शहरं
Join us  
Trending Stories
1
'हा' काय घोळ? पश्चिम बंगालच्या डॉक्टर कुटुंबाचे नाव थेट बांगलादेशच्या मतदार यादीत!
2
IND vs AUS 1st ODI : हिटमॅन रोहितनं मैदानात उतरत इतिहास रचला; पण हेजलवूडनं 'जोश' दाखवला अन्...
3
‘धन’त्रयोदशीला ग्राहकांचा २४ कॅरेट उत्साह; सोने ३ हजार, तर चांदी ७ हजार रुपयांनी स्वस्त
4
IND vs AUS 1st ODI : गिलच्या कॅप्टन्सीत या युवा क्रिकेटरला पहिली संधी; रोहितनं दिली वनडे डेब्यू कॅप
5
नाशिकजवळ धावत्या एक्स्प्रेसमधून तिघे फेकले गेले, दोघांचा मृत्यू; अपघातग्रस्त प्रवाशांची ओळख पटेना
6
क्रिकेटपटूंचा जीव घेतल्यानंतर पाकिस्तानचा अफगाणिस्तानसोबत युद्धविराम; या दोन देशांची मध्यस्थी...
7
आजचे राशीभविष्य १९ ऑक्टोबर २०२५ : ९ राशींसाठी आजचा दिवस फलदायी, धनलाभ होणारा...
8
३३ लाख शेतकऱ्यांच्या थेट खात्यात ३,२५८ कोटी; पॅकेज मदतनिधी मंजुरी, आतापर्यंत ७,५०० कोटींची मदत
9
साप्ताहिक राशीभविष्य: ८ राशींना सुबत्ता, नवीन नोकरीची संधी, शासकीय लाभ; दिवाळीत हाती पैसा!
10
‘कदम यांचे वय ११७ नव्हे ५४ वर्षे’ विरोधकांचे आरोप आयोगाने फेटाळले; आक्षेप-वस्तुस्थिती काय?
11
बिहार निवडणुकीत PM मोदींची तब्बल १२ सभांची तयारी; राहुल गांधींच्या एकाही सभेचे नियोजन नाही
12
महाआघाडी जागा वाटपाचा घोळ मिटेना; अर्ज भरण्याची मुदत संपली, चर्चेचे गुऱ्हाळ अद्याप सुरूच
13
बिहारमध्ये राजदचा पुन्हा ‘जंगलराज’ आणायचा प्रयत्न; अमित शाह यांची टीका, NDA विजयाचा विश्वास
14
‘ब्रह्मोस’ टप्प्यात पाकची इंच इंच भूमी; क्षेपणास्त्राच्या पहिल्या बॅचचे अनावरण, भारताचा इशारा
15
दोन लाखांवर मजुरांची दिवाळी अंधारातच! मनरेगाची १७० कोटी रक्कम चार महिन्यांपासून थकीत
16
बोगस मतदारांसाठी अधिकारीच पैसे घेतात; भाजपा आमदार मंदा म्हात्रेंचा गंभीर आरोप
17
शेतकरी कर्जमाफीची रक्कम ६ आठवड्यांत लाभार्थ्यांना द्या; औरंगाबाद खंडपीठाचे सरकारला निर्देश
18
महामुंबईत दिवाळी उत्सवावर पाणी? राज्यात कुठे सरी बरसणार, तर कुठे मोकळे आकाश
19
लाचखोर पाटोळेंसह तिघांना जामीन; मुंबई उच्च न्यायालयाचा निर्णय; निलंबन युक्तिवाद ग्राह्य
20
कॉर्पोरेटच्या नादात महायुतीला महापुरुषांचा विसर; काँग्रेसची मेट्रो स्थानक नावांवरून टीका

व्यापारी नगरपंचायतवर धडकले

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: June 5, 2020 05:00 IST

निर्धारित वेळेनंतरही ग्राहकांना वस्तू दिल्या जात असल्याने नगरपंचायतने बुधवारी काही व्यापाऱ्यांवर दंडात्मक कारवाई केली होती. ही अन्यायकारक कारवाई असल्याचे सांगून बुधवारी व्यापारी नगरपंचायतवर चालून गेले होते. त्यावेळी दुकाने सुरू करण्यासंदर्भात बुधवारी आदेश काढू असे सांगण्यात आले होते. मात्र तसे आदेश काढण्यात आले नाही. गुरुवारी व्यापाऱ्यांनी आपली दुकाने सुरू केली.

