शहरं
Join us  
Trending Stories
1
अनकॅप्ड मुकुल चौधरीची अविश्वसनीय खेळी! KKR च्या तोंडचा घास हिसकावत LSG ला जिंकून दिली मॅच
2
मुंबईला भारतातील पहिली नॉन-एसी ‘बंद दरवाजांची’ लोकल ट्रेन; उपनगरीय सेवेत होणार दाखल  
3
Wife Killed Husband: पतीची हत्या, पत्नीचा आक्रोश; प्रियंकाच दुःख बघून सगळे हेलावले, पण तिच निघाली मास्टरमाईंड
4
"आमचे हात अजूनही ट्रिगरवरच आहेत", खवळलेल्या इराणची इस्रायलला खुली धमकी, लेबनाननंतर आक्रमक
5
Video: मुंबई विमानतळाच्या टर्मिनल १ मध्ये आगीचा भडका; प्रवेशद्वार बंद, धुराचे लोट बघून प्रवासी घाबरले
6
Latest Marathi News LIVE: इराणने हल्ला केला, तर आम्हीही निष्ठुरपणे उत्तर देऊ; इस्रायलच्या संरक्षण मंत्र्याचा इशारा
7
बॉलिंगसाठी 'ग्रीन' सिग्नल! तब्बल २५ कोटींचा ऑलराउंडर अखेर गोलंदाजीला आला; पहिल्याच षटकात रिषभ पंतची शिकार
8
Pune Crime: प्रेमात सगळं विसरली अन् प्रियकराच्या मदतीने सहा वर्षांच्या लेकराची केली हत्या, कारण...; पुणे जिल्ह्यातील घटना
9
KKR vs LSG : अजिंक्य रहाणेचा भन्नाट सिक्सर! बॅट निसटली तरीही चेंडू थेट सीमारेषेबाहेर (VIDEO)
10
उपराष्ट्रपती जे.डी. व्हान्स यांना पाकिस्तानात जायला वाटतेय भीती; US-इराण चर्चा फिस्कटणार?
11
"...तोपर्यंत आम्ही हल्ले करत राहू", इस्रायलचे पंतप्रधान नेतन्याहू यांचा इशारा; हल्ल्याचे व्हिडीओही दाखवले
12
22 वर्षाचा बॉयफ्रेंड, ३५ वर्षाची गर्लफ्रेंड; दोघे रुममध्ये गेले आणि नंतर 'बेड बॉक्स'मध्ये मिळाला तिचा मृतदेह
13
KKR vs LSG: Finn Allen खराब पंचगिरीचा शिकार? दिग्वेश राठीनं टिपलेल्या झेलवरुन वादंग (VIDEO)
14
बुलेट आली! पहिली इलेक्ट्रिक बाईक 'Flying Flea C6' लाँच; किंमत आणि फिचर्स पाहून व्हाल थक्क
15
PSL 2026 : थेट विराट कोहलीशी तुलना! मग Babar Azam चिडला; नेमकं काय घडलं?
16
रशियाच्या पाणबुड्या महिनाभर ब्रिटनच्या समुद्रात लपलेल्या, काय करत होत्या? ब्रिटीशांच्या दाव्याने खळबळ...
17
KKR vs LSG : अर्जुन तेंडुलकरची नुसतीच हवा! Playing XI मध्ये मिळाली नाही जागा; अजिंक्य रहाणेचा गेम प्लॅनही फसला
18
टी-२० सामन्यात तब्बल ९ विकेट्स, एका षटकांत ४ बळी; कधीही न तुटणारा वर्ल्ड रेकॉर्ड कुणी बनवला?
19
ट्रम्प यांच्या दाव्याने खळबळ, १०० मिसाईल...! 'शांतीदूत' म्हणवून घेणारा पाकिस्तान 'बेनकाब'; चीनचा बुरखा फाटला
20
अजबच विनोद...! अमेरिका-इराण सीजफायरनंतर पाकिस्तानची थेट 'नोबेल' शांतता पुरस्काराची मागणी
Daily Top 2Weekly Top 5

