शहरं
Join us  
Trending Stories
1
दोन दिवसात भारताच्या किती जहाजांनी पार केली होर्मुझची सामुद्रधुनी; केंद्र सरकारने सांगितली सद्यस्थिती
2
सांगली जिल्ह्यात दोन खासदार, नऊ आमदार होतील; चंद्रकांत पाटील यांचे सूचक वक्तव्य 
3
अशोक खरातसोबत नेत्यांचे संबंध; शरद पवार म्हणाले, 'आमच्यातील लोकप्रतिनिधी जाऊन जे काही...'
4
Thane Crime: खासगी बोलण्याचा बहाणा, हॉटेलमध्ये नेले आणि नर्सवर दोन वेळा बलात्कार
5
IPL 2026 : शाहरुख खानची खास झलक! सुहानाचा स्टायलिश लूकही ठरला लक्षवेधी; इथं पाहा व्हिडिओ
6
बंदूक नव्हे आता अक्कल पाजळणार! भारताविरोधात असीम मुनीरचा कांड; पाकिस्तानचा नवा कुरापती प्लॅन
7
Latest Marathi News LIVE Updates:इराणच्या हल्ल्यात चार इस्रायली नागरिकांचा मृत्यू, इमारतीच्या ढिगाऱ्याखाली मिळाले मृतेदह
8
IPL 2026, MI vs RR : हार्दिक पांड्या खेळणार का? MI कोच म्हणाले, तो काही दुखापतग्रस्त नव्हता, तर...
9
सुनेत्रा पवारांना पाठिंबा दिला, पण प्रचार करणार की नाही, शरद पवारांनी मांडली भूमिका; काँग्रेसबद्दल काय बोलले?
10
‘त्या’ घटनेतील तिसरी हत्या पोलिस व सुरक्षारक्षकांच्या डोळ्यासमोर; व्हिडिओ व्हायरल
11
तृणमूल काँग्रेस की भाजप? यंदा मतदारांचा कौल कुणाला? धक्कादायक ओपिनियन पोल समोर...
12
टॉर्चर करून करून पिता-पुत्राला मारलेले! तामिळनाडूच्या गाजलेल्या 'कस्टोडियल डेथ' प्रकरणात ९ पोलिसांना मृत्यूदंडाची शिक्षा
13
एकेकाळी १४०० एकर जमिनीचे मालक, आता मोहफुले वेचून जगण्याची वेळ; गोंड राजाच्या वंशजांची बिकट परिस्थिती
14
KKR च्या ताफ्यातून एकाच वेळी दोन्ही मिस्ट्री स्पिनर 'गायब'! अजिंक्य रहाणेनं सांगितलं त्यामागचं कारण
15
"शस्त्रसंधी करणे म्हणजे शत्रूंना आणखी गुन्हे करण्यासाठी...", इराणने ट्रम्प यांचा प्रस्ताव धुडकावला
16
Ekana Stadium: एकाना स्टेडियममध्ये पाण्याची एक बॉटल किती रुपयांना मिळते? किंमत ऐकून चक्रावून जाल!
17
बायको अधिकारी बनली अन् पतीला विसरली; अडीच वर्षांनी वाद मिटला, ज्योती-आलोक पुन्हा झाले एकत्र
18
नात्यांचा मोठा पेच! २५ वर्षांनंतर पती पुन्हा प्रकटला, पत्नीचे दीरासोबत लग्न लावले गेले; तिने आता काय करायचे?
19
मायलेज, पॉवर अन् फीचर्सनी सुसज्ज..; फक्त 6 लाखांत घरी घेऊन या लग्झरी सेडान कार
20
ना होर्मुझ खुला करणार, ना ४५ दिवसांचा युद्धविराम होणार! इराणनं प्रस्ताव धुडकावला; आता अमेरिका काय करणार?
Daily Top 2Weekly Top 5

कोंबडा बाजारात लाखोंचा जुगार

By admin | Updated: September 17, 2016 02:12 IST

देवरी पोलीस ठाण्यांतर्गत येणाऱ्या कन्हारपायली व पातरगोस्वाच्या मध्ये २६ आॅगस्टपासून कोंबडा बाजार व जुगार सुरू आहे.

गावकऱ्यांची ओरड : पोलीस प्रशासन सुस्तशेंडा (कोयलारी) : देवरी पोलीस ठाण्यांतर्गत येणाऱ्या कन्हारपायली व पातरगोस्वाच्या मध्ये २६ आॅगस्टपासून कोंबडा बाजार व जुगार सुरू आहे. तरीही पोलीस प्रशासन कोणत्याच प्रकारची दखल घेत नसल्याची तक्रार गावकऱ्यांनी केली आहे.कोंबड्याची झूंज लावणे व त्यावर शर्यत लावून जुगार खेळणे कायद्याने गुन्हा आहे. जवळच असलेल्या कन्हारपायली व पातरगोट्याच्या मधात हा गोरखधंदा २६ आॅगस्टपासून सुरू असून आठवड्यातून रविवार व बुधवारलाच भरविला जातो. मात्र अद्यापही पोलिसांकडून या अवैध धंद्यावर कोणत्याच प्रकारची कारवाई करण्यात आली नाही, हे विशेष.प्राप्त माहितीनुसार, सडक अर्जुनी येथील एक व्यक्ती हा कोंबडा बाजार भरवतो. यामधून त्याला दिवसाकाठी १५ ते २० हजार रुपये कमिशन पोटी मिळत असल्याचा अंदाज आहे. या कोंबडा बाजारात भाग घेण्यासाठी गोंदिया, तुमसर, भंडारा व छत्तीसगड यासारख्या भागातून लोक दुचाकी व चारचाकी वाहनांनी येतात. ज्या ठिकाणी कोंबड्यांची झूंज लागते. त्यांच्या शेजारीच जुगार खेळणाऱ्यांचा जत्था असतो. त्यामध्ये लाखोची उलाढाल होत असते. हा कोंबडा बाजार बघण्यासाठी जवळपासच्या लोकांची गर्दी जमली असते. त्यामधील काही युवकांची मनस्थिती विचलित होवून तेसुद्धा या गोरखधंद्याला बळी पडले आहेत.सदर बाजारात कोंबड्याच्या एका पायाला तिक्ष्ण अवजार बंधून पैज लढविली जाते. त्यामुळे जीवित हानी होवू शकते, हे विसरुन चालणार नाही. त्याचप्रमाणे खेड्यापाड्यातील युवक व विद्यार्थी या वाम मार्गाकडे वळण्याची दाट शक्यता आहे. कोंबडा बाजार कायमचा बंद व्हावा, यासाठी तंटामुक्त गाव समितीकडे तक्रारही करण्यात आली. मात्र त्याकडे कानाडोळा करण्यात आला. त्याचप्रमाणे स्थानिक पोलीस पाटलांना माहिती असूनही ते पोलिसांपासून का दडवतात? हे न उलगडणारे कोडे आहे. पोलीस प्रशासनाने या गंभीर बाबीकडे जातीने लक्ष पुरवून तात्काळ कोंबडा बाजार व जुगार अड्डा बंद करावा, अशी मागणी सुरजलाल उईके, मंगेश लोणारे व नागरिकांनी केली आहे. (वार्ताहर)