शहरं
Join us  
Trending Stories
1
Baramati By Election 2026: “सुनेत्राकाकींना बिनविरोध निवडून देण्यासाठी सहकार्य करा”; रोहित पवारांचे काँग्रेसला आवाहन
2
मस्साजोग सरपंचपदाची पोटनिवडणूक बिनविरोध होणार? संतोष देशमुखांच्या पत्नी उमेदवारी अर्ज भरणार
3
इस्रायलच्या हल्ल्यांनं लेबनान हादरला, १० मिनिटांत १०० हून अधिक ठिकाणी हल्ले! २५४ जणांचा मृत्यू, अनेक जखमी; इराण म्हणाला...
4
पाकिस्तान खोटारडा निघाला...! सीजफायरच्या नावाखाली इराणचा गेम? की अमेरिकेनं मोडला करार...? लेबनानवरून नवा वाद
5
इंजेक्शन, गर्लफ्रेंड अन् डिजिटल पुरावे; डॉ. कृतिका रेड्डी हत्याप्रकरणात पतीच्या चॅटने फिरली चक्र
6
इराणनं विश्वासघात केला तर, सर्वनाश अटळ! ट्रम्प यांचा इशारा, होर्मुजजवळ अजूनही युद्धनौका तैनात
7
Top Marathi News LIVE Updates: काँग्रेसने बारामतीची निवडणूक बिनविरोध करावी; शरद पवारांचा सल्ला
8
स्मृती मानधना आणि पलाश मुच्छल यांच्यातील दुरावा मिटला? कुटुंबातील सदस्यांचा एकत्रित फोटो व्हायरल
9
“इराणच्या १० कलमी प्रस्तावाला ट्रम्प यांनी दाखवली केराची टोपली”; व्हाइट हाऊसने सगळे सांगितले
10
"पाकिस्तान विश्वासार्ह नाही!" इस्रायली राजदूताचा अमेरिकेला घरचा आहेर; जेडी व्हॅन्स यांच्या पाकिस्तान दौऱ्यापूर्वीच खळबळ
11
Numerology: नशिबाची साथ हवीय? मग महत्त्वाच्या कामाला जाताना आपल्या जन्मतारखेनुसार वापरा 'हा' खास रंग!
12
पाकिस्तानचा पोपट झाला, युद्धविरामाच्या अटींबाबत शाहबाज शरीफ यांचा दावा जेडी वेन्स यांनी फेटाळला
13
Gold Silver Price Today: बाजार उघडताच सोन्या-चांदीच्या दरात मोठी घसरण; Silver ₹४,७०० नं स्वस्त, Gold चे दर काय?
14
केजचे तहसीलदार राकेश गिड्डे यांचा अपघाती अंत; कार्यक्षम अधिकाऱ्याच्या मृत्यूने बीड जिल्हा सुन्न!
15
३९ दिवसांच्या युद्धानंतर इराण, अमेरिका, इस्रायल... कुणी काय कमावले, काय गमावले?
16
STतील सफाईचा प्रवाशांना भूर्दंड; आधी दरवाढ केली, आता ‘स्वच्छता अधिभार’ लावला, प्रवास महागला
17
Post Office च्या 'या' स्कीममध्ये व्याजाद्वारेच मिळतील ४.४० लाख; ३०० रुपयांच्या बचतीतून तयार होईल १५ लाखांचा फंड
18
Share Market: शेअर बाजारात घसरण: सेन्सेक्स ५०० हून अधिक अंकांनी घसरला, निफ्टी २३,९०० च्या खाली
19
नाशिकमध्ये नामांकित कंपनीतील ८ जणींचा विनयभंग; एकीवर 'अतिप्रसंग'; ६ जणांना अटक
20
एक डॉलर प्रति बॅरल, त्यासोबत..., होर्मुझवरील टोलसाठी इराणने तयार केला असा नियम   
Daily Top 2Weekly Top 5

मेगा ब्लॉकमुळे रेल्वे प्रवास प्रभावित

By admin | Updated: June 2, 2017 01:31 IST

दक्षिण-पूर्व-मध्य रेल्वेच्या नागपूर मंडळांतर्गत कलमना-गोंदिया-दुर्ग सेक्शनमध्ये डाऊन लाईनवर कलमना-कामठीच्या दरम्यान

लोकमत न्यूज नेटवर्कगोंदिया : दक्षिण-पूर्व-मध्य रेल्वेच्या नागपूर मंडळांतर्गत कलमना-गोंदिया-दुर्ग सेक्शनमध्ये डाऊन लाईनवर कलमना-कामठीच्या दरम्यान ट्रॅकच्या देखभाल दुरूस्तीच्या कार्यासाठी २, १६ व ३० जून २०१७ तसेच १४ व २८ जुलै २०१७ रोजी सायंकाळी ७.४५ ते रात्री ११.४५ वाजतापर्यंत चार तासांचा ब्लॉक घेण्यात येणार आहे. त्यामुळे रेल्वे प्रवास प्रभावित होणार आहे.यात गाडी (५८११२) इतवारी-टाटानगर पॅसेंजरला निर्धारित वेळेपेक्षा दोन तास विलंबाने सोडण्यात येणार असून, ही गाडी रात्री ९.३० ऐवजी रात्री ११.३० वाजता सुटेल. दुर्ग-गोंदिया-कलमना सेक्शनमध्ये अप लाईनवर दुर्ग-रसमडाच्या दरम्यान ट्रॅकच्या देखभाल दुरूस्तीसाठी ९ व २३ जून तसेच ७ व २१ जुलै रोजी रात्री २०.४० वाजतापासून दुसऱ्या दिवसी १० व २४ जून तसेच ८ व २२ जुलै रोजी रात्री १२.४० वाजतापर्यंत चार तासांचा ब्लॉक घेण्यात येणार आहे. त्यामुळे दुर्गवरून रात्री ११.४५ वाजता सुटणारी गाडी (१८२३९) गेवरारोडा-नागपूरला एक तास दुर्गमध्ये नियंत्रित करण्यात येईल व दुर्गवरून रात्री १२.४५ वाजता सुटणारी गाडी (५८१११) टाटा-इतवारी पॅसेंजरला ३० मिनिटे दुर्गमध्ये नियंत्रित करण्यात येईल. ९, २३ जून व ७, २१ जुलैला गाडी (६८७२१) रायपूर-डोंगरगड मेमो व गाडी (६८७२९) रायपूर-डोंगरगड लोकलला दुर्गमध्ये समाप्त करण्यात येईल. तर गाडी (६८७०३) डोंगरगड-गोंदिया मेमो रद्द राहील. याशिवाय गाडी (६८७२४) गोंदिया-रायपूर लोकल तथा गाडी (६८७३०) डोंगरगड-रायपूर लोकल १० व २४ जून २०१७ आणि ८ व २२ जुलै २०१७ रोजी रद्द राहतील.