पालिकेची आमसभा झाली तहकूब

By admin | Updated: May 9, 2017 00:53 IST

आमसभेतील विषयांचे टिपण ऐनवेळी आदल्या दिवशी देण्यात आल्याच्या मुद्यावरून विरोधी पक्षातील सदस्यांनी नगर परिषदेच्या पहिल्याच आमसभेत विरोध दर्शवित कामकाज होऊ दिले नाही.

विरोधी पक्षातील सदस्यांचा विरोध : आदल्या दिवशी दिले टिपणलोकमत न्यूज नेटवर्कगोंदिया : आमसभेतील विषयांचे टिपण ऐनवेळी आदल्या दिवशी देण्यात आल्याच्या मुद्यावरून विरोधी पक्षातील सदस्यांनी नगर परिषदेच्या पहिल्याच आमसभेत विरोध दर्शवित कामकाज होऊ दिले नाही. परिणामी सोमवारी (दि.८) आमसभा तहकूब करण्यात आली व आता ही आमसभा मंगळवारी (दि.९) घेतली जाणार आहे. माजी नगराध्यक्ष कशिश जायस्वाल यांनी १० सप्टेंबर रोजी शेवटची आमसभा घेतली होती. त्यानंतर आता नवा कार्यकाळ सुरू झाला असून विद्यमान नगराध्यक्ष अशोक इंगळे यांची ही पहिलीच आमसभा होती. ७१ विषयांना घेऊन बोलाविण्यात आलेल्या आमसभेतील विषयांची टिपणी काही नगरसेवकांना आमसभेच्या एका दिवसापूर्वी रविवारी मिळाली. ७१ विषयांचा अभ्यास करण्याचा वेळही सदस्यांना मिळाला नाही. यामुळे कॉंग्रेसचे नगरसेवक सुनील भालेराव, शकील मंसूरी, शिवसेनेचे राजकुमार कुथे, बहुजन समाज पक्षाचे पंकज यादव, कल्लू यादव यांनी विरोध केला. तसेच काही विषय सदस्यांच्या न विचारता घेण्यात आल्यानेही सदस्यांनी आपली नाराजगी दर्शवित कामकाज होऊ दिले नाही. यावेळी सत्तापक्षातील काही सदस्य व पदाधिकाऱ्यांनी कामकाज होऊ देण्याबाबत म्हटले. मात्र विरोधी पक्षातील सदस्यांनी पूरजोर पणे आपला विरोध मांडत कामकाज सुरू होऊ दिले नसल्याची माहिती आहे. परिणामी सोमवारची (दि.८) आमसभा तहकूब करावी लागली. विशेष म्हणजे, आमसभेसाठी तयार करण्यात आलेल्या विषयसूचीतील विषयांना घेऊनही काही सदस्यांनी आपली नाराजगी व्यक्त केली. पालिके तील पहिलीच घटना आमसभा कामकाज सुरू न होता तहकूब होणे ही पालिकेच्या इतिहासातील पहिलीच घटना असावी समजते. यापूर्वी कित्येक सभा झाल्या त्यांत गोंधळ व खटकेही उडाले मात्र कामकाज सुरू झाले होते. यंदा मात्र विरोधी पक्षातील सदस्यांनी कामकाज सुरू न होऊ देता सभा तहकूब करवून घेतली. ही आतापर्यंंतची पहिलीच घटना असावी असे काहींनी सांगीतले. विशेष म्हणजे पालिकेच्या निवडणुका झाल्यानंतर नव्या कार्यकाळातील ही पहिलीच आमसभा होती. आता ही सभा मंगळवारी (दि.९) बोलाविण्यात आली असून या सभेत काय घडते याकडे सर्वांचे लक्ष लागले आहे.