शहरं
Join us  
Trending Stories
1
"इराण भारताचा जुना मित्र, दुसरीकडे इस्त्रायल..."; मध्य पूर्वेतील युद्धावर सोनिया गांधी स्पष्ट बोलल्या
2
Air India :'या' तीन कर्मचाऱ्यांना तात्काळ बडतर्फ करा'; अहमदाबाद विमान अपघातानंतर एअर इंडियाला डीजीसीएचे आदेश
3
हास्यास्पद! पाऊस पडतोय म्हणून नाही आणले...; एअर इंडियाची दोन विमाने लगेज न घेताच आली
4
"संपूर्ण युक्रेन आमचा..."; पुतिन यांनी झेलेन्स्की यांच्या संपूर्ण देशावरच ठोकला दावा! मिळालं असं उत्तर
5
ऑफिसला न जाताच कर्मचाऱ्याला मिळाले २६ लाख रुपये; कोर्टाने दिला मोठा निर्णय
6
"गोयंकाजी पाहताय ना?’’, इंग्लंडमध्ये पंतच्या फटकेबाजीनंतर फॅन्सनी घेतली लखनौच्या मालकांची शाळा  
7
हनीमुनचा प्लॅन, रसगुल्लामध्ये विष भरले अन्...; बेवफा सोनमपेक्षाही खतरनाक आहे खूनी 'मुस्कान'
8
NSE चा IPO कधी येणार? सेबीचे अध्यक्ष म्हणाले, "आयपीओ आणण्यात कोणताही अडथळा..."
9
Air India Plane Crash: "१४ वर्षांनी घरी लक्ष्मी जन्मली अन् विमान दुर्घटनेत दुर्दैवाने तिलाच गमावले..."
10
गळफास लावलेल्या स्थितीत सापडला भाजपा नेत्याचा मृतदेह, दोरीने बांधलेले होते दोन्ही हात, संशयास्पद मृत्युमुळे खळबळ
11
भीषण अपघात! नवी मुंबईत मुलीने मर्सिडीजने दुचाकीला उडवले; महिलेचा जागेवर मृत्यू, एकजण गंभीर जखमी
12
८ वर्षांपूर्वी आई गेली, नुकतेच बाबाही गेले; रीमा लागूंच्या वाढदिवसानिमित्त लेकीची भावुक पोस्ट
13
"मी शांततेसाठी कितीही प्रयत्न केले तरी...!"; काँगो-रवांडा शांतता करारानंतर ट्रम्प यांचं दुःख, बोलून दाखवली नोबेल पुरस्काराची इच्छा
14
Israel-Iran War: भारतासाठी कायपण ! परतीसाठी इराणने आपले हवाई क्षेत्र उघडले, आणखी दोन विमाने नवी दिल्लीत पोहोचणार
15
पाकिस्तानमध्ये चार हिंदू भावंडांचे अपहरण, जबरदस्तीने धर्म बदलण्यास भाग पाडले; आईकडून न्यायाची मागणी
16
Ashadhi Ekadashi 2025: ईश्वरभेटीची सोपी वाट दाखवणार्‍या गुरुंचे आपल्या आयुष्यातील योगदान जाणून घ्या!
17
अहमदाबादमधील विमान अपघातात वाचलेल्या विश्वासला अभिनेत्रीनं म्हटलं 'खोटारडा', ट्रोल झाल्यावर घेतला युटर्न
18
कर्मचाऱ्याला सॅलरीतून मिळाले १४ कोटी तर झाला अवाक्; नंतर जे काही झालं त्याचा विचारही केला नसेल
19
R Madhavan घरबसल्या कमावणार महिन्याला ६.५ लाख रुपये; भाड्यानं दिला १७.५ कोटींचा फ्लॅट, एकूण किती कमाई करणार?
20
इराणमधील अणुकेंद्रांबाबत ट्रम्प यांचं मोठं विधान, म्हणाले, इस्राइल इराणमधील अणुकेंद्रं... 

निवडणूक खर्चाचे सुक्ष्म निरीक्षण करा

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: May 16, 2018 21:57 IST

लोकसभा पोटनिवडणुकीसाठी उमेदवार निश्चित झाले आहेत. निवडणुकीच्या प्रचारासाठी पक्ष व उमेदवाराचा होणारा खर्च दैनंदिन नोंदविणे आवश्यक आहे. सभा, प्रचार साहित्य, वाहन, अति महत्वाच्या नेत्यांच्या सभा, पोस्टर व बॅनर्स आदींचा खर्च निवडणूक खर्चात नोंदविणे गरजेचे आहे.

