शहरं
Join us  
Trending Stories
1
जगन्नाथ यात्रेला गालबोट, प्रचंड जनसमुदायामुळे व्यवस्था फोल; तब्बल ६०० भाविक जखमी, उपचार सुरू
2
“राष्ट्रीय स्वयंसेवक संघ काय करतो, RSS म्हणजे काय?”; मोहन भागवतांनी एकाच वाक्यात सांगितले
3
प्लेन क्रॅशनंतर खुशाल ऑफिसात पार्टी करत होते, एअर इंडियाने 4 अधिकाऱ्यांना झटक्यात 'किक आउट' केले!
4
'त्यांना संविधान खुपते, म्हणून...', RSS नेते दत्तात्रय होसबळे यांच्या वक्तव्यावर राहुल गांधी संतापले
5
“समृद्धीनंतर आता शक्तिपीठ महामार्गात मोठा भ्रष्टाचार, कमिशनखोरी...”: पृथ्वीराज चव्हाण
6
"४० हजार घे अन् माझ्यासोबत...", सासऱ्याची सुनेकडे विक्षिप्त मागणी; अखेर 'असा' शिकवला धडा!
7
"माझा मुलगा तर गेला, आता त्याचे स्पर्म तरी द्या", मुंबई उच्च न्यायालयाकडे आईची मागणी; जाणून घ्या, मग काय घडलं?
8
"आपणच क्रॅश करवलं एअर इंडियाचं विमान...!"; प्रेमाला नकार दिल्याने बॉयफ्रेंडला अडकवण्यासाठी रचला असा कट
9
आयआयटीच नव्हे, एलपीयूच्या विद्यार्थ्याला मिळाली २.५ कोटींची विक्रमी प्लेसमेंट ऑफर
10
“संविधान बदलून मनुस्मृती लादण्याचा RSS-भाजपाचा अजेंडा आजही कायम”: हर्षवर्धन सपकाळ
11
मराठीच्या मुद्द्यावरून ठाकरे बंधू एकत्र, काँग्रेसकडून पहिली प्रतिक्रिया समोर; भूमिका काय?
12
“मराठी भाषा नाही, यांच्या खुर्च्या धोक्यात”; ठाकरे बंधूंच्या मोर्चावर सदाभाऊ खोत यांची टीका
13
ऑपरेशन सिंदूरमध्ये नौदल उतरले असते तर हाहाकार उडाला असता; समुद्रात काय चाललेले... जाणून घ्याल तर...
14
यावर्षी 3500 कोट्यधीश भारत सोडणार, 'या' देशांमध्ये स्थायिक होणार; कारण काय..?
15
शनिवारी विनायक चतुर्थी: गणपती बाप्पा अन् शनिचे ‘हे’ उपाय कराच; अखंड शुभाशिर्वाद मिळवा
16
Vinayak Chaturthi 2025: शनिवारी आषाढी विनायक चतुर्थी: ‘असे’ करा व्रत; पूजनात ‘या’ गोष्टी विसरू नका, कृपा-लाभ होईल!
17
६ ग्रहांचे जुलैमध्ये गोचर, २ अशुभ योग कायम: ९ राशींना अच्छे दिन, नोकरीत पदोन्नती; लाभाचा काळ!
18
VIDEO: 'तो' संडासात बसूनच हायकोर्टाच्या सुनावणीत सहभागी झाला; गुजरातमधील विचित्र प्रकार, व्हिडीओ व्हायरल
19
"चल पळून जाऊन लग्न करूया..." संजनानं शेअर केली लग्नाआधीची ती गोष्ट; बुमराहचा चेहराच पडला (VIDEO)
20
अमेरिकेचा डबल गेम! आधी इराणवर हल्ला, निर्बंध लादले; आता करणार ३० बिलियन डॉलर्सची मदत

पोस्ट कार्डातून नेत्रदानाचा संदेश

By admin | Updated: June 29, 2015 01:20 IST

मरणानंतरही जीवंत राहण्यासाठी नेत्रदान करणे आवश्यक आहे. नेत्रदानासंदर्भात घराघरात जनजागृती व्हावी या उद्देशातून ...

