शहरं
Join us  
Trending Stories
1
“इराणच्या १० कलमी प्रस्तावाला ट्रम्प यांनी दाखवली केराची टोपली”; व्हाइट हाऊसने सगळे सांगितले
2
Gold Silver Price Today: बाजार उघडताच सोन्या-चांदीच्या दरात मोठी घसरण; Silver ₹४,७०० नं स्वस्त, Gold चे दर काय?
3
केजचे तहसीलदार राकेश गिड्डे यांचा अपघाती अंत; कार्यक्षम अधिकाऱ्याच्या मृत्यूने बीड जिल्हा सुन्न!
4
३९ दिवसांच्या युद्धानंतर इराण, अमेरिका, इस्रायल... कुणी काय कमावले, काय गमावले?
5
STतील सफाईचा प्रवाशांना भूर्दंड; आधी दरवाढ केली, आता ‘स्वच्छता अधिभार’ लावला, प्रवास महागला
6
Post Office च्या 'या' स्कीममध्ये व्याजाद्वारेच मिळतील ४.४० लाख; ३०० रुपयांच्या बचतीतून तयार होईल १५ लाखांचा फंड
7
Share Market: शेअर बाजारात घसरण: सेन्सेक्स ५०० हून अधिक अंकांनी घसरला, निफ्टी २३,९०० च्या खाली
8
नाशिकमध्ये नामांकित कंपनीतील ८ जणींचा विनयभंग; एकीवर 'अतिप्रसंग'; ६ जणांना अटक
9
एक डॉलर प्रति बॅरल, त्यासोबत..., होर्मुझवरील टोलसाठी इराणने तयार केला असा नियम   
10
आजचे राशीभविष्य, ०९ एप्रिल २०२६: योग्य क्षेत्रातील गुंतवणूक आज लाभदायक; रागावर नियंत्रण ठेवावं लागेल
11
पाकला बळीचा बकरा बनवले, इराणला राजी करायला भाग पाडले, ट्रम्प यांनाच हवा होता युद्धविराम?
12
NATO देशांना ट्रम्प यांनी सुनावले, मदत न केल्याने व्यक्त केली तीव्र खंत; इशारा देत म्हणाले...
13
राज्य निर्मितीआधीपासूनच मराठा आरक्षण; उच्च न्यायालयात राज्य सरकारचा युक्तिवाद
14
१० मिनिटं, १०० ठिकाणं अन् १६० बॉम्ब; लेबनॉनवर इस्रायलचा सर्वात मोठा हल्ला; बेरूतमध्ये रक्ताचा सडा
15
शस्त्रसंधीमुळे अदानी-अंबानींवर डॉलर्सचा पाऊस; जगातील श्रीमंतांच्या यादीत स्थान वधारले
16
युद्ध की शांतता? अमेरिकेला काहीतरी एक निवडावं लागेल, इराणचा थेट इशारा; लेबनॉनवरून पेच वाढला!
17
अजूनही ५०% जुन्या वाहनांना HSRP नंबर प्लेट नाही; कालमर्यादेबाबत स्पष्टता नसल्याने अनेकांची पाठ
18
एलिफंटा उत्खननात दोन विशाल साठवण भांड्यांचा शोध; ऐतिहासिक महत्त्वात भर
19
शिखर बँक घोटाळा: रोहित पवारांच्या अर्जावर गुणवत्तेनुसार निर्णय घ्या! EDची विशेष न्यायालयाला विनंती
20
१२,३०० हल्ल्यांनंतरही इराणची ताकद कायम कशी? 'ही' आहेत यामागची कारणं
Daily Top 2Weekly Top 5

जेएसव्हीने घातला कोट्यवधीने गंडा

By admin | Updated: March 11, 2017 00:13 IST

येथे जेएसव्ही नावाने कंपनी स्थापन करुन आरडी, एफडीच्या नावावर लोकांकडून पैसे वसूल करणाऱ्या संचालक मंडळाने

सात जणांवर गुन्हा : २०१० पासून पैसे वसुली गोंदिया : येथे जेएसव्ही नावाने कंपनी स्थापन करुन आरडी, एफडीच्या नावावर लोकांकडून पैसे वसूल करणाऱ्या संचालक मंडळाने कोट्यवधी रुपयांनी अनेक लोकांना गंडा घालून त्यांची फसवणूक केली आहे. परंतु या संदर्भात प्रथमदर्शनी प्राप्त तक्रारीत ४० लाखाने फसवणूक झाल्याचे पुढे आले आहे. अजून अनेक लोकांच्या तक्रारी येण्याची शक्यता वर्तविली जात आहे. गंगाझरी येथील प्रकाश पतीराम उईकर (६५) यांनी दिलेल्या तक्रारीनुसार, जेएसव्ही इंडिया लिमीटेड कंपनीने रेलटोली येथे इको बँकेच्या वर २०१० पासून आपली शाखा उघडली. रिझर्व बँकेकडून कोणत्याच प्रकारची नोंदणी अथवा परवानगी न घेता त्यांनी लोकांकडून पैसे घेण्याचा सपाटा सुरु केला. आरडी व एफडीच्या नावावर सहयोगी एजंटांमार्फत उईकर यांच्याकडून ४० लाख रुपये त्यांनी घेतले. अशाच पद्धतीने अनेक लोकांचे पैसे या कंपनीने गडप केले. लोकांची मॅच्युरीटी आल्यावरही त्यांना मॅच्युरीटी देण्यात येत नसल्याने अनेक पोलिसात धाव घेण्याची तयार केली. यासंदर्भात गोंदिया शहर पोलिसात ९ मार्च रोजी दुपारी गुन्हा दाखल करण्यात आला. यात जेएसव्ही डेव्हलपर इंडिया लिमीटेडचे व्यवस्थापकीय संचालक जगमोहन पटये रा.कांचननगर खजुरी, भोपाळ, जय विनायक, फिल्ड कॉर्पोरेशन लिमिटेड, साई मंदिर समोर वर्धा रोड नागपूर, विजयालक्ष्मी कठये, पुलभासिंग राणा (६७) भोपाळ, संचालक भुपेंद्रसिंग कठये रा. खजुरी भोपाळ, दिनेश हेमराज टेंभरे रा.लांजी रोड आमगाव, संध्या ईश्वर आंबेडारे, लोकवानी चौक देशबंधू वार्ड भंडारा या सात जणांवर गुन्हे दाखल केले.