ठळक मुद्देप्रभात दंडोतिया : समारंभ व जेवणावळीवर नजर ठेवा

लोकमत न्यूज नेटवर्कगोंदिया : लोकसभा पोटनिवडणुकीसाठी उमेदवार निश्चित झाले आहेत. निवडणुकीच्या प्रचारासाठी पक्ष व उमेदवाराचा होणारा खर्च दैनंदिन नोंदविणे आवश्यक आहे. सभा, प्रचार साहित्य, वाहन, अति महत्वाच्या नेत्यांच्या सभा, पोस्टर व बॅनर्स आदींचा खर्च निवडणूक खर्चात नोंदविणे गरजेचे आहे. बऱ्याच वेळा उमेदवार वस्तुस्थितीदर्शक खर्च नमूद करीत नाहीत. त्यामुळे सहाय्यक निवडणूक खर्च अधिकाºयांनी उमेदवार व पक्षाच्या खर्चावर करडी नजर ठेवण्याचे निर्देश निवडणूक खर्च निरीक्षक प्रभात दंडोतिया यांनी दिले.जिल्हाधिकारी कार्यालयात लोकसभा निवडणूक खर्चाशी संबंधित नोडल अधिकारी व सहाय्यक निवडणूक खर्च अधिकारी यांची बैठक घेण्यात आली. या वेळी ते बोलत होते.या बैठकीला उपजिल्हाधिकारी (निवडणूक) विलास ठाकरे, मुख्य लेखा व वित्त अधिकारी अशोक मातकर, कोषागार अधिकारी अमित मेश्राम व सर्व विधानसभा मतदारसंघाचे सहाय्यक निवडणूक खर्च अधिकारी या बैठकीस उपस्थित होते.लोकसभा पोटनिवडणुकीच्या संबंधाने पक्ष व उमेदवाराचा होणारा खर्च याची १८ मे, २२ मे व २६ मे रोजी तपासणी करण्यात येणार आहे. यासाठीचा खर्च अहवाल तपासणी दिनांकाच्या एक दिवस अगोदरपर्यंत निवडणूक खर्च नोंदवहीत नोंदविण्याच्या सूचना निवडणूक खर्च निरिक्षकांनी दिल्या. खर्चाशी संबंधित सर्व अहवाल दररोज निवडणूक खर्च शाखेस पाठविण्यात यावे. उमेदवारांचे वाहन, सभा व प्रचार कार्य आदींची संपूर्ण व्हिडिओ रेकॉर्डींग करण्यात यावी. या व्हिडिओ रेकॉर्डींगची तपासणी करण्यात यावी. उमेदवारांनी सादर केलेला खर्च व रेकॉर्डींगमधील बाबी तपासून खर्च मान्य करण्यात यावा. स्टॅटिक सर्व्हेलन्स टिम मार्फत सुध्दा नियमित व्हिडिओ रेकॉर्र्डींग होणे आवश्यक आहे.रोख व मद्य पकडणे या घटनेची व्हिडिओ रेकॉर्र्डींग आवश्यक असून प्रत्येक घटनाक्रमाचा पुरावा गोळा करण्यात यावा. रोख पकडल्याची घटना निदर्शनास आल्यास या घटनेची माहिती तात्काळ निवडणूक निर्णय अधिकारी, निवडणूक खर्च निरिक्षक व आयकर खात्याला द्यावे. त्या आधारेच पुढील कार्यवाही करावी, असे निर्देश त्यांनी दिले. सभास्थळी येणाºया वाहनांची रेकॉर्र्डींग करताना प्रत्येक वाहनाची नंबरप्लेटसह रेकॉर्डींग करणे गरजेचे आहे. आपल्या परिसरातील बँकांमधून मोठ्या प्रमाणात रोख काढल्या गेली असल्यास त्याचीही चौकशी करण्यात यावी. निवडणूक काळात उमेदवारांनी आपल्या खात्यातून काढलेल्या रक्कमेचा तपशिल सादर करावा, असेही त्यांनी सांगितले.केवळ उमेदवारांनी सादर केलेल्या खर्चावर विश्वास न ठेवता सहाय्यक निवडणूक खर्च अधिकारी यांनी आपल्या वैयक्तिक यंत्रणेमार्फत खर्चाची पडताळणी करावी. निवडणूक खर्च निरिक्षक यांच्याशी कायम संपर्क ठेवून काही अडचण आल्यास प्रभात दंडोतिया निवडणूक खर्च निरिक्षक यांच्याशी संपर्क साधावा. राजकीय पक्ष व उमेदवार यांचे खर्चाचे खाते वेगवेगळे असून खर्च नोंदणी करताना वेगवेगळी नोंदणी करावी, असे निर्देश दंडोतिया यांनी दिले. निवडणूक काळात होणाºया जेवणावळी व राजकीय पक्ष किंवा उमेदवार उपस्थित असलेले लग्न समारंभ यावर लक्ष ठेवण्याची सूचना केली.

टॅग्स :Electionनिवडणूक