शहरं
Join us  
Trending Stories
1
वाहनमालकांनो...! उद्यापासून टोल नाक्यावर रोख रक्कम स्वीकारली जाणार नाही! फास्टॅग, युपीआय नसेल तर पुढे जाता येणार नाही...
2
युद्धविरामानंतर फ्रान्सच्या नेतृत्वात १५ देश आले एकत्र; होर्मुझवर आखला 'प्लॅन बी', कसली तयारी?
3
इराणचा अमेरिकेवर खळबळजनक आरोप; "शस्त्रसंधीच्या ३ अटी मोडल्या, आता चर्चा करणे व्यर्थ!"
4
IPL 2026: आता 'या' खेळाडूंना मैदानात एन्ट्री नाही, बीसीसीआयचा कठोर निर्णय!
5
स्मार्टफोन्सच्या दुनियेत या कंपनीचा धमाका! ६९९ रुपयांत इअरबड, ३०००० रुपयांत फ्लिप फोन; बाजार उठवला...
6
इंदूरच्या राजा-सोनमसारखं प्रकरण; "तू दिसायला चांगला नाहीस, मला..";  टोमणे मारत पत्नीनेच पतीला संपवलं
7
आसाममध्ये बहुतेक १०० टक्के मतदान होतेय...! दुपारी १ वाजेपर्यंत ६०% पेक्षा जास्त मतदान; केरळ आणि पाँडिचेरीमध्येही उत्साह
8
अजितदादांचे जॅकेट अन् चष्मा, तसाच लूक; पार्थ पवारांनी घेतली खासदारकीची शपथ, आईचा खास सल्ला!
9
Akshaya Tritiya 2026: अक्षय्य तृतीयेपूर्वी स्वयंपाकघरातील ४ डब्यांत ठेवा 'या' वस्तू, मिळेल लक्ष्मीचा अखंड आशीर्वाद!
10
मराठी वर्षातील पहिली कालाष्टमी २०२६: १० राशींना सफलता, मान-सन्मान; पगारवाढ, मोठी संधी मिळेल!
11
Maruti Suzuki: दमदार मायलेज, किंमतही कमी; 'या' आहेत मारुती सुझुकीच्या बजेट कार, किंमत ४.६१ लाखांपासून सुरू
12
रेखा झुनझुनवालांनी 'या' Smallcap कंपनीतील २ लाखांपेक्षा अधिक शेअर्स विकले; स्टॉक 52W हायपासून ३५% खाली
13
युद्धविरामाचं भवितव्य अधांतरी, इराणी राजदूतांनी X वरील पोस्ट हटवली, चर्चेतून बाहेर पडणार?   
14
बारामती बिनविरोधसाठी महायुतीची धावाधाव; CM फडणवीसांचा सपकाळांना फोन, सुनेत्रा पवारांची तीनदा चर्चा
15
'तो' १० सूत्री प्रस्ताव पूर्णपणे 'फेक', ट्रम्प यांचं मोठं विधान; म्हणाले, करार न झाल्यास इराणवर पुन्हा बॉम्बफेक!
16
१० हजारांचा स्मार्टफोन थेट १४ हजारांवर! अचानक ४० टक्क्यांनी किंमती वाढल्या, 'ही' आहेत २ मोठी कारणे
17
प्रेमात आंधळी झाली ममता! प्रियकरासाठी पोटच्या २ वर्षांच्या मुलीचा गळा घोटला; मृतदेह गटारात फेकून रचला बनाव
18
रावण फक्त खलनायक नाही तर..., 'रामायण'मध्ये काय वेगळं बघायला मिळणार? दिग्दर्शक म्हणाले...
19
शिकारीचा थरार! गोळीबारात १ जण ठार; घटनास्थळी तलवार सापडल्याने गूढ वाढले, डाव कुणी साधला?
20
अमेरिका-इराण युद्धविरामानंतर रशियाची भारतासह आशियाई देशांना 'बिग ऑफर'; ट्रम्प यांची डोकेदुखी
Daily Top 2Weekly Top 5

जिल्ह्याचा पारा पुन्हा ४३ अंशावर

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: May 17, 2019 21:36 IST

उन्हाळा आता खऱ्या अर्थाने आपल्या रंगात आला असून दिवसेंदिवस तापमानात वाढ होत आहे. मध्यंतरी तापमनात काही प्रमाणात घट झाली होती. मात्र गुरूवारी (दि.१६) पुन्हा जिल्ह्यात ४३.५ अंश सेल्सिअस तापमानाची नोंद झाली.