ठळक मुद्देपोलिसांना पाचारण : अधिकाऱ्यांशी चर्चेनंतर प्रकरण निवळले

लोकमत न्यूज नेटवर्कअर्जुनी मोरगाव : स्थानिक व्यापाऱ्यांनी सुरू केलेली दुकाने नगरपंचायतने बंद केली. पुढील आदेशापर्यंत सुरू करू नये असे बजावले. याविरोधात शहरातील व्यापारी गुरूवारी (दि.४) नगरपंचायतवर जाऊन धडकले. वाटाघाटीनंतर प्रकरण निवळले मात्र फिजिकल डिस्टन्सिंग व मास्कचा वापर न करता व्यापाऱ्यांनी कायद्याचे उल्लंघन केले असतांनाही नगरपंचायत व पोलिसांची बघ्याची भूमिका घेतल्याने सध्या हा चर्चेचा विषय बनला आहे.अर्जुनी मोरगाव शहराच्या बरडटोली येथे कोरोना बाधित रुग्ण आढळून आल्याने स्थानिक प्रशासनाने सोयीनुसार आठवड्यातील सोमवार, बुधवार व शुक्रवार या तीन दिवशी बाजारपेठ सुरू ठेवली होती. जीवनावश्यक किराणा भाजीपाला डेअरी औषधे व कृषी केन्द्र वगळता इतर सर्व दुकाने बंद होती.पाचव्या लॉकडाऊनमध्ये व्यवसाय सुरू करण्यासंदर्भात शासनाने शिथिलता दिली. त्यामुळे दुकाने सुरू करा ही व्यापाºयांची भूमिका होती. मात्र तालुक्यात कोरोनाचे ३२ रुग्ण व अर्जुनी शहर कंटेन्मेंट झोनमध्ये असल्याने स्थानिक प्रशासनाने आठवड्यातून तीन दिवस जीवनावश्यक वस्तूंची दुकाने सुरू ठेवण्याचा निर्णय घेतला. हाच निर्णय सद्या अंमलात आहे.निर्धारित वेळेनंतरही ग्राहकांना वस्तू दिल्या जात असल्याने नगरपंचायतने बुधवारी काही व्यापाऱ्यांवर दंडात्मक कारवाई केली होती. ही अन्यायकारक कारवाई असल्याचे सांगून बुधवारी व्यापारी नगरपंचायतवर चालून गेले होते. त्यावेळी दुकाने सुरू करण्यासंदर्भात बुधवारी आदेश काढू असे सांगण्यात आले होते. मात्र तसे आदेश काढण्यात आले नाही. गुरुवारी व्यापाऱ्यांनी आपली दुकाने सुरू केली. नगरपंचायतने ती बंद करून पुढील आदेशापर्यंत सुरू करू नये असे बजावले. त्यामुळे व्यापाऱ्यांचा राग अनावर झाला व ते जमावाने थेट नगरपंचायत कार्यालयात जाऊन धडकले. मुख्याधिकारी शिल्पाराणी जाधव यांनी पोलिसांना पाचारण केले. पोलीस निरीक्षक महादेव तोंदले आपल्या सहकाऱ्यांसह नगरपंचायत कार्यालयात पोहोचले. त्यांनी समजूत घालण्याचा प्रयत्न केला. मात्र व्यापारी आक्रमक भूमिकेत होते. व्यापारी नगरपंचायतवर धडकले तेव्हा फिजिकल डिस्टन्सिंग व मास्कचा वापर याचे उल्लंघन केल्याचे स्पष्ट होते. व्यापाऱ्यांनी ही चूक केली असतानाही काही प्रशासकीय अधिकाऱ्यांनी त्यांची माफी मागीतल्याचे एका व्यापाऱ्याने नाव गुप्त ठेवण्याच्या अटीवर सांगितले. राजकीय दडपणाखाली कारवाई टाळली जात असल्याची चर्चा आहे.बिल देणे अनिवार्य कराप्रत्येक ग्राहकाला विक्री केलेल्या वस्तूंचे बिल देणे व्यापाऱ्यांना अनिवार्य आहे. मात्र कधीच बिल दिले जात नाही. तंबाखूजन्य पदार्थ व गुटखा सेवनावर शासनाने बंदी घातली. लॉकडाऊन व बंदीचा लाभ घेत काही व्यापाऱ्यांनी या वस्तूंची विक्री सुरूच ठेवली. बऱ्याच वस्तूंची अतिरिक्त दराने विक्री केली जात आहे. त्यामुळे ग्राहकांना बिल देण्याची मागणी केली जात आहे.व्यापाऱ्यांकडून नियमाचे उल्लंघनगुरुवारी सकाळी स्थानिक व्यापारी नगरपंचायतवर जाऊन धडकले. मोठ्या संख्येने एकत्र आल्याने कोरोना विषाणूंचा संसर्ग होण्याची भीती असंतांनाही व्यापाऱ्यांनी यापद्धतीने उल्लंघन करणे अनुचित आहे. पोलीस व नगरपंचायत प्रशासनासमोर हा प्रकार घडला असतानाही व्यापाऱ्यांवर आपत्ती व्यवस्थापन कायद्यातंर्गत कारवाई का करण्यात आली नाही. त्यामुळे या प्रकारावरून नगरीत संतप्त प्रतिक्रि या व्यक्त केल्या जात आहेत.बुधवारी नगरपंचायत कार्यालयात काही व्यापारी आले होते. दुकाने सुरू करण्यासंदर्भात आदेश काढू असे त्यांना बोलले होते. पण आदेश काढले नाही. त्यांनी गुरुवारी दुकाने उघडली. आम्ही दुकाने बंद करायला लावून पुढील आदेशापर्यंत सुरू करू नयेत असे सांगितले. त्यानंतर ते नगरपंचायतमध्ये आले. काही प्रतिनिधींना चर्चेस येण्यास सांगितले. तरी सुद्धा ते आले. त्यांचेशी बोलणे झाले. आता प्रकरण निवळले. हा आठवडा सद्या आहे त्याच पद्धतीने सुरू राहील.- शिल्पाराणी जाधव,मुख्याधिकारी....................कोणत्याही व्यापाºयावर कारवाई करण्यात आली नाही. समज देऊन सर्वांना सोडण्यात आले.- महादेव तोंदले, पोलीस निरीक्षक .

टॅग्स :businessव्यवसाय