दीड हजार विद्यार्थ्यांचा सहभाग : तीन हजार कुटुंबात गेला चिमुकल्यांचा संदेशगोंदिया : मरणानंतरही जीवंत राहण्यासाठी नेत्रदान करणे आवश्यक आहे. नेत्रदानासंदर्भात घराघरात जनजागृती व्हावी या उद्देशातून लोकमत बाल विकास मंचच्या पुढाकाराने मृणाल कोचिंग क्लास, नेत्रविभाग केटीएस जिल्हा सामान्य रूग्णालय गोंदिया यांच्या संयुक्त विद्यमाने गोंदिया पब्लिक स्कूल व एस.एस गर्ल्स महाविद्यालयात पोस्ट कार्डातून नेत्रदानाचा संदेश देणारे सुवाच्छ अक्षर व प्रभावी संदेश स्पर्धा घेण्यात आली. या स्पर्धेत दिड हजार चिमुकल्यांनी भाग घेतला होता. आजच्या स्थितीत संदेश लिहीण्याकरीता पोस्ट कार्डची आवश्यकता नाही. ही प्रथा केव्हाचीच मोडली आहे. आधुनिक युगात ही पध्दत मोडली असून इंटरनेट व सोशल साईट्सच्या माध्यमातून कोणताही संदेश जगभरात पाठविता येते. इतिहास जमा होणाऱ्या पोस्ट कार्डच्या पध्दतीला आधार देण्याच्या हेतूने लोकमत बाल विकास मंचने हा पुढाकार घेतला. दि.२८ रोजी ही स्पर्धा घेतली. या स्पर्धेत सहभागी झालेल्या दीड हजार बालकांना पोस्ट कार्डचे वाटप करण्यात आले. ही स्पर्धा ८ ते १५ वर्षासाठी अ गट तर १५ व त्यापेक्षा अधिक वयासाठी दुसरा ब गट तयार करण्यात आला आहे. नेत्रहिनांना सुंदर जग पाहण्याची संधी लाभावी यासाठी लोकमतने हा अभिनव उपक्रम अमंलात आणला. या स्पर्धेत सहभागी झालेल्या बालकांना पोस्ट कार्ड दिल्यावर त्या पोस्ट कार्डावर त्या विद्यार्थ्याला आपल्या नातेवाईकाच पत्ता लिहावा लागला. त्याला बैठक क्रमांकही देण्यात आले. त्या विद्यार्थ्याला त्या कार्डावर सुवाच्च अक्षरात उत्कृष्ट मजकूर लिहावा लागला. नेत्रदानावर संदेश लिहिणाऱ्या या दीड हजार विद्यार्थ्यांपैकी प्रथम, व्दितीय, तृतीय दोन्ही गटात व प्रत्येक गटात पाच प्रोत्साहनपर असे एकूण १६ पुरस्कार देण्यात येणार आहेत. ज्या विद्यार्थ्याने या स्पर्धेत भाग घेतले त्या दिड हजार विद्यार्थ्यानी हा संदेश स्वत: घरी व त्या कार्डवर ज्या नातेवाईकांचे नाव लिहिले त्यांच्या घरी हा नेत्रदानाचा संदेश पोहचविण्यात आला. चिमुकल्यांनी नेत्रदानावर जनजागृती करतांना प्रिय नाना-नानी, प्रिय दीदी, प्यारी बुवा, प्यारे दादा, प्रिय मावशी असे भरपूर मनोरंजक शब्दही विद्यार्थ्यांनी त्या संदेश पत्रावर लिहीले. कार्यक्रमाची सुरूवात राष्ट्रगीताने झाली. नेत्रविभागातील समूपदेशक अनुपम बन्सोड यांनी नेत्रदानावर मार्गदर्शन केले. स्पर्धेत पारदर्शकता राहावी यासाठी सर्व सहभागी बालकांना रोल नंबर देण्यात आले. यावेळी पाहुणे म्हणून मृणाल कोचिंग क्लासचे संचालक विमल असाटी, गोंदिया पब्लिक स्कूलचे अध्यक्ष प्रा. अर्जुन बुध्दे, सचिव डॉ. इंदिरा सपाटे, प्राचार्या रिता अग्रवाल, जिल्हा शल्य चिकीत्सक डॉ. रवी धकाते, अनुपम बन्सोड, दीपक थाटे, शैलेंद्र टेंभरे, डॉ. सुवर्णा हुबेकर उपस्थित होते. सदर स्पर्धेत चंचलबेन मनिभाई पटेल हायस्कूल, जानकीदेवी चौरागडे हायस्कूल, संस्कार कान्व्हेंट, व्ही.व्ही. कोचिंग क्लास, शारदा कान्व्हेंट, बी.बी.पब्लिक स्कूल येथील विद्यार्थी सहभागी झाले होते. स्पर्धेची प्रस्तावना संयोजक श्रीकांत पिल्लेवार, संचालन देवा भोयर यांनी तर आभार दिव्या भगत यांनी मानले. यशस्वीतेसाठी वर्षा भांडारकर, अतूल कडू, रूपेश डोंगरे, विजय हुकरे, वरूण खंगार, संतोष बिलोने यांनी सहकार्य केले. (तालुका प्रतिनिधी)