शहरं
Join us  
Trending Stories
1
अमेरिका-इराणमध्ये २ आठवड्यांसाठी युद्धबंदी; डोनाल्ड ट्रम्प यांच्याकडून हल्ले थांबवण्याची घोषणा
2
होर्मुझ खुली करण्याची शेवटची आशा संपली! UNSC मध्ये झाले मतदान, पण चीन-रशियाचे 'व्हिटो'अस्त्र
3
राजस्थानचा 'रॉयल' विजय! यशस्वी, वैभवने गोलंदाजांना धुतले, मुंबई इंडियन्सचा २७ धावांनी पराभव
4
नीलम शिंदेची झुंज संपली, तो कॉल ठरला काळीज चिरून टाकणारा; वडिलांना व्हिडीओ कॉलद्वारे घ्यावे लागणार अंतिम दर्शन
5
कडक! बुमराहचं वैभव सूर्यवंशीने असं केलं स्वागत! पहिल्याच ओव्हरमध्ये ठोकले दोन गगनचुंबी षटकार; पहा व्हिडिओ
6
"पुढील ४८ तास जिथे आहात, तिथेच रहा", ट्रम्प यांच्या धमकीनंतर इराणमधील भारतीयांना केंद्राकडून अलर्ट
7
अशोक खरातच्या अश्लील व्हिडीओंची १५ ते २० रुपयांना विक्री, गुन्हा दाखल, त्या व्यक्तीला लवकरच करणार अटक
8
"आज रात्री एका संस्कृतीचा अंत होईल..."; डोनाल्ड ट्रम्प यांची इराणला सर्वात मोठी धमकी
9
धडधड वाढली! इराणने 'या' शहरातील सर्व रेल्वे सेवा केल्या रद्द; इस्रायल-अमेरिकेचे हल्ले, तीन उड्डाण पूल उद्ध्वस्त
10
अवघ्या जगाला इंधनाची कमतरता, पण चीनला नाही जाणवली? २० वर्षांपूर्वीच केली होती तयारी
11
Viral Video: नदीच्या काठावर नवऱ्यासोबत मद्यपान, लोकांनी हटकताच म्हणाली,"आमच्यामुळेच तुमची घरं चालतात!"
12
NCL: एनसीएलमध्ये नोकरीची संधी, ५७७ जागांसाठी जाहिरात प्रसिद्ध; ९ एप्रिलपासून नोंदणी सुरू
13
८वा वेतन आयोग: १३ एप्रिल रोजी महत्वाची बैठक; वेतनवाढीचा अंतिम निर्णय होणार?
14
"दैवीशक्ती असल्याचं भासवत लैंगिक शोषण, ३० पीडिता समोर आल्या..."; खरात प्रकरणात मोठे खुलासे
15
इराण 'हॉर्मुझ' करारासाठी तयार; अमेरिकेला पाठवला शांतता प्रस्ताव, पण केली मोठी मागणी....
16
"पार्थ पवारांचं विधान काँग्रेसला फारच झोंबलं", अमोल मिटकरींनी १६ आमदारांची पार्टी म्हणत डिवचले
17
इस्रायलचा इराणवर मोठा हवाई हल्ला! १८ जणांचा मृत्यू, 24 गंभीर; दिग्गज लष्करी अधिकारी ठार? तेहरानसह शस्त्रास्त्र डेपो उद्ध्वस्त
18
IPL 2026 : अर्जुन तेंडुलकरचा यॉर्कर शो! पंतसमोर अचूक गोलंदाजी; LSG नं दिली पदार्पणाची हिंट (VIDEO)
19
Latest Marathi News LIVE Updates: 'इराणसाठी आजची रात्र अखेरची', अमेरिकेचे अध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांच्या पोस्टने जग हादरले
20
बंगाल निवडणुकीसाठी कडेकोट सुरक्षा; २.४ लाख जवानांसह २० हजार महिला कमांडो तैनात
Daily Top 2Weekly Top 5

मायलेकाचा खड्ड्यांतील पाण्यात बुडून मृत्यू ()

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: August 15, 2021 04:30 IST

गोंदिया-परसवाडा : मुलगा खड्ड्यांत पडल्याने त्याला वाचविण्यासाठी गेलेल्या आईचाही खड्ड्यांत बुडून मृत्यू झाला. तिरोडा पोलीस ठाण्यांतर्गत ग्राम मलपुरी ते ...

गोंदिया-परसवाडा : मुलगा खड्ड्यांत पडल्याने त्याला वाचविण्यासाठी गेलेल्या आईचाही खड्ड्यांत बुडून मृत्यू झाला. तिरोडा पोलीस ठाण्यांतर्गत ग्राम मलपुरी ते मेंढा रस्त्याच्या बाजूला शनिवारी (दि. १४) दुपारी १.३० च्या दरम्यान ही घटना घडली. चिराग ललित ठाकूर (६) व पंचकुला ललित ठाकूर (३०, रा. मलपुरी) असे मृत मायलेकाचे नाव आहे.

ग्रामीण भागात सध्या रोवणीची कामे सुरू असून शनिवारी पंचकुला ठाकूर या थोरला मुलगा चिराग व धाकटा मुलगा सिराज ललित ठाकूर (६) यांना घेऊन शेतात गेल्या होत्या. त्या रोवणी करीत असताना चिराग व सिराज शेतात खेळत होते. खेळता-खेळता ते शेतातील खड्ड्याजवळ गेले व पाय घसरून चिराग त्यात पडला. ही बाब सिराजने आई पंचकुला यांना जाऊन सांगितली असता त्या त्याला वाचविण्यासाठी खड्ड्यात उतरल्या. मात्र, खड्डा खोल होता व पाणी भरून असल्याने दोघांचाही पाण्यात बुडून मृत्यू झाला. दोघांचे मृतदेह गावकऱ्यांनी खड्ड्यांतून बाहेर काढले व तिरोडा उपजिल्हा रुग्णालयात उत्तरीय तपासणीसाठी पाठविले. घटनेची माहिती मिळताच क्षेत्राचे आमदार विजय रहांगडाले, आमदार अभिजित वंजारी, माजी आमदार दिलीप बंसोड, गप्पू गुप्ता यांनी गावात भेट देऊन घटनेची माहिती घेतली. या घटनेची नोंद तिरोडा पोलिसांनी घेतली आहे.