शहरं
Join us  
Trending Stories
1
Top Marathi News LIVE Updates: काँग्रेसने बारामतीची निवडणूक बिनविरोध करावी; शरद पवारांचा सल्ला
2
“इराणच्या १० कलमी प्रस्तावाला ट्रम्प यांनी दाखवली केराची टोपली”; व्हाइट हाऊसने सगळे सांगितले
3
पाकिस्तानचा पोपट झाला, युद्धविरामाच्या अटींबाबत शाहबाज शरीफ यांचा दावा जेडी वेन्स यांनी फेटाळला
4
Gold Silver Price Today: बाजार उघडताच सोन्या-चांदीच्या दरात मोठी घसरण; Silver ₹४,७०० नं स्वस्त, Gold चे दर काय?
5
केजचे तहसीलदार राकेश गिड्डे यांचा अपघाती अंत; कार्यक्षम अधिकाऱ्याच्या मृत्यूने बीड जिल्हा सुन्न!
6
३९ दिवसांच्या युद्धानंतर इराण, अमेरिका, इस्रायल... कुणी काय कमावले, काय गमावले?
7
STतील सफाईचा प्रवाशांना भूर्दंड; आधी दरवाढ केली, आता ‘स्वच्छता अधिभार’ लावला, प्रवास महागला
8
Post Office च्या 'या' स्कीममध्ये व्याजाद्वारेच मिळतील ४.४० लाख; ३०० रुपयांच्या बचतीतून तयार होईल १५ लाखांचा फंड
9
Share Market: शेअर बाजारात घसरण: सेन्सेक्स ५०० हून अधिक अंकांनी घसरला, निफ्टी २३,९०० च्या खाली
10
नाशिकमध्ये नामांकित कंपनीतील ८ जणींचा विनयभंग; एकीवर 'अतिप्रसंग'; ६ जणांना अटक
11
एक डॉलर प्रति बॅरल, त्यासोबत..., होर्मुझवरील टोलसाठी इराणने तयार केला असा नियम   
12
आजचे राशीभविष्य, ०९ एप्रिल २०२६: योग्य क्षेत्रातील गुंतवणूक आज लाभदायक; रागावर नियंत्रण ठेवावं लागेल
13
पाकला बळीचा बकरा बनवले, इराणला राजी करायला भाग पाडले, ट्रम्प यांनाच हवा होता युद्धविराम?
14
NATO देशांना ट्रम्प यांनी सुनावले, मदत न केल्याने व्यक्त केली तीव्र खंत; इशारा देत म्हणाले...
15
राज्य निर्मितीआधीपासूनच मराठा आरक्षण; उच्च न्यायालयात राज्य सरकारचा युक्तिवाद
16
१० मिनिटं, १०० ठिकाणं अन् १६० बॉम्ब; लेबनॉनवर इस्रायलचा सर्वात मोठा हल्ला; बेरूतमध्ये रक्ताचा सडा
17
शस्त्रसंधीमुळे अदानी-अंबानींवर डॉलर्सचा पाऊस; जगातील श्रीमंतांच्या यादीत स्थान वधारले
18
युद्ध की शांतता? अमेरिकेला काहीतरी एक निवडावं लागेल, इराणचा थेट इशारा; लेबनॉनवरून पेच वाढला!
19
अजूनही ५०% जुन्या वाहनांना HSRP नंबर प्लेट नाही; कालमर्यादेबाबत स्पष्टता नसल्याने अनेकांची पाठ
20
एलिफंटा उत्खननात दोन विशाल साठवण भांड्यांचा शोध; ऐतिहासिक महत्त्वात भर
Daily Top 2Weekly Top 5

मेरिटोरियस पब्लिक स्कूल जिल्ह्यात अव्वल

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: May 13, 2021 04:29 IST

तिरोडा : संपूर्ण जग मागील वर्षभरापासून कोरोनाशी संघर्ष करीत आहे. या आजाराच्या प्रादुर्भावाने जगातील प्रत्येक क्षेत्रावर मोठा वाईट परिणाम ...

तिरोडा : संपूर्ण जग मागील वर्षभरापासून कोरोनाशी संघर्ष करीत आहे. या आजाराच्या प्रादुर्भावाने जगातील प्रत्येक क्षेत्रावर मोठा वाईट परिणाम झाला आहे. यात शिक्षण क्षेत्रालाही बाधा निर्माण झाली, परंतु तिरोडा येथील मेरिटोरियस पब्लिक शाळेने आपल्या उत्कृष्ट कार्यप्रणालीने या संकटाच्या स्थितीत हार न मानता, संपूर्ण वर्षभर निरंतर ऑनलाइन शिक्षणाच्या माध्यमातून विद्यार्थ्यांना अध्यापनाचे कार्य केले आहे. शासनाच्या आदेशाने कोरोना काळात राबविलेल्या शैक्षणिक कार्यात ही शाळा भौतिक स्वरूपात जिल्ह्यात अव्वल ठरली आहे.

मेरिटोरियस पब्लिक शाळेत केवळ अध्यापनाचेच कार्य करण्यात आले नाही, तर विद्यार्थ्यांची सतत गूगल फॉर्मच्या सहायतेने ऑनलाइन परीक्षाही घेण्यात आल्या. या संपूर्ण प्रक्रियेत पालकांनी आपला शंभर टक्के सहकार्य केले. शाळेने विद्यार्थ्यांच्या सर्वांगीण विकासासाठी स्पर्धांचे आयोजन केले होते. यात चित्रकला, नृत्य, गायन, भाषण, अंताक्षरी, काव्यपाठ यांसारख्या अनेक स्पर्धांचे आयोजन करण्यात आले. यात यशस्वी विद्यार्थ्यांना पुरस्कारही प्रदान करण्यात आले. शाळेने विद्यार्थ्यांच्या सोबतच पालकांसाठीही ऑनलाइन स्पर्धांचे आयोजन केले व ई-प्रमाणपत्रही देण्यात आले. शासनाद्वारे परवानगी मिळाल्यावर पूर्णपणे कोरोना नियमाचे पालन करीत शाळेने यशस्वीरीत्या २३ नोव्हेंबर ते ६ एप्रिलपर्यंत जवळपास ११९ दिवस वर्ग नववी ते अकरावीपर्यंतचे वर्ग संचालित केले, तसेच ८ डिसेंबर ते ६ एप्रिलपर्यंत जवळपास ९३ दिवस शाळा संचालित करून अध्यापन व शैक्षणिक कार्य यशस्वीपणे पार पाडण्यात आले.

कोट

ग्रामीण क्षेत्रात गुणवत्तापूर्ण शिक्षण देणे व निरंतर शिक्षणाचे स्तर वाढविण्यासाठी प्रयत्नशील राहणे, हा शाळा व्यवस्थापनाचा उद्देश्य आहे. यात चांगल्या प्रमाणात शाळा यशस्वीही ठरली. विद्यार्थ्यांच्या उज्ज्वल भविष्यासाठी आम्ही वचनबद्ध आहोत.

- मुकेश अग्रवाल, शाळा संस्थापक.