजर मध्ये नोंदविले असून त्यांनी लाखो रुपयांचा घोटाळा केल्याचा आरोप आनंद कृपाण यांनी केला आहे. दि भंडारा अर्बन को आॅप. बँकेचे येथील शाखा कार्यालय भाड्याच्या इमारतीत असून तेथे विजेची सोय आहे. वीज पुरवठा खंडीत झाल्यास बँकेचे काम सुरळीत चालावे यासाठी बँकेने स्वत:चे जनरेटर विकत घेतले आहे. १ एप्रिल २०१० ते ३१ मार्च २०११ व त्यानंतर सुटीचे दिवस वगळता प्रत्येक दिवशी डिझेल विकत घेतल्याचे बिल जोडण्यात आले आहे. विशेष म्हणजे एकाच दिवशी तीन-तीन वेळा डिझेल घेतल्याचे लेझर बुकवर नोंद आहे. वीज पुरवठा सुरळीत असताना एकाच दिवशी १२०० ते १३०० रुपयाचे बिल कसे जोडण्यात आले आहे. यावरून महिन्याकाठी ३० हजार रुपयांचे डिझेल खरेदी केल्याचे दाखवून खोटी बिले सादर करण्यात आली. यात लाखो रूपयांचा घोटाळा करण्यात आला असल्याचे कृपाण म्हणाले. यासाठी १५ वर्षापासून बँकेचे संचालक म्हणून काम करणारे थावानी यांनी जनतेचे पैसे घोटाळा करुन स्वत:च्या खिशात टाकले आहे. डिझेलवर एवढा खर्च झाला तर वीज बिल आलेच नाही का? असा प्रश्न उपस्थित करीत चौकशीची मागणी त्यांनी केली. मानेवाडा (नागपूर), धरमपेठ, वडसा व ब्रह्मपुरी येथे बँके च्या नवीन शाखा निर्माण करून अर्बन बँकेला ९१.१३ लाखांचा तोटा बसविला आहे. यातही सत्तारुढ संचालकांनी स्वार्थापोटी नव्याने सुरू करण्यात आलेल्या शाखांसाठी विविध प्रकारचे साहित्य खरेदी केले आहे. तसेच सन २००९ मध्ये बँकेच्या ठेवी २९८.०३ कोटी होत्या. त्यात आता बँकेच्या चार शाखांची वाढ झाली असून सुद्धा ठेवीत मात्र घट झालेली असल्याचेही कृपाण यांनी सांगीतले. यावरून संचालकांवर ग्राहक ठेवीदाराचा किती विश्वास आहे, हे दिसून येत असल्याचेही कृपाण यावेळी म्हणाले. तर सन २०१५ मध्ये विकासनाम्यात दाखविण्यात आलेला ३.४३ कोटींचा नफा चुकीचा आहे. हा नफा वैधानिक तरतुद न करता दाखविण्यात आला आहे. सन २००९ मध्ये सर्व वैधानिक तरतुदी केल्यानंतरचा निव्वळ नफा १.९३ कोटी इतका होता. मात्र विकासनाम्यात विद्यमान संचालकांनी दाखविलेला नफा वैधानिक तरतुदी न करता दाखविला होता. सन २०१४-१५ मध्ये बँकेला १.८५ कोटींचा शुध्द तोटा झाला असून याला विद्यमान संचालक मंडळ जबाबदार आहे. विशेष म्हणजे नोकर भरतीत भंडारा व गोंदिया येथील लोकांची निवड यवतमाळ येथील लोकांना भरण्यात आले आहे. त्यामुळे जिल्ह्यातील उम्मेदवारांवर संचालकांनी अन्याय केला असल्याचा आरोपही कृपाण यांनी केला. (तालुका प्रतिनिधी)