शहरं
Join us  
Trending Stories
1
अजूनही ५०% जुन्या वाहनांना HSRP नंबर प्लेट नाही; कालमर्यादेबाबत स्पष्टता नसल्याने अनेकांची पाठ
2
आजचे राशीभविष्य, ०९ एप्रिल २०२६: योग्य क्षेत्रातील गुंतवणूक आज लाभदायक; रागावर नियंत्रण ठेवावं लागेल
3
एलिफंटा उत्खननात दोन विशाल साठवण भांड्यांचा शोध; ऐतिहासिक महत्त्वात भर
4
शिखर बँक घोटाळा: रोहित पवारांच्या अर्जावर गुणवत्तेनुसार निर्णय घ्या! EDची विशेष न्यायालयाला विनंती
5
१२,३०० हल्ल्यांनंतरही इराणची ताकद कायम कशी? 'ही' आहेत यामागची कारणं
6
वैमानिकांच्या नव्या वेळापत्रकाला स्थगिती; मनुष्यबळ कमतरतेमुळे डीजीसीएचा निर्णय
7
एक लाख तीन हजार कोटींची वीजग्राहकांकडे थकबाकी; कृषी ग्राहकांनी थकवले ८० हजार कोटी
8
विशेष लेख: चला, सगळे मिळून स्त्री-शक्तीला सक्षम करूया!
9
विशेष लेख: पंजाबमधल्या भगव्या छावणीत आता ‘काँग्रेसयुक्त भाजप’!
10
अग्रलेख: स्वल्पविरामाचा पूर्णविराम व्हावा! तात्पुरत्या युद्धविरामाची घोषणा अन् अख्ख्या जगाला दिलासा
11
होर्मुझ सामुद्रधुनी पुन्हा बंद! तेल जहाजांची वाहतूक थांबली, इस्रायलच्या हल्ल्यानंतर इराणचा दणका
12
DC vs GT : मिलरची एक चूक नडली! दिल्ली कॅपिटल्सविरुद्ध गुजरात टायटन्सनं शेवटच्या चेंडूवर मारली बाजी
13
"...तर आम्ही युद्धविराम करार धुडकावून लावू", लेबनानवरील हल्ल्यानंतर इराणचा थेट अमेरिकेला इशारा
14
थरकाप उडवणारा रक्तपात! दहा मिनिटांत ८९ ठार, ७०० जखमी; इस्रायलच्या हल्ल्यांनंतरची लेबनानमधील फोटो
15
मोजतबा यांची चिठ्ठी, मुनीर यांना कॉल...युद्धविरामाची रंजक कहाणी; डेडलाइन संपण्याआधी काय घडलं?
16
DC vs GT, David Miller retd hurt : विक्रमी धावसंख्येचा पाठलाग करताना किलर मिलरनं सोडलं मैदान; मग...
17
Israel Strikes: इस्रायलने लेबनानकडे वळवला मोर्चा! भयंकर हल्ले; अनेक शहरांत डागल्या मिसाईल्स, भयावह दृश्ये
18
IPL New Rule: शिस्त पाळा नाहीतर…आयपीएल दरम्यान BCCI चा कडक नियम; फक्त ५ खेळाडूंनाच बाउंड्रीजवळ परवानगी
19
DC समोर बटलर-गिलसह वॉशिंग्टनची सुंदर खेळी! तिघांच्या अर्धशतकाच्या जोरावर GT नं साधला 'द्विशतकी' डाव
20
"बारामतीची बिनविरोध झाली पाहिजे होती, पण काँग्रेसने उमेदवार का दिला? हे त्यांनाच विचारा", श्रीकांत शिंदेंचा निशाणा
Daily Top 2Weekly Top 5

राष्ट्रवादी काँग्रेसच्या पदाधिकाऱ्यांची बैठक

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: April 25, 2018 20:13 IST

राष्ट्रवादी काँग्रेसचे जिल्हा निवडणूक अधिकारी आ. प्रकाश गजभिये व माजी आ. राजेंद्र जैन यांच्या प्रमुख उपस्थितीत पक्षाच्या प्रमुख पदाधिकाऱ्यांची बैठक घेण्यात आली.

लोकमत न्यूज नेटवर्कगोंदिया : राष्ट्रवादी काँग्रेसचे जिल्हा निवडणूक अधिकारी आ. प्रकाश गजभिये व माजी आ. राजेंद्र जैन यांच्या प्रमुख उपस्थितीत पक्षाच्या प्रमुख पदाधिकाऱ्यांची बैठक घेण्यात आली.प्रदेश राष्ट्रवादी काँग्रेसद्वारे दर ३ वर्षात होणारे संगटनात्मक निवडणुकीचे कार्यक्रम जाहीर झाल्यानंतर गोंदिया जिल्ह्यातील संगटनात्मक निवडणुकीकरिता आ. प्रकाश गजभिये यांची जिला निवडणूक अधिकारी म्हणून नेमणूक करण्यात आली आहे. २३ फेब्रुवारीला पक्षाची सभा घेऊन जिल्ह्यातील तालुका व शहर अध्यक्षांची संगटनात्मक निवडणूक घेण्यासाठी निवडणूक निरीक्षक व निवडणूक अधिकारी यांची नेमणूक करण्यात आलेली आहे. सर्व निवडणूक अधिकारी व निवडणूक मतदान अधिकाऱ्यांनी यासाठी प्रत्येक तालुक्यात बैठक घेतली.पक्षाचे जिल्हा अध्यक्ष, प्रदेश प्रतिनिधी, तालुका अध्यक्ष व शहर अध्यक्ष नियुक्त करण्याचे सर्व अधिकार पक्षाचे नेते खा. प्रफुल पटेल यांना देण्यात येत असल्याचे जिल्ह्यातील सर्व सभांमध्ये घोषित करण्यात आले. त्या अनुषंगाने गोंदियात जिल्हा निवडणूक अधिकारी प्रकाश गजभिये व माजी आ. राजेंद्र जैन यांच्या प्रमुख उपस्थितीत पक्षाचे प्रमुख पदाधिकाऱ्यांची बैठक घेण्यात आली. प्रदेश राष्ट्रवादी काँग्रेसकडे खा. प्रफुल पटेल यांनी दिलेल्या सूचनेनुसार संगटणात्मक निवडणुकीचा अहवाल पाठविण्यात आला. प्रदेश राष्ट्रवादी काँग्रेस कार्यालयाकडून या अहवालावर २९ एप्रिल रोजी होणाऱ्या बैठकीमध्ये मंजुरी मिळाल्यानंतर पक्ष पदाधिकाऱ्यांची घोषणा करण्यात येईल, असे जिल्हा निवडणूक अधिकारी प्रकाश गजभिये यांनी या वेळी उपस्थितांना सांगितले.सदर बैठकीमध्ये प्रामुख्याने विजय शिवणकर, विनोद हरिणखेडे, गंगाधर परशुरामकर, मनोहर चंद्रिकापुरे, राजलक्ष्मी तुरकर, रमेश ताराम, पंचम बिसेन, किशोर तरोणे, केतन तुरकर, अशोक सहारे, कुंदन कटारे, छोटू पटले, प्रेम रहांगडाले, केवल बघेले, डॉ. अविनाश काशीवार, कमलबापू बहेकार, तुकाराम बोहरे, लोकपाल गहाणे, जितेश टेंभरे, राजकुमार एन.जैन व इतर उपस्थित होते.