शहरं
Join us  
Trending Stories
1
"आम्ही सुरुवात करणार नाही, पण...!"; पाकिस्तानची भारताला पोकळ धमकी
2
दिशा सालियन प्रकरण: सतीश सालियन यांच्या याचिकेवर भूमिका स्पष्ट करा; HCचे सरकारला निर्देश
3
चहलनं साधला मोठा डाव; IPL मधील दुसऱ्या हॅटट्रिकसह युवराज सिंगच्या विक्रमाशी बरोबरी
4
'सरकारला 'टेकू' असला की मनमानी करता येत नाही'; जातनिहाय जनगणनेच्या मुद्द्यावरून खोचक टोला
5
जातनिहाय जनगणनेला RSS ने दीड वर्षांअगोदरच केरळमधून दाखविला होता हिरवा झेंडा
6
धक्कादायक! सांगलीतील आष्ट्यात विहिरीत पोहण्यासाठी गेलेल्या दोन जणांचा बुडून मृत्यू
7
भारत कधीही हल्ला करेल; पाकिस्तान घाबरला, PoK ला जाणारी सर्व देशांतर्गत उड्डाणे केली रद्द
8
"मोदी सरकारने घेतलेला निर्णय ऐतिहासिक...", जात जनगणनेवरून मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांचा काँग्रेसवर गंभीर आरोप 
9
यवतमाळ: १२ तासात दोन खून! दारूच्या वादात जावायाला संपवले; मालमत्तेच्या वादातून मोठ्या भावाची हत्या
10
गंगेप्रमाणेच राष्ट्रीय स्वयंसेवक संघालाही थांबविण्याचे कोणाकडे साहस नाही: भैय्याजी जोशी
11
जातिनिहाय जनगणनेचा निर्णय हा राहुल गांधींच्या संघर्ष व विचारांचा मोठा विजय: हर्षवर्धन सपकाळ
12
अमूल दूध २ रुपयांनी महागले, महागाईने बेजार झालेल्या सर्वसामन्यांना झटका!
13
कोकण मंडळाच्या योजनेअंतर्गत म्हाडा विकणार १३,३९५ घरे; तुम्ही ऑनलाईन अर्ज केला का?
14
जातीय जनगणनेसाठी सरकारला पूर्ण पाठिंबा, पण..., राहुल गांधींच्या केंद्राला 'या' 4 मागण्या
15
दाैंडच्या खून प्रकरणी १२ जणांना जन्मठेप! आरोपींमध्ये चार सख्खे भाऊ, तीन महिलांचा समावेश
16
उन्हाचा कहर; सातारा ४०.७ अंशावर स्थिर! झळा असह्य, पूर्व भागात नागरिकांना घामाच्या धारा 
17
अवघ्या १२०० रुपयांत दिली पतीला अद्दल घडविण्याची सुपारी! पत्नीनेच रचला पतीला लुटण्याचा 'प्लॅन'
18
सामाजिक समता प्रस्थापित करण्याच्या दिशेने जातिनिहाय जनगणनेचा निर्णय महत्त्वाचा: अजित पवार
19
वेळ वाया घालवू नका, थेट कारवाई करा; पहलगाम हल्याबाबत राहुल गांधींची सरकारला मागणी
20
केवळ अजित पवारच नव्हे, शरद पवारांच्या राष्ट्रवादीकडूनही मोदी सरकारच्या निर्णयाचं स्वागत

जिल्ह्याचा पारा ४४.८ अंशावर

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: May 27, 2019 22:10 IST

हवामान खात्याने पुढील चार दिवस जिल्ह्यातील तापमानात वाढ होण्याचा इशारा दिला आहे. २५ मे पासून नवतपाला सुरूवात झाल्याने तापमानात वाढ झाली आहे. शनिवारी गोंदिया जिल्ह्यात सर्वाधिक तापमान ४५ अंश सेल्सिअस तापमानाची नोंद झाली. हे या हंगामातील सर्वाधिक तापमान होय. त्यानंतर सोमवारी (दि.२७) ४४.८ अंश सेल्सिअस तापमानाची नोंद झाली. तापमानात वाढ होत असल्याने जिल्हावासीय चांगलेच हैराण झाले आहे.

ठळक मुद्देगेल्या तीन दिवसांपासून तापमानात वाढ : नवतपाचाही परिणाम, दैनदिन कामावर होतोय परिणाम

लोकमत न्यूज नेटवर्कगोंदिया : हवामान खात्याने पुढील चार दिवस जिल्ह्यातील तापमानात वाढ होण्याचा इशारा दिला आहे. २५ मे पासून नवतपाला सुरूवात झाल्याने तापमानात वाढ झाली आहे. शनिवारी गोंदिया जिल्ह्यात सर्वाधिक तापमान ४५ अंश सेल्सिअस तापमानाची नोंद झाली. हे या हंगामातील सर्वाधिक तापमान होय. त्यानंतर सोमवारी (दि.२७) ४४.८ अंश सेल्सिअस तापमानाची नोंद झाली. तापमानात वाढ होत असल्याने जिल्हावासीय चांगलेच हैराण झाले आहे.नवतपा सुरू झाल्यानंतर तापमानात सरासरी दोन तीन अंश सेल्सिअसने वाढ होत असते. त्यामुळे नवतपा सुरू झाल्यानंतर नागरिक दुपारच्या वेळेत घराबाहेर पडणे टाळतात. परिणामी या कालावधी दुपारच्या वेळेत शहरातील रस्ते सामसुम असतात. हीच स्थिती यंदा देखील असून यंदा तामनात मोठ्या प्रमाणात वाढ झाली असल्याने नागरिकांच्या अंगाची लाहीलाही होत आहे.गोंदिया जिल्ह्याचा तापमानाचा इतिहास पाहता मागील पंधरा ते वीस वर्षांत यंदा प्रथमच ४५ अंश सेल्सिअस तापमानाची नोंद झाली आहे. यापूर्वी ४३.३ अंश सेल्सिअस तापमानाचा रेकार्ड होतो. मात्र यंदा मे महिन्यात हे सर्व रेकार्ड मोडले असून तापमान ४४ अंशावरच आहे. जिल्ह्यात तापमानात मागील गुरूवारपासून सातत्याने वाढ होत असून शनिवारी (दि.२६) सर्वाधिक ४५ अंश सेल्सिअस तापमानाची नोंद झाली. तर रविवारी आणि सोमवारी पारा पुन्हा ४४.८ अंशावर पोहचला होता.वाढत्त्या तापमानामुळे उष्माघाताच्या रुग्णांच्या संख्येत सुध्दा वाढ होत आहे. तापमानातील वाढ लक्षात घेता नागरिकांनी सुध्दा त्यानुसार आपले वेळापत्रक तयार केले आहे. सध्या शेतकरी खरीप हंगामपूर्व तयारीच्या कामात व्यस्त आहे. मृग नक्षत्राला सुरूवात होताच शेतकरी पेरणीच्या कामाला सुरूवात करतात. त्यापूर्वी शेतीच्या मशागतीची कामे पूर्ण करण्यासाठी शेतकऱ्यांची लगबग सुरू आहे. मात्र त्यांना सुध्दा वाढत्या तापमानाचा फटका बसत आहे. त्यामुळे पहाटे ६ वाजतापासून शेतात पोहचून १० वाजेपर्यंत कामे आटोपून शेतकरी घराकडे परतत असल्याचे चित्र आहे. वाढत्या तापमानापासून गारवा मिळण्यासाठी नागरिक शितपेयाच्या दुकानांमध्ये गर्दी करीत असल्याचे चित्र आहे.