शहरं
Join us  
Trending Stories
1
पहलगाममध्ये दहशतवाद्यांना केली मदत, दिला आश्रय, दोघे अटकेत, तपासातून धक्कादायक माहिती समोर
2
बॉम्ब फोडूनही अमेरिका काही करू शकली नाही! ३७ तास हवेतच होते ६ बी२ बॉम्बर..., इराण म्हणतेय...
3
आतापर्यंत इस्रायली हल्ल्यात इराणचे किती लोक मारले गेले? आकडा जाणून थक्क व्हाल! खामेनेई सैनिकांकडूनही जोरदार प्रत्युत्तर
4
ट्रम्प यांच्या 'या' निर्णयाने जागतिक अर्थव्यवस्थेला धक्का? तुमच्या खिशावर काय परिणाम होणार?
5
जगाचे 'लॉजिस्टिक्स' बदलणाऱ्या अवलियाचे निधन! मालवाहतुकीसाठी पहिल्यांदाच केला असा प्रयोग
6
पुढच्या ५ वर्षांत इराण अणुबॉम्ब बनवेल! अमेरिकेच्या हल्ल्यानंतर औवेसी म्हणाले, "तिथले कोट्यवधी भारतीय..."
7
"अमेरिकेच्या हल्ल्यानंतरही आमचे अणुऊर्जा प्रकल्प सुरक्षित"; इराणने दिली माहिती, ट्रम्प यांचा दावा फेटाळला
8
अमेरिकेने अणुकेंद्रांवर केलेल्या हल्ल्याचा इराण कसा घेणार बदला, केवळ इस्राइललाच लक्ष्य करणार की...
9
खोट्या बातम्यांवर बसणार आळा; कर्नाटक सरकारने आणला 'फेक न्यूज' कायदा, ७ वर्षांपर्यंतची शिक्षा
10
Iran Israel Conflict Explained: युद्धाच्या आगीत तेल पेटणार, भारतावर कसा परिणाम होणार?
11
भगवे झेंडे घेऊन रस्त्यावर उतरणे म्हणजे हिंदुत्व नव्हे; नितीन गडकरींची भूमिका
12
अमेरिकेच्या हल्ल्यानंतर इराण संतापला; इस्रायलवर डागली 30 क्षेपणास्त्रे, अनेक शहरांमध्ये भीतीचे वातावरण
13
VIDEO: इराणवर हल्ले सुरुच; अमेरिकेने दिलेली लढाऊ विमाने इस्रायलने केली नष्ट
14
"जंगल का कानून..."; अणुकेंद्रांवरीर हल्ल्यानंतर, इराणचा भारतमार्गे अमेरिकेला 'मेसेज'; घेतली मोठी शपथ!
15
NEET परीक्षा का बरे होत नसेल हो नीट?
16
इस्रायल सोडा अमेरिका-युरोपलाही घाबरत नाही; पण 'या' गटासमोर इराणला झुकावेच लागते!
17
‘त्या’ बेकायदा कृत्यांमध्ये कायद्याचे रक्षकच सहभागी; वसई-विरारमधील बांधकामप्रकरणी उच्च न्यायालयाने राज्य सरकारला झापले
18
इराणच्या अणुकेंद्रांवर अमेरिकेने टाकलेले बंकर बस्टर बॉम्ब एवढे आहेत विध्वंसक, अशी आहेत त्यांची वैशिष्ट्ये
19
तीन भाषा शिकण्यासाठी खेळाच्या तासात कपात; हिंदी शिकवण्यावरुन सुप्रिया सुळेंची CM फडणवीसांकडे मागणी
20
पुढच्या आठवड्यात बाजारात १२ कंपन्यांचे IPO, १५,८०० कोटींची उलाढाल! तुमच्यासाठी 'ही' सुवर्णसंधी!

कुंचल्यातून दिला ‘बेटी बचाओ’चा संदेश

By admin | Updated: September 30, 2016 02:01 IST

एखाद्या कलेच्या माध्यमाने जगासमोर आपली ओळख निर्माण करू इच्छिणारे विद्यार्थी कुंचल्याचा आधार घेत चित्र साकारतात.

४०० विद्यार्थी सहभागी : चित्रकला स्पर्धेला जिल्हाधिकाऱ्यांची हजेरीगोंदिया : एखाद्या कलेच्या माध्यमाने जगासमोर आपली ओळख निर्माण करू इच्छिणारे विद्यार्थी कुंचल्याचा आधार घेत चित्र साकारतात. याच कलेला प्रोत्साहन देण्याचा उद्देश समोर ठेवून लोकमत बालविकास मंच व पोद्दार इंटरनॅशनल स्कूल यांच्या संयुक्त विद्यमाने हिवरा येथील पोद्दार इंटरनॅशनल स्कुलच्या प्रांगणात आंतरशालेय चित्रकला स्पर्धा घेण्यात आली. यात सहभागी विद्यार्थ्यांनी विविध समस्यांवर कुंचल्यातून आपले चित्ररूपी विचार साकारले.विद्यार्थ्यांच्या कुंचल्यातून त्यांचे मत मांडता येईल याकरिता पर्यावरण, प्रदूषण, बेटी बचाव, स्वच्छ भारत यासारख्या महत्वाच्या विषयांवर विविध शाळांतून आलेल्या विद्यार्थ्यांनी मोठ्या संख्येने आपली उपस्थिती दाखवून चित्रकला स्पर्धेला प्रतिसाद दिला. याप्रसंगी जिल्हाधिकारी डॉ. विजय सूर्यवंशी, देवरीचे आदिवासी प्रकल्प अधिकारी जितेंद्र चौधरी, पोद्दार इंटरनॅशनल स्कूलचे प्राचार्य रितेश मेहता, व्यवस्थापक योगेश मात्रे, जंबो किड्सच्या मुख्याध्यापिका सुमन खंडेलवाल, श्रीकांत ठाकूर, लोकमतचे जिल्हा प्रतिनिधी मनोज ताजने, जाहिरात विभाग प्रमुख अतुल कडू, इव्हेंट संयोजक श्रीकांत पिल्लेवार उपस्थित होते. सुरूवातीला देवी सरस्वतीच्या प्रतिमेला माल्यार्पण व दीप प्रज्वलन करण्यात आले. यानंतर विद्यार्थ्यांनी चायनिज पितृमोक्ष अमावशेवर एक लघुनाटिका सादर करून सर्वांचे लक्ष वेधून घेतले. ४०० विद्यार्थ्यांनी विविध विषयांवर चित्र साकारले. यावेळी जिल्हाधिकाऱ्यांनी विद्यार्थ्यांशी संवाद साधून त्यांच्या प्रश्नांची मनमोकळेपणाने उत्तरे दिली. स्पर्धेचे परीक्षक म्हणून कला शिक्षक अरूण नशीने व कुंदन शेंडे उपस्थित होते. त्यांनी चित्रांचे निरीक्षण व परीक्षण केले. कार्यक्रमासाठी शिक्षकवृंदांनी परिश्रम घेतले. (प्रतिनिधी)