शहरं
Join us  
Trending Stories
1
भय इथले संपत नाही! अमेरिका-इराण शस्त्रसंधी झाली तरी आखाती देश हाय अलर्टवर; तणाव कायम
2
आजचे राशीभविष्य, ०८ एप्रिल २०२६: नोकरदारांना ऑफिसमध्ये अनुकूल वातावरण, आर्थिक लाभाची शक्यता
3
अमेरिका-इराणमध्ये २ आठवड्यांसाठी युद्धबंदी; डोनाल्ड ट्रम्प यांच्याकडून हल्ले थांबवण्याची घोषणा
4
बंगालमध्ये मतदारयादीत 'महा-सफाई'! आगामी विधानसभा निवडणुकीआधी वगळली ९१ लाख नावे
5
इशारा : युद्धामुळे महागाई, व्याजदर वाढणार; ‘जेपी मॉर्गन चेस’चे सीईओ जेमी डिमन यांचे भाकीत
6
भोंदूबाबा अशोक खरात संबंधीच्या ४,६५० अश्लील लिंक डिलीट; ६० दिवसांत दोषारोपपत्र
7
पुनर्वसनानंतर १२ हजार कोटींचा बोजा; नवी मुंबईच्या गळ्याला बसणार लोकसंख्येचा फास
8
२०१४ मधील पोलिस कोठडी मृत्यू प्रकरणी सात पोलिसांविरुद्ध खुनाचा आरोप कायम
9
१०% श्रीमंतांच्या ताब्यात ४४% जमीन; ग्रामीण भागात ४६% कुटुंबे भूमिहीन; जमीनदारांचे वर्चस्व
10
निष्पाप विघ्नेशला मुख्यमंत्री निधीतून मदत; देवेंद्र फडणवीस यांच्याकडून वसईतील घटनेची दखल
11
होर्मुझ खुली करण्याची शेवटची आशा संपली! UNSC मध्ये झाले मतदान, पण चीन-रशियाचे 'व्हिटो'अस्त्र
12
राजस्थानचा 'रॉयल' विजय! यशस्वी, वैभवने गोलंदाजांना धुतले, मुंबई इंडियन्सचा २७ धावांनी पराभव
13
नीलम शिंदेची झुंज संपली, तो कॉल ठरला काळीज चिरून टाकणारा; वडिलांना व्हिडीओ कॉलद्वारे घ्यावे लागणार अंतिम दर्शन
14
कडक! बुमराहचं वैभव सूर्यवंशीने असं केलं स्वागत! पहिल्याच ओव्हरमध्ये ठोकले दोन गगनचुंबी षटकार; पहा व्हिडिओ
15
अशोक खरातच्या अश्लील व्हिडीओंची १५ ते २० रुपयांना विक्री, गुन्हा दाखल, त्या व्यक्तीला लवकरच करणार अटक
16
"आज रात्री एका संस्कृतीचा अंत होईल..."; डोनाल्ड ट्रम्प यांची इराणला सर्वात मोठी धमकी
17
धडधड वाढली! इराणने 'या' शहरातील सर्व रेल्वे सेवा केल्या रद्द; इस्रायल-अमेरिकेचे हल्ले, तीन उड्डाण पूल उद्ध्वस्त
18
अवघ्या जगाला इंधनाची कमतरता, पण चीनला नाही जाणवली? २० वर्षांपूर्वीच केली होती तयारी
19
Viral Video: नदीच्या काठावर नवऱ्यासोबत मद्यपान, लोकांनी हटकताच म्हणाली,"आमच्यामुळेच तुमची घरं चालतात!"
20
NCL: एनसीएलमध्ये नोकरीची संधी, ५७७ जागांसाठी जाहिरात प्रसिद्ध; ९ एप्रिलपासून नोंदणी सुरू
Daily Top 2Weekly Top 5

रेल्वेचा मेगा ब्लॉक

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: October 2, 2017 22:13 IST

दक्षिण-पूर्व-मध्य रेल्वेच्या नागपूर मंडळांतर्गत कळमना-नागपूर रेल्वे स्थानकादरम्यान दुसºया रेल्वे लाईनचे आवश्यक नॉन इंटर लॉकिंगचे काम २ ते १६ आॅक्टोबरपर्यंत केले जाणार आहे.

