शहरं
Join us  
Trending Stories
1
भाजपामध्ये जाणार का? एकनाथ खडसे म्हणाले, “मी आजही RSSचा स्वयंसेवक आहे, गिरीश महाजन...”
2
ENG vs IND : आता अनुभवी KL राहुलसह कॅप्टन शुबमन गिलवर मोठी जबाबदारी
3
अमेरिकेच्या हल्ल्याला इराण कसे देणार प्रत्युत्तर? आताच्या घडीला खामेनी यांच्याकडे ३ पर्याय
4
अमेरिकेच्या इराणवरील हल्ल्यावर फारूक अब्दुल्लांचे विधान; म्हणाले, “आज जागे झाले नाही तर...”
5
ENG vs IND : जसप्रीत बुमराहचा 'पंजा'! या ३ चुकांमुळे लीड्स कसोटीत टीम इंडियानं गमावली मोठ्या आघाडीची संधी
6
साप्ताहिक राशीभविष्य: ५ राशींना सर्वोत्तम, पदोन्नती योग; बंपर लाभास अनुकूल काळ, शुभ तेच घडेल!
7
पावसाळ्यातही सुरू राहणार नक्षलविरोधी मोहीम; आत्मसमर्पण करा, अन्यथा...शाहांचा अल्टिमेटम
8
अमेरिकेनं इराणवर ज्या B-२ स्टिल्थ बॉम्बर्सनं हल्ला केला त्याची किंमत माहित्येय? तासाला किती खर्च येतो? जाणून थक्क व्हाल
9
Ashadhi Wari : दिवे घाटाची अवघड वाट पार करीत माउलींचा पालखी सोहळा कऱ्हेकाठी विसावला
10
CM देवेंद्र फडणवीसांना पाठवली कायदेशीर नोटीस, असीम सरोदे यांनी दिली माहिती; नेमके प्रकरण काय?
11
"...इराणला आपली अण्वस्त्रे देण्यास तयार!"; रशियाच्या माजी राष्ट्रपतींचा मोठा दावा; उद्या पुतीन यांची खास बैठक
12
अमेरिकेनं इराणवर चालवलं 'मिडनाइट हॅमर', केला ऑपरेशनच्या नावाचा खुलास; म्हणाले, ट्रम्प बोलें तो...!
13
१२५ लढाऊ विमाने, त्यात ७ बी२ बॉम्बर...! इराणला फसविले, पेंटागॉनने सांगितले अणुकेंद्रांवर कसा हल्ला चढविला...
14
ENG vs IND : कायद्यात राहून फायद्यात! जड्डू-साई सुदर्शन जोडीनं रिले कॅचसह लुटली मैफिल (VIDEO)
15
“८ वेळा निवडणुका जिंकलो, आता थांबण्याचा विचार करावासा वाटतो”; भास्कर जाधवांचे सूचक विधान
16
इराण तीन आठवड्यांत ९ अणुबॉम्ब बनवू शकला असता; अमेरिकेच्या हल्ल्यानंतर फोर्डोचा सॅटेलाईट फोटो आला...
17
“वारीमुळे रस्ता जाम होतो, आम्ही तक्रार केली नाही”; अबू आझमींचे विधान, CM फडणवीसांचे उत्तर
18
रोहित-विराट वनडे वर्ल्ड कप खेळणं 'मुश्किल'; गांगुलीनं बोलून दाखवली मनातली गोष्ट
19
इस्रायल-इराण युद्धात आता अमेरिकेनंतर होणार रशियाची एन्ट्री? अराघची घेणार पुतिन यांची भेट, म्हणाले...
20
शिंदेंनंतर आता भाजपाने डाव टाकला; शेकडो पदाधिकारी, माजी नगरसेवकांचा ठाकरे गटाला जय महाराष्ट्र