ठळक मुद्देरखरखत्या उन्हाने जीव कासावीस : वाढत्या तापमानाचा दैनदिन कामावर परिणाम

लोकमत न्यूज नेटवर्कगोंदिया : उन्हाळा आता खऱ्या अर्थाने आपल्या रंगात आला असून दिवसेंदिवस तापमानात वाढ होत आहे. मध्यंतरी तापमनात काही प्रमाणात घट झाली होती. मात्र गुरूवारी (दि.१६) पुन्हा जिल्ह्यात ४३.५ अंश सेल्सिअस तापमानाची नोंद झाली. यामुळे जिल्ह्याच्या तापमानात पुन्हा वाढ झाली असून त्याचा दैनदिन कामांवर सुध्दा परिणाम होत आहे. दुपारच्या वेळी रस्त्यांवर शुकशुकाट दिसून येत आहे.एप्रिल महिन्यातच तापमान चांगले भडकल्याचे दिसले.मात्र उन्हाळ््याचा खरा रंग मे महिन्यात चढत आहे. त्यानुसार, सूर्यदेव चांगलेच भडकले असून उन्हाची तिव्रता वाढतच आहे.मध्यंतरीचे काही दिवस तापमानात घट दिसून आली होती. अशात गुरूवारी (दि.१६) पुन्हा तापमान ४३.५ अंश सेल्सिअस नोंदल्या गेले. रखरखत्या उन्हामुळे सकाळी ८-९ वाजतापासूनच अंगाला चटके लागत आहे. त्यामुळे शहरवासीयांचे घराबाहेर निघणे कठीण झाले आहे. मे महिना आता अर्ध्यात आला असून पुढचा जून महिनाही उरलेला असल्याने उन्हाची तिव्रता बघून भल्याभल्यांना धडकी भरली आहे.पारा चढतच जात असल्याने उरलेले दिवस कसे जातील याचा विचार करूनच घाम फुटत आहे.उन्हाच्या तिव्रतेमुळे लोकांनी दुपारच्या वेळी घराबाहेर निघणे टाळल्याने रस्त्यांवर शुकशुकाट दिसून आहे.दुपारची कामे नागरिकांकडून टाळली जात असून सायंकाळी ते घराबाहेर निघत आहेत. मात्र लग्नसराई असल्यामुळे मन मारून घराबाहेर निघणारेच दिसत आहेत.आणखी १५ दिवस राहणार होरपळउन्हाने जिल्ह्याला चांगलेच होरपळून सोडले असतानाच आणखी १५ दिवस तरी या उष्ण लहरींपासून सुटका नसल्याचे दिसत आहे. हवामान विभागाने विदर्भात १५ दिवस होरपळ राहणार असल्याचा अंदाज व्यक्त केला आहे. यामुळे पूर्ण मे महिनाच जिल्हावासीयांना आगीच्या भट्टीत काढावा लागणार असल्याचे दिसते. असह्य झालेल्या या उन्हापासून कधी सुटका मिळते याचीच सर्व वाट बघत आहेत.लग्न सराईलाही उन्हाचे चटकेउन्हाचा पारा चढत चालला असताना लग्नसराई मात्र कमी होत असल्याचे दिसत नाही. सकाळपासूनच लग्नाची वाजंत्री वाजत असून रात्रीही मोठ्या प्रमाणात लग्न आटोपले जात आहेत. यात मात्र दिवसाच्या लग्नात वºहाडी व नागरिकांची फजीती होत आहे. रखरखत्या उन्हामुळे घामाघूम होत लग्न आटोपले जात आहेत. रात्रीही तेच हाल असून उपाय नसल्याने, आहे त्या स्थितीत लग्न सोहळे सुरूच आहेत. यात मात्र वृद्ध व लहानग्यांची चांगलीच फजीती होत आहे. 

टॅग्स :Temperatureतापमान