शहरं
Join us  
Trending Stories
1
MPSC निकालात सोलापूरचा डंका! विजय लामकाने राज्यात प्रथम तर, आरती जाधव महिलांमध्ये अव्वल
2
"...तर भारत वर्षाला ३०० प्लुटोनियम अणुबॉम्ब बनवेल!"; कलपक्कमच्या यशानं पाकिस्तानच्या पोटात गोळा, फक्त भीतीनंच हादरला
3
"जे काम भारताने करायला हवे होते, ते दहशतवाद पसरवणाऱ्या देशाने केले..."; मोदी सरकारवर ओवेसींचा निशाणा
4
अमेरिकेवर विश्वास नाही, रशिया-चीनने सुरक्षेची हमी द्यावी; इराणची मोठी मागणी...
5
अमेरिका-इराण युद्धात सहभागी न होताच एका मुस्लीम देशाचा झाला तगडा फायदा; कमावणार पैसाच पैसा
6
"डोनाल्ड ट्रम्प असे व्यक्ती नाहीत ज्यांच्याशी...!"; शस्त्रसंधीनंतर काही तासांतच अमेरिकेचा इराणला इशारा, तणाव कायम
7
"अशोक खरातसोबत असलेली कोणती महिला बेशुद्ध वाटते?", शर्मिला ठाकरे संतापल्या, महिलांना सुनावले
8
Jasprit Bumrah Unwanted Records : बुमराहच्या नावे लाजिरवाणी 'हॅटट्रिक'! ८ वर्षांनी आली 'ही' वेळ
9
अमेरिका, इस्रायलचे हल्ले सुरु झाले, इराणमध्ये ३००० भारतीय विद्यार्थी होते...; भारतातील राजदुतांनी पै-पाहुण्यांना, ओळखीच्यांना फोन करायला सुरुवात केली...
10
अमेरिका-इराण युद्धविरामानंतर केंद्र सरकारचा मोठा निर्णय; LPG पुरवठ्याबाबत नवा फॉर्म्युला तयार
11
ही कसली सीझफायर? लावन रिफायनरीनंतर सिर्री बेटही स्फोटांनी हादरले; तेलाच्या साठ्यांवर हल्ले?
12
आगीतून फुफाट्यात! बाईक चोरली अन् ट्रॅफिक नियमही मोडला; चोराचा फोटो पोहोचला मालकाच्या मोबाईलवर
13
Tech Tips: कोणालाही न कळता कॉल रेकॉर्डिंग कसे करावे? ९९% लोकांना माहित नाही ही सोपी ट्रिक!
14
इराणसोबत युद्धविराम करून ट्रम्प यांनी युद्धातून अंग काढले; आता इस्रायलला चुकवावी लागणार किंमत
15
Health Tips: लघवीला दुर्गंधी म्हणजे केवळ उष्णता नव्हे, तुमच्या शरीराने दिलेला 'हा' गंभीर इशारा असू शकतो!
16
इराणसोबत धोका? सीझफायरनंतर काही तासांतच लावन बेटावरील तेल रिफायनरीमध्ये भीषण स्फोट, जगाचे कान टवकारले...
17
'स्ट्रेट ऑफ होर्मुझ'मध्ये ट्रॅफिकजाम; युद्धविरामानंतरही १०००+ जहाजे अडकून पडली...
18
इराण-अमेरिका युद्धबंदीने जग सुखावलं, पण 'हा' देश भडकला! पाकिस्तानच्या 'त्या' खेळीमुळे मित्रराष्ट्र नाराज
19
Summer Special: सुकी भेळ करायची तर 'हा' सिक्रेट' मसाला हवाच, वाढवतो सुक्या भेळेची लज्जत
20
मोठी बातमी! इराण युद्धामुळे भारतीय अर्थव्यवस्थेसमोर निर्माण झाली ५ मोठी संकटे; आरबीआय गव्हर्नर संजय मल्होत्रांचा महागाईचा इशारा
Daily Top 2Weekly Top 5

मोटारपंप खरेदीत लाखोंचा भ्रष्टाचार

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: May 11, 2017 00:12 IST

जिल्हा परिषदेच्या यांत्रीकी विभागातील मानकर यांनी ओटा बांधकाम व बोरवेल खोदकाम लघुनळ पाणी पुरवठाव विद्युत मोटार पंप

पटोले यांची आयुक्तांकडे तक्रार: उपविभागीय अभियंता (यांत्रिकी) मानकर करतात नियमबाह्य कामे लोकमत न्यूज नेटवर्क गोंदिया : जिल्हा परिषदेच्या यांत्रीकी विभागातील मानकर यांनी ओटा बांधकाम व बोरवेल खोदकाम लघुनळ पाणी पुरवठाव विद्युत मोटार पंप दुरुस्ती व खरेदी मध्ये लाखो रुपयाचे भ्रष्टाचार केलेला आहे. गाव टंचाई योजनेमध्ये मनमर्जीप्रमाणे कामे वाटप करुन बोगस देयक तयार करुन बिल काढले आहे. मानकर नियमबाह्य काम करीत असल्यामुळे खा. नाना पटोले यांनी विभागीय आयुक्तांकडे तक्रार केली आहे. ओटा बांधकाम व बोरवेल खोदकाम लघुनळ पाणी पुरवठा व विद्युत मोटार पंप दुरुस्ती व खरेदीमध्ये लाखो रुपयाचे भ्रष्टाचार केला आहे. सन २०१५-१६, २०१६-१७ मध्ये नवीन हातपंप व दुरुस्ती योजना, देखभाल दुरुस्ती, टीएसपी, आमदार, खासदार व राज्यसभा सदस्य यांनी सुचविलेल्या गाव टंचाई योजनेमध्ये फार मोठ्या प्रमाणावर कामे न करता आपल्या जवळच्या लोकांना मनमर्जीप्रमाणे कामे वाटप करुन बोगस देयक तयार करुन बिल काढत असल्याचा आरोप मानकर यांच्यावर करण्यात आला आहे. ई-निविदा मध्ये वित्त अधिकारी व मुख्य कार्यकारी अधिकारी यांची दिशाभूल करुन सर्वात कमी दरपत्रक असलेल्यांना काम न देता आपल्या मर्जीतील लोकांना काम दिले आहे. सर्व कंत्राटदाराला समान कामे न देता आपल्या मर्जीतील लोकांना कमो देवून शासन नियमाचे उल्लघंन व शासन रक्कमेची अफरातफर केली आहे. जि.प. मध्ये माझे कुणीही काही बिघडवू शकत नाही अशा प्रकारची भाषेचा वापर करीत असतात. या प्रकरणी स्वतंत्र चौकशी करुन कारवाई करण्याचे पत्र खा. पटोले यांनी विभागीय आयुक्तांना दिले आहे.