एमआयडीसीचे काम शेतकऱ्यांनी पाडले बंद

By admin | Updated: December 10, 2014 22:59 IST

निमगाव येथील एम.आय.डी.सी. सपाटीकरणाचे काम शेतकऱ्यांनी बंद पाडले. शेतीच्या बदल्यात शेती, भूमिहीन शेतकऱ्यांच्या मुलांना नोकरी व इतर आश्वासनांची जोवर पूर्तता होत नाही

अर्जुनी/मोरगाव : निमगाव येथील एम.आय.डी.सी. सपाटीकरणाचे काम शेतकऱ्यांनी बंद पाडले. शेतीच्या बदल्यात शेती, भूमिहीन शेतकऱ्यांच्या मुलांना नोकरी व इतर आश्वासनांची जोवर पूर्तता होत नाही तोपर्यंत या जमिनीवर काम होऊ देणार नाही, अशी आक्रमक भूमिका शेतकऱ्यांनी घेतली आहे. यासाठी तहसील कार्यालयासमोर आत्मदहन करण्याचा इशाराही देण्यात आला आहे.शासनाने महाराष्ट्र औद्योगिक विकास महामंडळाकरिता (एमआयडीसी) १९९४ मध्ये निमगाव येथे जागा घेतली. ही जागा बळजबरीने घेऊन शेतकऱ्यांना पैसे घेण्यास भाग पाडले असा शेतकऱ्यांचा आरोप आहे. साकोलीचे तत्कालीन उपविभागीय अधिकारी किटके व तहसीलदारांनी निमगाव येथील शेतकऱ्यांची बैठक घेतली. एम.आय.डी.सी.मध्ये कारखाने येतील, त्यात शेतकऱ्यांच्या कुटंूबातील एका व्यक्तीला नोकरी देण्यात येईल व अल्पभूधारक तसेच भूमिहीन शेतकऱ्यांना दुसरीकडे शेती दिली जाईल, असे आश्वासन या सभेत दिले. त्याचवेळी गावात पट्टे वाटप करण्यात आले. बऱ्याच लोकांनी हे पट्टे दुसऱ्यांना विकले, असे पट्टे गोळा करून ते अल्पभूधारक व भूमिहिन शेतकऱ्यांना देऊ, असे उपविभागीय अधिकारी म्हणाले, त्यामुळे शेतकऱ्यांनी शेतजमिनीने पैसे घेतले. जोपर्यंत पट्टे देण्यात येणार नाही तोपर्यंत या शेतजमिनीवर शेतमालकाचाच कब्जा व वहिवाट राहील असे सांगितले. बरेच दिवसांपर्यंत सातबाराच्या उताऱ्यावर फेरफार सुध्दा केली नाही. वाटप केलेले पट्टे विक्री करता येत नसल्याने ते तुम्हाला मिळतीलच असे सांगण्यात येत होते. तेव्हापासून आजतागायत त्या जागेवर शेतकऱ्यांचा कब्जा व वहिवाट आहे. असे असताना अचानक या जागेवर सपाटीकरणासाठी कंत्राटदार आले. सर्व शेतकऱ्यांनी त्यांचा सपाटीकरणाचा प्रयत्न हानून पाडला. शेतकऱ्यांनी एकत्र येऊन जोपर्यंत शेतीच्या बदली शेती, भूमिहीन शेतकऱ्यांच्या मुलांना नोकरी व इतर अटींची पूर्तता होत नाही तोपर्यंत या जमिनीवर कोणतेही काम होऊ देणार नाही, अशी आक्रमक भूमिका घेतली. प्रशासनाने दिलेले आश्वासन पाळावे यासाठी २५ नोव्हेंबर रोजी संबंधित अधिकाऱ्यांशी पत्रव्यवहार केला. शेतीशिवाय दुसरा पर्याय नसल्याने या शेतकऱ्यांसमोर उदरनिर्वाहाचे मोठे संकट उभे ठाकले आहे. बळजबरीने घेतलेल्या या शेतीवर कोणतेही काम झाल्यास तहसील कर्यालयासमोर आत्मदहन करण्याचा इशारा या शेतकऱ्यांनी दिला आहे. (तालुका प्रतिनिधी)