ठळक मुद्देप्रवाशांना मनस्ताप : कळमना-नागपूरदरम्यान दुसºया रेल्वे लाईनचे काम

लोकमत न्यूज नेटवर्कगोंदिया : दक्षिण-पूर्व-मध्य रेल्वेच्या नागपूर मंडळांतर्गत कळमना-नागपूर रेल्वे स्थानकादरम्यान दुसºया रेल्वे लाईनचे आवश्यक नॉन इंटर लॉकिंगचे काम २ ते १६ आॅक्टोबरपर्यंत केले जाणार आहे. त्यामुळे या मार्गावर काही प्रवासी गाड्यांचे परिचालन प्रभावित होणार आहे. यातील काही गाड्या रद्द, काही गाड्या नियंत्रित करण्यात येतील. तर काही गाड्या गोंदिया स्थानकापर्यंत पोहोचणारच नसल्यामुळे या मार्गावरील प्रवाशांना मनस्ताप सहन करावा लागणार आहे.यात काही पॅसेंजर रेल्वे गाड्या रद्द करण्यात आल्या आहेत. यात इतवारी-रामटेक (५८८१४) व रामटेक-इतवारी (५८८१३) या गाड्या १३ ते १५ आॅक्टोबरपर्यंत तीन दिवस, नागपूर-रामटेक (५८८१०) व रामटेक-नागपूर (५८८११) या गाड्या ३ ते १३ आॅक्टोबरपर्यंत तब्बल ११ दिवसांसाठी रद्द करण्यात आल्या आहेत. काही गाड्या गंतव्य ठिकाणाच्या पूर्वीच समाप्त करण्यात येणार आहेत. यात गेवरा रोड-नागपूर (१८२३९) पॅसेंजर इतवारीपर्यंत ३ ते १३ आॅक्टोबरपर्यंत ११ दिवस, नागपूर-बिलासपूर इंटरसिटी एक्स्प्रेस (१२८५६) १३ आॅक्टोबरपर्यंत इतवारीवरून सुरू, गेवरा रोड-नागपूर (१८२३९) पॅसेंजर ही गाडी १४ व १५ आॅक्टोबरला गोंदियापर्यंतच धावेल, नागपूर-बिलासपूर (१२८५६) इंटरसिटी एक्स्प्रेस १४ व १५ आॅक्टोबरला गोंदियावरून सुटेल, बिलासपूर-नागपूर (१२८५५) इंटरसिटी एक्सप्रेस ३ ते १२ आॅक्टोबरपर्यंत इतवारी, नागपूर-बिलासपूर (१८२४०) एक्स्प्रेस ३ ते १२ आॅक्टोबरपर्यंत इतवारीवरून सुरू, बिलासपूर-नागपूर (१२८५५) १३ व १५ आॅक्टोबरला गोंदियापर्यंत, नागपूर-बिलासपूर (१८२४०) एक्सप्रेस १४ व १६ आॅक्टोबरला गोंदियावरून सुटेल.दक्षिण-पूर्व-मध्य रेल्वे मार्गावर नागपूर-गोंदिया-नागपूर असा प्रवास करणारे प्रवाशी मोठ्या प्रमाणात प्रवास करतात. यातील काही प्रमुख गाड्या गोंदियापर्यंत पोहोचणार नसल्याने त्यांना मनस्ताप सहन करावा लागणार आहे. यात महाराष्टÑ एक्स्प्रेस (११०३९) ३ ते १५ आॅक्टोबरपर्यंत तब्बल १३ दिवस अजनी रेल्वे स्थानकापर्यंत येईल. तर अप मार्गावर महाराष्टÑ एक्स्प्रेस (११०४०) तब्बल १३ दिवस अजनी स्थानकावरून सुटेल. तसेच मुंबई-गोंदिया (१२१०५) विदर्भ एक्स्प्रेस ३ ते १५ आॅक्टोबरपर्यंत तब्बल १३ दिवस अजनी स्थानकापर्यंतच येईल तथा गोंदिया-मुंबई (१२१०६) विदर्भ एक्स्प्रेस ३ ते १५ आॅक्टोबरपर्यंत अजनी स्थानकावरूनच सुटेल. यामुळे प्रवाशांना त्रास होणार आहे.