शहरं
Join us  
Trending Stories
1
३९ दिवसांच्या युद्धानंतर इराण, अमेरिका, इस्रायल... कुणी काय कमावले, काय गमावले?
2
नाशिकमध्ये नामांकित कंपनीतील ८ जणींचा विनयभंग; एकीवर 'अतिप्रसंग'; ६ जणांना अटक
3
एक डॉलर प्रति बॅरल, त्यासोबत..., होर्मुझवरील टोलसाठी इराणने तयार केला असा नियम   
4
आजचे राशीभविष्य, ०९ एप्रिल २०२६: योग्य क्षेत्रातील गुंतवणूक आज लाभदायक; रागावर नियंत्रण ठेवावं लागेल
5
पाकला बळीचा बकरा बनवले, इराणला राजी करायला भाग पाडले, ट्रम्प यांनाच हवा होता युद्धविराम?
6
NATO देशांना ट्रम्प यांनी सुनावले, मदत न केल्याने व्यक्त केली तीव्र खंत; इशारा देत म्हणाले...
7
राज्य निर्मितीआधीपासूनच मराठा आरक्षण; उच्च न्यायालयात राज्य सरकारचा युक्तिवाद
8
१० मिनिटं, १०० ठिकाणं अन् १६० बॉम्ब; लेबनॉनवर इस्रायलचा सर्वात मोठा हल्ला; बेरूतमध्ये रक्ताचा सडा
9
शस्त्रसंधीमुळे अदानी-अंबानींवर डॉलर्सचा पाऊस; जगातील श्रीमंतांच्या यादीत स्थान वधारले
10
युद्ध की शांतता? अमेरिकेला काहीतरी एक निवडावं लागेल, इराणचा थेट इशारा; लेबनॉनवरून पेच वाढला!
11
अजूनही ५०% जुन्या वाहनांना HSRP नंबर प्लेट नाही; कालमर्यादेबाबत स्पष्टता नसल्याने अनेकांची पाठ
12
एलिफंटा उत्खननात दोन विशाल साठवण भांड्यांचा शोध; ऐतिहासिक महत्त्वात भर
13
शिखर बँक घोटाळा: रोहित पवारांच्या अर्जावर गुणवत्तेनुसार निर्णय घ्या! EDची विशेष न्यायालयाला विनंती
14
१२,३०० हल्ल्यांनंतरही इराणची ताकद कायम कशी? 'ही' आहेत यामागची कारणं
15
वैमानिकांच्या नव्या वेळापत्रकाला स्थगिती; मनुष्यबळ कमतरतेमुळे डीजीसीएचा निर्णय
16
एक लाख तीन हजार कोटींची वीजग्राहकांकडे थकबाकी; कृषी ग्राहकांनी थकवले ८० हजार कोटी
17
विशेष लेख: चला, सगळे मिळून स्त्री-शक्तीला सक्षम करूया!
18
अग्रलेख: स्वल्पविरामाचा पूर्णविराम व्हावा! तात्पुरत्या युद्धविरामाची घोषणा अन् अख्ख्या जगाला दिलासा
19
होर्मुझ सामुद्रधुनी पुन्हा बंद! तेल जहाजांची वाहतूक थांबली, इस्रायलच्या हल्ल्यानंतर इराणचा दणका
20
DC vs GT : मिलरची एक चूक नडली! दिल्ली कॅपिटल्सविरुद्ध गुजरात टायटन्सनं शेवटच्या चेंडूवर मारली बाजी
Daily Top 2Weekly Top 5

पारा चाळीशीच्या पार

By admin | Updated: April 2, 2017 01:02 IST

एप्रिल-मे महिन्यातील तापमान मार्च महिन्यातच अनुभवायला आल्याने जिल्हावासीय त्रस्त झाले आहेत.

रस्त्यांवर शुकशुकाट : काळजी घेण्याचे आरोग्य विभागाचे आवाहन गोंदिया : एप्रिल-मे महिन्यातील तापमान मार्च महिन्यातच अनुभवायला आल्याने जिल्हावासीय त्रस्त झाले आहेत. जिल्हयाचा पारा आता चाळीशीच्या पार गेला असून अवघ्या जिल्हा यात होरपळून निघत आहे. या उन्हामुळे दिवसा रस्त्यांवर शुकशुकाट दिसून येत असून नागरिकांनी आतापासूनच दुपारच्या वेळी घराबाहेर निघणे टाळल्याचे दिसून येत आहे. एप्रिल महिन्यापासून उन्हाळा खऱ्या अर्थाने रंगात येतो असा आजवरचा अनुभव आहे. तर मे महिन्यात उन्हाळा रंगात येतो असे आतापर्यंत बघावयास मिळाले आहे. त्यामुळे नागरिक मे महिन्यात दुपारच्या वेळेत घराबाहेर निघण्याचे टाळत असून तेव्हाच रस्ते शुकशुकाट दिसतात. यंदा मात्र वातावरण चांगलेच बदलले असून आता जेमतेम मार्च महिनाच सुरू असताना रविराज डोळे वटारून आपला रंग दाखवू लागले आहेत. यामुळेच आतापासूनच ४० डिग्रीच्यावर तापमानाची नोंद घेतली जात आहे. या उष्णलहरीमुळे शहरातील रस्ते आतापासूनच ओस पडत आहेत. मार्च महिनाही संपलेला नसताना उन्हाचा उद्रेक बघता येणाऱ्या एप्रिल, मे व जून महिन्यात काय कहर होणार याचा विचार करूनच अंगाला घाम फुटत आहे. यंदाच्या उन्हाने नागरिकांच्या अंगाची आतापासूनच लाही-लाही होत आहे. एवढेच नव्हे तर पंखे व कुलर आतापासूनच फेल ठरत आहेत. उन्हात निघणे टाळले जात असल्याची जाणीव रस्त्यांवरील शुकशुकाट करून देत आहे. (शहर प्रतिनिधी) तापमानमापकाची व्यवस्थाच नाही काही वर्षांपूर्वी येथील जुन्या तहसील कार्यालयात तापमान मापक यंत्र होते व तहसील कार्यालयातील संबंधीत कर्मचाऱ्यांकडून तापमानाची नोंद दररोज मिळत होती. शिवाय तहसील कार्यालयात एक चार्ट लावले जात होते व त्यावर दररोजची नोंद केली जात होती. अशात कुणालाही तेथून तापमान कळत होते. आता मात्र मागील काही वर्षांपासून ही व्यवस्था फिस्कटली आहे. शिवाय सध्या तरी तहसील कार्यालयाकडे तशी काहीच व्यवस्था नसल्याचेही कळले. त्यामुळे आजघडीला फक्त बिरसी विमानतळ येथेच तापमान मापक यंत्र असल्याची माहिती आहे.